Friday, August 30, 2013

अंत पाहतो तू देवा ....

तुझी  बासरी  प्रेमाची
मी भुकेली  त्या स्वरांची

तुझ्या एका भेटीची
तुझ्या चरणस्पर्शाची ................

अंत पाहतो तू  देवा
रडणाऱ्या अंतकरणाची   ....

डोळे  थकले जरी वाट  पाहुनी
आस  आहे तुझ्या दर्शनाची ..........

अंत पाहतो तू  देवा
रडणाऱ्या अंतकरणाची   ........

तुटतो  रे देवा  विश्वासही आता
गरज  आहे  एका चमत्काराची ............

तहानलेल्या जीवांना ह्या
तहान  आहे  तुझ्या कृपेची ...............

अंत पाहतो तू  देवा
रडणाऱ्या अंतकरणाची   ........

हात  थकले
पाय ही दमले
श्वासही सुटतो देवा
अंत  पाहतो तुही  ह्या गरीबाची ............

अंत पाहतो तू  देवा
रडणाऱ्या अंतकरणाची   ........
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे

Thursday, August 29, 2013

आसवांनी तर आता बहाणाच लागतो !

आसवांनी  तर  आता  बहाणाच  लागतो
पापण्यांशी   भेटण्याचा

जोडलीत  नाती प्रेमाची 
अन घेतले  निर्णय आयुष्यभर 
दूर  न कधी होण्याचा ..................

पण  ह्या हृदयाचे काय
त्याला मात्र  वेदना होतात
हिरमुसून मग  त्याचे ही ठोके बंद  होतात ...........

आसवांनी  तर  आता  बहाणाच  लागतो...... :'(
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे

फुलांसारखे जपले तुला....


फुलांसारखे  जपले  तुला

सुगंधालाही  ठेवले  श्वासात  माझ्या

पाकळ्या पाकळ्या तुटून पडल्या आज

त्यात  शोधत असतो आठवणी तुझ्या .........
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे

स्पर्श तुझा .........

मिठीमध्ये  घेतोस  तू
मला  सारे काही मिळून जाते .........

थोड्याच   क्षणात  मी जणू स्वर्गातच लहरते
होते  मी बावरी प्रेमात तुझ्या रे................

गालांवरचे डाग आसवांचे  मिटून
त्यावर मग हळूच  तुझे ओठ उमटते ..........

मी ही लाजते    स्पर्शाने कोवळ्या ह्या
तुझे  ओठ मग  माझ्या हृदयास हि  छेडते............
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे

Thursday, August 22, 2013

जमत नाही कविता .............

जमत नाही आता कविता
काय  लिहावं  तुझ्यावर
तू  नाहीस  आयुष्यात माझ्या
अन बघ शब्द ही रुसलेत माझ्या ह्या लेखणीवर
लिहावे  काय  मी  पान ओले  होतं
माझ्या अगोदर  त्याच्याच  डोळ्यांत  पाणी  येतं
कविता  लिहून  सजवणारा मी
आज  एकही कविता लिहत नाही
कारण तुझा  तो  सुंदर  चेहरा
माझ्या नजरांना आता  कधीच  दिसत नाही

जमत नाही   कविता
मी कसे  तुला  विसरायचे
तुला  आठवतो  अन सांगतो  स्वतःलाच
आता एकटेपणीच आयुष्य जगायचे ..........

जमत नाही  हे  एकटेपण
जमत नाही दुसरे आयुष्यात  येणं
तुझी  जागा  हृदयातली माझ्या
असेच कुणासही राहायला देणं..........

जमत नाही गं   आता  खरेच   कविता लिहणे
तुझ्या  वाटेवर  डोळे माझे
आसवांना  थांबशील कधी  रे  विचारणे
खरेच  आता जमत नाही .............. 
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे


Wednesday, August 21, 2013

आयुष्यच संपवून गेलो मी....

तिचे  बोलणं
तिचे हसणं
सारे काही  रोजसारखेच
मी मात्र आज पाहतो तिला
आज बंद  डोळ्यानेच ..........

तिचे  खेळणे
तिचे नाक मुरडणे
आज मात्र  दुसर्यासाठी
माझे प्रेम व्यर्थ गेलं
चौकटीत ह्या भिंतीच्या आठवत राहतो मी आनंदाने .......

आज तिला मात्र रडू आले
जेव्हा  माझ्या वाढदिवसाला
घरी जेवायला  सगळेच आले
तिला मात्र मी  दिसेना
देह नसला माझा  तरी
असल्याचा  भास  देतो होतो मी माझ्या स्पर्शाने ..........

