Sunday, September 20, 2015

एकटेपण..

कधी  कधी  खुपच  एकटं  वाटु लागतं
अन उन्हातही चक्क पाउस पडु लागतो..

बोलावं वाटतं बोलायला कुणीच नसतं
आठवणींतच हरवलेलं पुन्हा शोधु लागतं

पुन्हा विचारांची नाव बनते मन वाहत नेतं दुरवर
विचारच ते शेवटी किती झेपायचे..
आसवांच्या ओझ्यात बुडताना किनारा शोधु लागतं

एकटंच बरं वाटतं आठवणीही छळतातच
सुगंध दरवळत येतो कधीतरी
पुन्हा तिचाच आभास होऊ लागतो

किती....किती पळायचे अस्तित्वाशी
तुला शेवटी तुझंच होऊन जगावं लागतं....

©प्रशांत डी.शिंदे....
दि.२०.०९.२०१५

Sunday, August 23, 2015

असेच जगायचे असते..

असे  असेच जगायचे असतं
कुणाच्या  डोळ्यात बघायचे असतं
डोळ्यांतल्या पाण्यातही भिजायचे असतं
दु:ख  त्यांचे समजायचे असतं

असे..असेच जगायचे असतं....

बोलत नाही बरेच चेहरे
ठेचाळलेले  जिकडे- तिकडे
जरा  जवळ  जाऊन हात खांद्यावर ठेवुन
घाबरायचे नाही...घाबरायचे नाही
जरासे का होईने आपणच त्यांचे आधारस्तंभ व्हायचे असतं....

असे असेच जगायचे असतं....
काही  नसतं अगदी जिवही नाही आपला
नाती अन माती एवढ्यांतच रहायचे असतं
कुणाच्यामुळे नाही तर आपल्यामुळे कुणाला आयुष्यं द्यायचे असतं.

येतात संकटे पडतो एकटे
होतो घामाघुम संपतात रस्ते सगळे
हरायचे फिरायचे नाही जगतात आपल्यामुळे काहीजन
तु  हे कधी विसरायचे नसते ....
तुला त्यांच्या सुखासाठीच मिळालाय हा जन्म 
अरे  वेड्या त्यांच्याचसाठीच तर जगायचे असते.....

असे ...असेच जगायचे असते....
अगदी ...असेच....

©प्रशांत डी.शिंदे....
दि.२३.०८.२०१५..

Thursday, August 6, 2015

मी आता हसणार नाही..

तुला करावेच  लागेल दुर मला
तुला जगणे हे माझे ...तसे कधी कळणार नाही

दुर  गेल्याशिवाय आठवणे....तुला जमणार नाही
भेटलो जिथे तेथे .... मला तु  पुन्हा शोध घेऊ नको
तुला  प्रिये  हो  पुन्हा कधी  मिळणार  नाही...

येते  तुझी आठवण मलाही, रडतात हे डोळे माझे
माझे  हसु तुला कळणार नाही

मी  आता  पुन्हा हसणार नाही....

समजुन घे ..ऐकुन घे जरासे ...बोलु दे जरासे
भोग नशिबाचे आहेत हे माझ्या....ते तुला कधी
देणार मी नाही.......

जाईल मिटवुन  सारे .....

विझवु नको आसवांनी चितेला तु 
माझ्या चितेतही मी तेव्हा....तुला मिळणार नाही
समजाव आसवांना तुझ्या
मी तुला पुन्हा मिळणार नाही

मी आता पुन्हा  हसणार नाही......

कोण  होतो  मी.... काय होती कहाणी
घे वाचुन तु आता मला जरासे.... साठवुन घे  जरासे 
मी नजरांना  उद्या दिसणार नाही..

रडतेस  का तु असे ... याचेच मला  भय  तेव्हाही होते
मला  तु सोडणार  नाही.....

मी पुन्हा हसणार नाही....

रंग  ते  दिलेले  मी तुला .... ठेवील तसेच  जातानाही
आसवांत तुझ्या त्यांना कधी ....येऊ  देणार नाही.....

मी आता  पुन्हा  हसणार नाही......

©प्रशांत डी.शिंदे....
दि.०६.०८.२०१५..

Friday, June 26, 2015

माझ्यातला मी....

मी माझ्यातला हरवत चाललोय 
तुला हे कळले नसेल 
मी जर जर जानवू लागलोय ....

