Wednesday, May 11, 2011

तुझा तसाच गोडवा .........



तुझा तसाच गोडवा असेलही नसेलही



जसा उन्हात गारवा  असेलही नसेलही ....






अजुन रोज हिंडते नभात एक पाखरू 



उदास तोच पारवा असेलही



तुझा तसाच गोडवा असेलही नसेलही ..........






निवांत एकटाच मी निवांत ही तुझी नशा



तुझ्या स्वरात मारवा असेलही नसेलही



तुझा तसाच गोडवा असेलही नसेलही ....



किती अनोळखी   इथे मला सुगंध भेटती



हवी तशीच ही हवा असेलही नसेलही



तुझा तसाच गोडवा असेलही नसेलही ....