Friday, September 20, 2013

हातातल्या रेषां.......

हातातल्या रेषांना पुसट होताना पाहिलंय मी
देहात हि जीव असतो , मरणावर तिच्या अश्रूंत पाहिलंय मी ........
-
©प्रशांत डी शिंदे

Thursday, September 19, 2013

विरहाची वाट ..................

विरहाच्या वाटेवर  चालताना
पुन्हा पुन्हा मागे पाहिले
तू नव्हतीस पण 

तू  जिथून गेलीस तिथेच 
माझे मन हे बसून  राहिले ..........

एकट्याने  चालायचे होते हि वाट
आयुष्यभर तुझ्या  विरहाच्या अग्नीत 
 

मला  असेच   जळायचे होते
असेच का  जगायचे मी
का नाही मरण पत्करायचे  मी
निशब्द ह्या भावनांना आता 
कसे समजवायचे मी  .........

असेच आता जगायचे आहे
पण  एकटे  जगता
ही येत नाही
आईला ही  पाहवत नाही 

डोळ्यांत लपवलेले अश्रू
 म्हणते सारखे " बाळा  तू  विसरून का जात नाहीस " ..........

आईच्या कुशीत  डोके ठेवतो 

मग मायेचा  हात फिरतो
अन  आठवणींचे ओझे  हलके करून 

मी पुन्हा नव्याने सुरुवात करतो
वाटेत येणारी  प्रत्येकात कधी  तुलाच मी पाहतो 

अन खरेच अश्या  स्तब्ध अंधारात
माझे अस्तित्व मी शोधतो............
-
©प्रशांत डी शिंदे

Wednesday, September 18, 2013

तुझ्यावर खूप प्रेम माझे .............!!

तुझ्यावर  खूप  प्रेम आहे माझे
तुला सांगायला मला जमत नाही .......

ओरडतो तुला  नेहमी कारण
तुझ्याशिवाय करमत नाही........

ओरडतो मी तुझ्याशी
अबोला हि धरतेस तू
माझ्यासोबत भांडण करून
मग अश्रूंनाही जवळ करतेस तू ....................

खरच मला असह्य गं  तुझा माझा असा दुरावा
पाहत जा कधी तू  माझे हि  डोळ्यांना
विरहात   भांडणार्या  ह्या माझ्या हृदयाच्या स्पंदनांना.......

वाटता  कधी  तरी  समजून घेशील
तू  माझ्या मनाला
पण  तुलाही  ते जमत नाही
अन मी पुन्हा एकटा पडतो .............

समजावतो मनालाच  माझ्या
नशीबच  आहे  माझे  ऐसे
जे स्वप्नांनाही पूर्णत्व मिळत नाही ..............
तुझे  डोळे  बोलतात
माझ्या डोळ्यांना ते जमत नाही
विचारांचे  ओझे  मनावर
कधीच मला एकटे सोडत नाही ..........

तुझ्यावर  खूप प्रेम  माझे
कसे गं  तुला कळत नाही .............
-
©प्रशांत डी शिंदे

Monday, September 16, 2013

विरहात ही कविता तुझ्यावर लिहताना .............

विरहात ही कविता तुझ्यावर लिहताना .............
_______________________________________

लिहता  लिहता  हरवलो  आठवणीत
त्या कवितेच्या शब्दांमध्ये तू  दिसू लागलीस
कवितेची  सुरुवात  होतीस
आता अश्रुरूपी तू  वाहू लागलीस ..................

पुन्हा  फाडले ते  पान
पुन्हा  थोडा रडलो
कंठाला गप्प करत मनासही विनवणी करू लागलो
विसरून जा रे तिला आता
तिला  आपली किंमत नाही
सोडून जाताना  तिचा  वेग  थोडाही संथ नाही ..........

चार  शब्द  येतात  ओठांवर
" तू पुन्हा परत  ये " ........
लिहताना भिजते रेघ ही म्हणते
बस्स कर आता शब्द तेच पाहवत नाही ..........

समजून घे वेड्या मनाला
तुझीच  ओढ आहे
तुझाच   विचार आणि वाटते मैफिलीत ही तूच आहेस .............

संगीत ही  येत कानी प्रेमाचे
कळतं मला आयुष्य प्रेमाविना  ओसाड आहे  .............. :'(
-
© प्रशांत डी शिंदे
दि. १६-०९-२०१३

Thursday, September 12, 2013

तू परत ये ....... ताई ....... :'(

एका   मुलाची ताई त्याला सोडून देवाघरी जाते तिच्या  आठवणीत लिहलेली  कविता :

कुठे  निघून गेलीस तू
मला  एकट्यात सोडून
शोधायचे कुठे तुला मी
आता पडलो आहे मी  मोडून ........