तिचे ते आठवणे तिचे निघून जाणे
माझे मात्र  तिला हसत दाराशी  सोडणे
तिला तेव्हा आठवलं
तोच  अखेर होता आयुष्याचा माझ्या
आयुष्यातून निघून गेलो मी  मुकेपणाने .............

आयुष्यच   संपवून गेलो मी आनंदाने ..... आनंदाने ....
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे

Tuesday, August 20, 2013

रक्षाबंधन आली कि तुझी आठवण येते .............

रक्षाबंधन आली कि तुझी  आठवण  येते
तू  येणार म्हणून  मनात आनंदवन  फुलते
तुझ्या भेटीसाठी माझा जीव अधीर होतो
तुला पाहताना मग  हि डोळे भावूक होतात ............

रक्षाबंधन आली की गोड धोड घेऊन येतेस
तुझ्याच हातांनी  त्यातून थोडेच  ग का  भरवतेस
तरीही  पोट भारता माझे ताई तू मायेने  जे मला भरवतेस.............

ताई  तुझे लग्न आठवले की मला  आज हि रडू येतं
तू कशी असशील तेथे मन  सारखेच  विचार करत असतं............

अशीच  राहू दे  सोबत  माया तुझी
असेच माझ्यावर तुझी सावली
तुझ्याच सुखांसाठी  मी
नेहमीच  असेल  गं तुझ्या पाठीशी ...............

रक्षाबंधन आली की ताई  तुझी आठवण  येते
थोडे  हसू  आणि  थोडे  पापण्यांशी  पाणी  येते

मग आठवतात ते  दिवस  आपले बालपणीचे
बाबांनी मारले की तुझे मला  जवळ धरने
मी  उपाशी  राहिलो की  बघ मी  हि नाही  जेवेल म्हणणे
दोघांना पाहून  मग  बाबा हि आपणांस हसायचे ...........

म्हणूनच तर  जग आपल्याला भाऊ बहिण म्हणायचे .......

आठवतात ते दिवस किती ग मी  तुला मारायचो
तुझे केस ओढायचो  अन तुझे चिमटे मी सोसायचो
तरी  शाळेत जाताना नेहमी ताई तुझाच हात  मी धरायचो ...........

रक्षाबंधन आली  ताई  आज तुझी आठवण आली .............
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे

Monday, August 19, 2013

मी जग सोडुन गेलेलो असणार.......

शापित पंखाचे तुला हे अखेरचे पत्र :

खुप प्रेम करतो तुझ्यावर
वेळ मात्र थांबवु शकत नाही..

एक दिवस येईल ,मी जग सोडलेलं असणार
तुला मात्र उशिरा कळेल
कारण माझे मलाच कळलेलं नसणार......

रडशील तु पाहशील जेव्हा
तुझ्या फोनमध्ये नंबर माझा
आठवत बसशील एकटी तु सुन्या त्या जागेवर........

पण....
माझे हसु अन माझे शब्द
कानी तुझ्या पडणार नाही
कारण....

मी जग सोडुन गेलेलो असणार......

तुला छळणारा कुणी नसेल ....मी गेल्यावर
फोन करुन आठवण येते म्हणणारा कुणी नसेल
तुला ओरडणारा कुणी नसेल....मी गेल्यावर

आठवेल माझे तुला चिडवणे
स्वत:ला दुखावुन तुझ्या ओठांवर हसु आणणारा
कुणी नसेल.... मी गेल्यावर

आठवुन तुझे डोळे भरतीलही
आसवे डोळ्यांतुन ओसंडुन वाहु लागतील

फक्त एक फुल ठेव देहावर अखेरचे माझ्या
कारण..
मी जग सोडुन गेलेलो असणार......

मी जग सोडुन गेलेलो असणार.......
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे

दि.१७-०८-२०१३

Wednesday, August 14, 2013

तू म्हणायची ................

तू म्हणायची   जाताना नेहमी येते म्हणायचं
मी  तेव्हा  हसायचो
आपण  कुठे दूर  जाणार  आहोत
सांगून तुलाच  मी वेडी म्हणायचो ..........

तू म्हणायची  मी तुला साथ देईल  आयुष्यभर
मी म्हणायचो तुझ्या श्वासात मला आहे जगायचं
आज  साथ हि नाही अन  श्वास हि थांबला
जोडलेली हि नाती आपण
आज  दैवानेही  खेळ मांडला .............

माझी काळजी करणारी तू
काळजालाच मारले 
विरहाचे  दुख  घेऊन  शपथ  दिले  जगायचे ............

