Sunday, April 27, 2014

नशिब ..

हात तिचे रंगले होते
मेंहदीत नाव नविन आज कोरले होते

मी पाहीले नाही तिला
ती नवरीसारखी खुपच सुंदर दिसत होती

माझ्यावर आभाळच कोसळले होते
ती आता माझी नव्हती

काय करू मी तिला सांगुही शकलो नाही
प्रिये माझे हात दारिद्र्याने धरले होते..

तु खुष रहा एवढीच माझी ईच्छा होती
तु गेल्यावर जिवानेही साथ माझी सोडली होती...
_
©प्रशांत डी शिंदे
दि.27-04-2014

Wednesday, April 23, 2014

ठरवले आहे मी विचार नाही करायचे ....


आता ठरवले आहे   मी  विचार नाही करायचे
हरवून जाऊन तयांत आपण नाही झुरायचे
.
जगावे हे आयुष्य घेऊन थोडा  मोकळा श्वास
झालंय हे मन दूषित वारंच  आहे विचारांचे 
.
मी बळी नाही पडायचे ठरवले आहे पक्के
खचून जातो माणूस राहत नाही कुणाचे
.
मनात ध्यानात नसतं काही
घरात भासही होतात विचारांचेच
डोळ्यांसमोर दिवसाही अंधार दाटतो
मग भूकही पोटातच रडते
प्रश्नच आहे विचारांचे
उत्तर थोड्यांनाच सापडतात
इच्छा तेव्हा एकच मला आता मरायचे ..........
.
कित्येक आहेत रुग्ण ह्याचे
त्यावर  नाही तोडगा
नशिबाचा बळी कुणी तर कुणी बळी आहे   धोक्याचा
कुणी घालतो साकडे देवाला
कुणी नशिबालाच दोष देतो
वाढलेल्या ताटातही  त्याला विचारांचेच भोजन दिसतं..........
.
आता मात्र  खूपच झालं
कसे निवांत बसायचे
ठरवले आहे प्रेमानेच आता विनवणी त्याला घालायचे ........
.
जाऊ दे रे बाबा आता
सोडून दे माणसाला
करून विचार बघ मुकतो आहे जो तो जीवाला
निघून जा दूर कुठे तू
उत्तर बनूनच भेट दुखांचे
आनंद मिळेल गरिबाला ह्या
हात उठतील  मग आशीर्वादाचे .............

सोडून दे ह्या मनाला
घर मोकळे ठेव विचारांचे ............
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.२३-०४-२०१४

Tuesday, April 22, 2014

घडणारं घडत राहतं.........

घडणारं घडत राहतं
त्यावर कुणी हसतं 
तर दुखी मन तेव्हा मात्र रडत राहतं

कुणाचे स्वप्न सत्यात तर कुणाचे
आयुष्यंच   उध्वस्त होतं
आयुष्याच्या खेळात बहुधा
असंच काही  घडत राहतं

कुठे वसलेलं गाव ते
नदीच्या किनारी
वाहत्या पाण्याचा खळखळाट  ही ते
मरणावर एखाद्याच्या चुपचापच निघून   जातं

आंधळी  होते रात्र ही तेव्हा
जीव निघून जातो जेव्हा
दिसू लागतात नजरांना
आपलीच लोक रडतांना
देता ही येत नाही आवाज असण्याचा
कळतं मिळाला मृत्यू तेव्हा

जाळून जातं घर काहींच
विजत नाही अश्रूंनी ती आगही तेव्हा
आली ती लेकरं रस्त्यावर
छत्र मात्र कुठेच नाही
देवाकडे  पाहून मग
विसरून जातो तो माणुसकीही  तेव्हा....

घडणारं घडत राहतं
कुणी हसतं 
कुणी रडत राहतं  ............
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.२२-०४-२०१४








Monday, April 21, 2014

आयुष्याचेही रंग अनेक आहेत..........

आयुष्याचेही रंग अनेक आहेत
कधी रंगहीन तर कधी शापित आहे

जगणे असह्य झाले तरी जगतो  इथे
नशिबाचे हे खेळणे आहे

नसतं हातात काहीच  शिल्लक
दुखांनीच घेरले आहे
क्षणिक गंध येतो सुखांचा
क्षणातच सारेकाही विखुरले आहे ......

देऊन जातो प्रेम अन माया
मरण येउनही तोच  जिवंत आहे

आयुष्य ह्याच नाव  आहे
खडकाळ अंगणातही  लागली सुमने आहे

आयुष्य ह्याचेच  नाव आहे.......
-
©प्रशांत डी शिंदे ....

दि.२१-०४-२०१४


Wednesday, April 16, 2014

दु:खांसोबत जगायला शिक..

हसायला शिक
जगायला शिक
उघड्या डोळ्यांनी दु:ख लपवुन
समोर जाऊन लढायला शिक

कुणी नाही ईथे कुणाचे
जिवाची तुझ्या किंमत करायला शिक

आपले म्हणायला रक्तही आपलेच
वाहुन गेलेल्या रक्ताला विसरायला शिक

काळजाला सारेच देतात वेदना
वेदनांसोबत तु मरायला शिक

कितीही स्वप्न तुटले तुझे
चंद्रासारखे मोठं मन करायला शिक.....