खरच का  ?
इतका राग आला तुला
मला  न  सांगताच निघून गेलीस
आठवणींचा दिवा  तुझ्या
माझ्या मनात  उज्वलित करून गेलीस .........

रक्षाबंधनाची  तुझी राखी हाताला
आज हि तशीच बिलगून आहे 
तूच म्हणालीस ना  भाऊबिजेला
तुला खूप काही सांगायचंय............

आठवण खूप येते
तुला  विसरताही येणार नाही
तुझ्यासारखी ताई   खरेच दुसरे कुणी नाही .......

आली बघ दिवाळी
तु ही  आता निघून ये
कधीच  गं रागावणार नाही तुझ्यावर
राग सोडून  परत  ये ................

ताई  तू परत  ये .............. :'(
-
© प्रशांत डी शिंदे

आई ............

आयुष्य थोडेच आहे

मला ते जगायचंय

माझ्यावाटेचे   सारे सुख आई

तुझ्या चरणात अर्पायचंय.......
-
© प्रशांत डी शिंदे

वरदान.............

शांत होईल चेहरा माझा
श्वास हि उद्या बंद होईल
फुलांमध्ये जडेल देह तरी
माझे प्रेम मात्र  तसेच  जिवंत राहील ..........

वरदानच मागितले देवाला मी
डोळ्यांना  दिसली नाही तरी
हृदयात तुझ्या सदैव  राहील ............
-
© प्रशांत डी शिंदे
दि.१२-०९-१३

नाही जमत ..............

नाही जमत रे  आता
 

उगीच  चार शब्द  लिहणे
 

दुखांच्या ओझ्यातुनही
 

सगळे ठीक आहे म्हणणे ..........
-
© प्रशांत डी शिंदे
दि.१२-०९-१३

रुसवा ...

तुझ्या  अश्या वागण्याने
एक वादळ नक्कीच  येईल
तू सुखरूप निघशील
मात्र माझा त्यातच अंत  होईल ........

रोजचेच  आहेत वाद
प्रेमात  नको हे झगडे
दूर  राहून सये
नयनांना हि  ओसाड होईल सगळे .........

तुझ्या अश्या वागण्याने
तू  आनंदात  राहशील
माझे मात्र तुझ्यावीण  जगणे असह्य होईल .........
-
© प्रशांत डी शिंदे
दि.१२-०९-१३

Thursday, September 5, 2013

तू फक्त बोलत राहा ............

तू  फक्त  बोलत राहा
मी  साद देतो
शब्दांना तुझ्या  प्रेमाचे संगीत  देतो ..........

शब्द  मला  सुचत नाही
गझल काय मी करावी
पण तू भेटतेस अन
तुझ्या हातातल्या पुष्पांना माझ्या हृदयाशी घेतो
अन  चार  ओळी मी मग  बोलतो
तुझ्यासमोर गायले तेच
माझे  सर्वोत्तम गीत मी समजतो ..........

दिवस  हे  एकट्यात  जातात
आपली भेट  होत नाही
मी  डोळे  बंद  करून श्वास घेतो
अन  तुझा  हृदयातून आवाज  येतो ...........

तू  फक्त आठवत राहा
मी नेहमीच  सोबत असतो
तुझ्या हृदयात राहताना
तुझ्या  डोळ्यांत  पाहताना
मी नेहमीच  तुझ्या  प्रेमात पडत असतो ............

शोना तू  फक्त  बोलत  राहा
मी  तुझा  दिवाना बनून  आयुष्यभर  ऐकत   राहील
तुझ्या ओठांना पाहत राहील
तुझ्या  चेहऱ्यावर  हस्यांना  माझ्याही मनाला आनंदी ठेवील

तू फक्त  बोलत राहा ...............
-
लेखन  : ©प्रशांत डी शिंदे

Tuesday, September 3, 2013

पावसानेही भिजून पहावं.............

एकदा  पावसानेही भिजून पहावं
ओलाव्यात तिची आठवण  त्यानेही  काढून पहावं..........

त्याला ही आसवे आहेत 
पण  तो  त्यात  भिजत नाही

आपल्याला प्रेमाची  किंमत जाणवून  देतो
त्याला म्हणावे  आठवणींना विसरावे कसं ...............

पावसाच्या थेंबांनी ते ही  थोडं शिकवून द्यावं ....

पावसानेही भिजून पहावं.............
-
लेखन : © प्रशांत डी शिंदे