कसे  जगायचे  मी तुझ्याविना 
तेव्हा  तूच  मला विचारायचे
अन तुला i  love  u  म्हणून ती  वेळ मी टाळायचे

किती  फरक आहे बघ आता शोना
तू बोललीस  ते आज सर  काही खरे  झालं
पण तु जे  विचारायची  ते  आज  मी  पाहतोय

दुख  हे विरहाचे आता  मी भिजल्या  डोळ्यांनी बघतोय.............

-

लेखन : ණ
• ©प्रशांत .डी. शिंदे•
दि.१४-०८-२०१३

Tuesday, August 13, 2013

मी एकटाच .........

आभाळाकडे पाहताना मी
.................... ढग  दाटून  येतं
मी  मात्र  तिथेच   बसतो तिला आठवत
जग  मलाच   वेड्यात  काढतं..........

येउन जातो पूर आसवांचा
...........................मी त्यांत  वाहून जातो
नसतो मग किनारा न कुणी तारणारा माझा
पाहत राहतो मृत्यूस मी
निघून  जातो दूर   तो  हि
दुखांसोबत मी  मात्र  तसेच  गुदमरून  जगतो ..............

दूर  दूर  जात  राहतो
तुलाच शोधत  राहतो
.......................वळणावर  येउन  थांबतो
तुझा भास होतो
अन .....
मी  गप्प  राहतो ..........

होईल का  कधी ऐसे
तू  स्वप्न नी
......................मी अस्तित्व  मी तुझे  ........

तू   भेटतेस तेव्हा
पुन्हा  काळोख  दूर  होतो
अन  दोघांच्या डोळ्यांत मग
..............................भूतकाळ डोळ्यातून  वाहतो .....

तू  गेल्यावर  मी  एकटाच  राहतो
पुन्हा त्या काळोखात  मी  हरवून जातो ................

मी  एकटाच  राहतो ............

-
लेखन : ණ
• ©प्रशांत .डी. शिंदे•

दि .१३-०८-२०१३




Wednesday, August 7, 2013

खूप एकटे वाटतंय आज ..

खूप एकटे वाटतंय आज ..

सारे  काही  घडतंय  विचित्र  आज
सोडून  गेलीस तू हि  त्यात
माझ्या  नशिबाने  मला  आज एकटे पाडले
किती  दुख  झालंय  माझ्या  अंतरात ………


कसे  मी  सांगू  कुणास
तुझ्यविना  मी  अधुराच  आहे
थरथरतात  हे हात  माझे
नाही  घेणारा कुणी बाहूंत आज ....

खूप एकटे वाटतंय आज ..

किती ग स्वप्न पाहायचे  तुझे मी
नाही  येत बघ  मरण हि आज ....

सारे  काही  घडतंय  विचित्र  आज ....!!

किती  खुश होतो   मी
तुझ्या मिठीत  असताना
आज एकटे  पडलोय सोबत  फक्त  विरहाची साथ ..
न कुणाशी बोलावे वाटतं
न कुणास सांगावे वाटतं
माझे  हे दुख मला किती  टोचतं.....

सोडून जावे  हि मैफिल
अन  अंधारात निघून जावे
झोपलो आहे मी  इथे
चित  कुणी पेटवावे .....
विरहाच्या आगीत  मी  एकट्यानेच    का जळावे..........

खूप एकटे वाटतंय आज .. ....!!
-
© प्रशांत शिंदे

आखरी इच्छा ...........

हि कथा आहे एका  २१ वर्षीय सोनालीची ..

मुंबईतील ठाणे येते राहणारी हि सोनाली ,
तिच्या घरची परिस्थिती तसे बिकटच होती आई दुसर्यांच्या घरी धुनी भांडी ,घरकाम    आणि बाबा ठाणे येथे रिक्षा चालवून आपले पोट कसेबसे  भारत होते त्यात महागाईमुळे मुलीचे शिक्षण कसेबसे दहावी पर्यंत  ठाणे येथे पूर्ण करू शकले पण त्यानंतरचे शिक्षण हे परवडत नव्हते म्हणून त्यांनी सोनालीचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला ..
पण सोनाळीमध्ये शिक्षांची जिद्द होती तिने आईबाबांना सांगितले  कि मी काम करून शिक्षण पूर्ण करेल माझे ,पण हे बाबांना पटले नाही कि आपल्या ह्या गरिबीचा त्रास आपल्या मुलीला का व्हावा ?..
त्यांनी कसेतरी व्यवस्था करून सोनालीला औरंगाबाद येथे त्यांच्या मित्राकडे शिक्षणास पाठवले ,

बाबांचे मित्र हे सरकारी कार्यालयात कामाला होते त्यांना मुल बाल नव्हते आणि त्यांचा हि जीव सोनालीवर होता तर त्यांनी सोनालीला शिक्षणाची व्यवस्था करून दिली ..
सोनालीनेही तेवढ्याच मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण केले , तिने software क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला आणि तेथेही ती राज्यात दुसर्या क्रमांकाने आली होती .
आता तिने ठरवले आपल्या आईबाबांना आता घरीच बसवून आपल्यासाठी केलेली मेहनत आता कार्यी लावायची ...