दु:खांसोबत तु जगायला शिक......
-
©प्रशांत डी शिंदे

असे दिवस येतात ..............

असे  दिवस  येतात
कुणीच  सोबत  दिसत नाही
एकटे चालताना सावलीही मग साथ देत नाही

जगायचे कुणासाठी आपले कुणीच  नसतं
उरलेल्या ह्या आयुषला कुठलेच रंग नसतं
अंधार आयुष्यात कुठवर राहणार आहे
इथे तर कधी संपेल हे जीवन ह्याचेच पक्क नसतं

असे दिवस येतात
हाथ  रिकामेच सापडतात
खूप आशेने मुत्ठीत दाबून ठेवतो सुख थोडंसं
पण खरे तर ते सुख कधीच  आपले नसतं ..........

असे दिवस येतात
कसे तरी जगायचं
कोसत त्या देवाला मग कधीतरी कंटाळून जीवही  निघून जातो ....
 -
©प्रशांत डी शिंदे ....
दि.१६-०४-२०१४ 

तुला तर माझी आठवणही येत नसेल.......



तुला तर माझी आठवणही  येत नसेल
माझ्या विचारांत ,माझ्या मनात फक्त तूच असतेस
कसे एकटे जगतो आहे मी
माझे मला खरेच कळत नाही

पुन्हा गर्दीत शोधतो तुला मी
एकट्या जीवाला ह्या
वेदनांत जळताना बघतो मी

तू मात्र कुठेच  दिसत नाहीस
त्या वाटा , ते लोक सारे काही  तसेच आहे
त्यामध्ये फक्त तुझाच चेहरा दिसत नाही
नैराश्यात   जखडलो आहे मी
आता तर  स्वप्नांतही आधार असतो
खरेच एवढे कम नशिबी आहे का मी ..........


खूप त्रास होतो आता
तुझी सवय झाली आहे
तुला कळत नसेल ते
माझ्या भावना मात्र रडत राहतात

कसे समजवायचे  मला मी
आईचेही  डोळे  माझ्याकडे पाहून वाहतात
आईला म्हणतो माझीच  चुकी  आहे ही
खरेच प्रेम असे दुखावरचं खपलं असतं .........

आता पहिल्यासारखी आपली भेट होत नसते
सुन्या पडलेल्या रस्त्यावर त्या
तुझी सावली कुठेच सापडत नसते

तरी शोधत राहतो तुला
हि रात्र मला छळत  असते
मन  ऐकत नाही
फुला-पानांमध्ये तुला शोधतं

वेड लागले तुझे मला
तुझ्याच विचारांतचं हे माझे मन असतं

तुझे नाव  विसरावं वाटत
पण कसे  कळत नाही
सारखा भास होतो तुझा
दूर जाऊनसुद्धा
तू आजही परवा एवढीच जवळ वाटतेस

आता मी थकलो आहे
त्यात तुझ्या  आठवणींतच हरवलो आहे
तू पुन्हा येशील  ठाऊक नाही
आलीस तरी पुन्हा माझी होशील ठाऊक नाही ......

मी जेवढे तुला आठवतो
तेवढेच प्रेम तू देशील ठाऊक नाही ........


तुला तर माझी आठवणही येत नसेल ...........

तुला तर माझी आठवणही येत नसेल ...........
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.१६-०४-२०१४

Sunday, April 6, 2014

तुला वाटत असेल मी तुला विसरलो...

तुला वाटत असेल मी तुला विसरलो
कुणाच्या स्वप्नांत मी ही आता हरवलेलो असेल

आजकाल तुझ्याकडे पाहतही नाही
तुला वाटत असेल मी तुला आठवतही नसेल
खरे तर ...
जसे तु ही मला चोरुन पाहतेस
 
तसे माझी आजही तुझ्यावर नजर आहे
तुला वाटत असेल मी आता खुष असेल
पण तुझ्याशिवाय कसला आनंद
तुला ठाऊक आहे तुझ्याशिवाय माझे मीच नसेल

तुच शिकवलंस पुन्हा प्रेमात पडायला
जुन्या जखमा लपवुन पुन्हा थोडं हसवायला
माझे प्रेम आहेस
तुच शिकवलंस ना शोना हरतानाही उठुन जिंकायला....
-
©प्रशांत डी शिंदे
दि.06-04-2014

Thursday, April 3, 2014

सुख ओंझळीत दे तू जरा ...........

मूक होऊनी का  बसलास देवा
डोळे उघडूनी बघ ना जरा
गीत गातो तुझे तसे मी
तू हि थोडे  बोल ना जरा..............

प्रीतीच्या कळ्या उमलना तू जरा
गंध घेईल बाहुपाशात माझ्या
सुखाच्या मिलनासाठी  हो  आतुर तू जरा .................

किती दुरावा मिळतो नशिबाचा
तोंडावर लेकरांच्या येऊ दे तू  हसू जरा

गरिबीच्या उन्हात पोळले आयुष्य
आता प्रेमाची  भाकर थोडी 
नशिबाच्या ताटात वाढ तू  जरा

एकले चालतो आहे न पाठी  न सोबती माझ्या
तिच्या मायेची सावलीत विसावा मिळू दे जरा ..................

असे हे जीवन माझं
सुख ओंझळीत दे तू जरा ...........

©प्रशांत डी शिंदे
मो.९८१९६१६७१४