तिचा महाराष्ट्र सरकारतर्फे सत्कार करण्यात   आला होता आणि तिला मुंबईतील नामांकित शासकीय  दूरध्वनी कंपनी MTNL मध्ये नोकरी  लागली  ..
आता तिचे एकाच स्वप्न होते ते म्हणजे आई करत असलेले मोलकरणीचे काम बंद करून बाबांनाही मदत करावी . त्यासाठी तिने मुंबई गाठली  आणि मुंबईत येताच आइआनि बाबा खूप आनंदी झाले ..
आपल्या मुलीने आपले नावच उंचावले होते ह्याचा  त्यांना अभिमान होता ..

पण काहीतरी अघटीत घडणार हे कुणास ठाऊक होते .
हा आनंद जास्त दिवस राहिला नाही .
सोनालीचा आज कामावर   जाण्याच पहिला दिवस होता , तिला मुंबईच्या ट्रेनच्या प्रवासाची आता पर्यंत सवयच झाली नव्हती  आज तिचा पहिलाच दिवस होता आईला तिने पहिल्याच दिवशी सांगितले होते  " आई तू आजपासून कामाला जायचे नाही आता जे काही करेल ते मीच करेल .. "आणि  दोघी मायलेकी गळ्यात गळा   टाकून एकमेकींचे  डोळ्यांत अश्रू पुसत होते..

सोनाली ठाणे स्टेशनवर जाऊन बाबांनी दिलेल्या २०० रुपयांचा ट्रेनचा  पास अगोदर काढून घेतला  तिथेही तिला मुंबईची दगदग जाणवली  लाईन मध्ये राहून  तिला काही लोकांचे बोलणे ऐकावी लागली काही लोक मध्ये घुसून आपला पास काढत होती आणि त्यांच्यासोबत थोडा वादही झाला ..
पहिलाच दिवस आणि  उशीर होणार ह्या चिंतेने सोनालीला रडू आले होते पण हिम्मत केली कि काही हि त्रास झाला तरी आपण आपल्या आई बाबांना  आता काम करू द्यायचे नाही ...

तिने ठाणे ते मुंबई ट्रेनचा  पास काढला आणि फस्त लोकल  पकडण्यासाठी प्लाटफॉर्म   वर गेली आणि  पूर्णपणे भरून येत असलेल्या ट्रेन  पाहून  तिथेही  तिला २० मीन  उशीर  झाला शेवटी  तिने कसेतरी  एक ट्रेन पकडली  पण तिला आत जायला जागा नव्हती म्हणून ती  ट्रेनच्या दरवाज्यातच  उभी राहिली आणि  ट्रेन  सुरु झाली  तशी तिची भीती वाढत गेली . कारण तिचा  ट्रेनच्या प्रवासाचा पहिलाच  दिवस होता  घाटकोपर जाताच  अजून गर्दी झाली आणि  विद्या विहार जाताच  तेथील  झोपडपट्टी च्या दिशेने एक  दगड  आला आणि तिच्या डोक्यावर  तो  जोरात  लागला
ती रक्त- बंबाळ   होऊन ट्रेनखाली पडली तिच्या डोळ्यांसमोर आता अंधार  आणि आई बाबाच  दिसत होते  आणि डोळ्यांत अश्रू येत  होते ..
खूप वेळपर्यंत तिला पाहण्यास कुणीच आले नव्हते आणि जेव्हा आले तोपर्यंत सोनालीने श्वास सोडला होता .
तिला  मृत अवस्थेतच कुर्ल्याच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये हि ट्रेन मधील लोकच घेऊन गेले  होते  . तिच्या जवळील कागदपत्रात कामाला रुजू होण्याचे  लेटर आणि आई बाबांचा फोटो  आणि  सोबत  एक डायरी त्या मध्ये तिच्या बाबांचा नंबर  पोलिसांना सापडला .

पोलिसांनी हि  लगेच  त्यांना बोलावून घेतले  आणि  समोर आपल्या  मुलीला मृत अवस्थेत पाहून  दोघांवरही  दुखाचे डोंगरच      कोसळले . त्यांना  काय  ठाऊक होते एक  दिवस  आपली  तरुण मुलगी तिच्या लग्नात आपल्या खांद्यावर  रडणे  सोडून आपल्यालाच तिला  मेलेल्या अवस्थेत घरी घेऊन जावे लागणार  ..
आईला तर  रडता रडता दातखळी     बसली होती  बाबांना  समजत नव्हते  रडावे कि  आईला आवरावे

Tuesday, August 6, 2013

कसे असतं ना आयुष्य ............

कसे  असतं ना आयुष्य ..............

जन्म झाला आईचे  प्रेम  मिळाले
वडिलांनी  कान पकडून शिकवले
शाळेत  जायला लागलो .....

शिकताना  कधी वयात आलो कळलेच नाही
तिसर्या  रांगेत माझ्याच  दिशेने बसलेली मुलगी आवडली
शिकणे कमी तिलाच जास्त  पाहू लागलो ..........

propose  हि करून आलो
तिने हि नकार नाही  दिला
तिच्या  सोबत  मग  कॉलेजला दांड्या मारायला लागलो
पप्पांच्या खिश्यातले पैसे  काढून तिला movie  बघू लागलो .....

तिने मात्र  एक दिवस  बस  आता संपले म्हटले
मग  मी तिला  विसरायला सिगारेट ओढू लागलो.........

कसे असतं न आयुष्य .........

विसरून गेलो तिला
नशिबात  मैत्रीण म्हणून  कुणी  भेटली
तिला  राग येतो म्हणून दुरूनच  सिगारेट फेकू लागलो ...

तिने हि साथ  सोडली  मध्येच
सांगून मी तुझ्यात  गुंतू लागली
दुसरयानसोबत     बोलणे आता
मला  राग रे  देऊ लागले  ........


सोडला  तिने हि साथ  अर्ध्या रस्त्यात
आकाशात    झेप  घेताना  तिने
माझ्या पंखांनाच  तोडून टाकलं  .....

कसे असतं ना आयुष्य

कुणी तरी  आवडू लागतं.......
अन.........
तिला  विसरायला मग  हे आयुष्य हि कमी पडतं......... :(

करमत नाही आता ...........

करमत नाही पाहिल्यासारखे
आता दिवस हि मोठा वाटतो
रात्रीचा हा अंधार कहर बनून माझ्यावरच गरजतो ........

पुसतो मी आठवणी
तरी आठवणी मला छळतात
कधी तर तो मेघांचा पाऊस माझ्या डोळ्यांमधूनच बरसतो ......

करमत नाही आता सये तू सोबत नसतेस
थरथरतात हे हात
आता त्यांना धरायला तू नसतेस
आक्रंदतात विचारांचा तो स्वर कानी माझ्या
मग नयन हि माझे अश्रू बनून बरसतात.......

करमत हि नाही सये आता जगवत हि नाही
एकटे माझी पहाट करणारा तो प्रेमसुर्य माझा
पूर्वीसारखे आता उगवत हि नाही .......

तुला हि कळत असेल क्षणोक्षणी दुख माझे
बांधली होती नाती आपण दोघांनी भावनांचे
डोळे ही अंधुक झालेत
येईल ती रात्र सये अंधारात मला सामावायला...........
 

पाहून घेशील का एकदा अखेरचे
निघून ये रुसवा सोडून आता
मी मोकळा होइल गं  श्वास माझा सोडायला ..............

-
लेखन : ණ
• ©प्रशांत .डी. शिंदे•
 दि .०६-८-२०१३ 

दगडाचा देव तू .........!!

दगडाचा देव  तू
दगडाचे  काळीज तुझे 
भावनांत गुंतुनी विसरलास तुझे   देवपनही.........

तुझ्या गाभारयात  येताना
आता परिस  बनावं लागतं
मी एक क्षुद्र रे मी कोळश्यासमान
तप्त  ह्या लोभी दुनियेच्या
जळतो आहे  मी  जन्मताच ...........

देव तू  श्रीमंताचा
मी तर साधा भिकारी
श्रीफळ काय वाहू  तुला
खिश्यात राहिली नाही रे कवडी.........

दगडाचा  देव तू 
मानायचे  तरी दान  मी कसे ...?
संकट दारिद्र्याचे हि  तरुण घे एवढेच मागणे आहे  रे माझे.......

देव तुला बघताना  आता डोळेही  थकलेत
तुझ्याकडे मागून देवा  सरले हे आयुष्य माझे ..........
-
लेखन : ණ
• ©प्रशांत .डी. शिंदे•