तुझ्या समोर तसाच भेटतो तुला मी
अगदी तुला पहिल्या भेटीत भेटलेला 
मनात मात्र मी एकाकी पडत चाललोय ...

सागराला हि एकरूप व्हावे लागते  नदीशी 
पुढे तो ही एकटाच भेटतो 
वळणावर एका नदीही सोडते साथ  
तसाच पाहत किनार्यावर उभा मी 
तुझ्यासोबत असूनही का ठाऊक एकटाच आहे 
खरंच मी हळू हळू माझ्यातून हरवत चाललोय ....

तोच स्पर्श असतो 
तेच प्रेम भेटतं तुला 
वचन दिलेलं तुला आनंदी ठेवण्याचं
मी आजही हि तेच पूर्ण करतो आहे 
तू मात्र सारं विसरली आहे.... 

तुला एक सांगावेच  वाटतं अगदी मनापासून 
माझ्या अंतरातल्या दु:खा पासून 
तू खरेच  अलिप्तच  आहे ....

मी माझ्यातला हरवत चाललोय ....
-
©प्रशांत डी.शिंदे....
दि.२६.०६.२०१५ 

Tuesday, June 23, 2015

पावसानेही थोडं भिजावं....

ह्या पावसाने  हि  थोडं भिजावं
अगदी  तुझ्यासारखं...

तु भेटतेस तसेच भेटावं
त्याच स्पर्शाने ....

ओठांवर  तुझेच  नाव असावं तसेच त्यानेही ओरडुन सांगावं
प्रेमऋतुत ह्या फुलांनी पुन्हा फुलावं तुझ्याचसाठी....

तुलाही भेट  आठवावी मग
चिंब तु भिजताना 
मी थांबवत अडवत जरा  होती तारांबळ ती माझी ....

तु सारंकाही पहावं
पुन्हा पावसानं  यावं 
थोडं भिजावं अगदी  तुझ्यासारखं

पुन्हा तुला  आठवावं
पुन्हा तु भेटावं
विसरुन सारे  रुसवे

©प्रशांत डी. शिंदे....

Sunday, May 10, 2015

आई.....

एक घर असतं तुटकंमुटकं
पडद्याआड दडलेल्या एका अस्तित्वाचं

उन्हात उभी राहुन 
लेकरांना मिळणा~या सावलीचं

पोटाला पिळ मारुन घास तुला 
भरवणारं

तुझ्या दुखांत तुला सावरणारं 
जखमा पाहुन मायेनं गोंजारत रडणारं

नसतं तिचं स्वप्नं काही 
नसते तिला फिकर स्वत:ची तिचा जीव असतो लेकरांत

असतं मायेचं भलं मोठं  हे आभाळ

हे एक नाव असतं जिव्हाळ्याचं
झोपेतही ओठांवर येणारं.. "आई ....

देवाआधी जवळ घेणारं.... माझी आई....
_
©प्रशांत डी शिंदे....
दि.१०.०५.२०१५

Friday, May 8, 2015

तुझ्याचसाठी हे आयुष्यं माझे..

 हातांवरच्या  रेषांचे  चित्र पाहतो  आहे
जगण्यातल्या रंगात सुगंधी तुझा रंग शोधतो आहे

डोळ्यांसमोर दिसतात दु:ख माझे
दुखांस ही हरवतो आहे  ..

तुझ्या हसण्याने बहरला ऋतु  हा
तुझ्या स्वप्नांना पाकळ्यांमध्ये तुज सोपवतो आहे....

हसत रहावी  एवढेच आहे  स्वप्नं माझे
तुझ्याचसाठी हे आयुष्यं माझे.....
-
©प्रशांत डी शिंदे....
 दि.०८-०५-२०१५ 

Friday, April 24, 2015

प्रवास आयुष्याचा ....



माणूस जन्म घेतो 
त्याचे बालपण पाहून सगळेच आनंदी होतात 
आई - बाबा सगळ्यात जास्त ....

दिवस जातात तसे खट्याळपणा कमी होत जातो 
शाळा सुरु होते 
वागणं बदलू लागतं

दफ्तराचे   ओझे 
अभ्यास न केल्यास नापास होण्याची भीती 
घरातल्यांची भीती घेऊन शाळा सुरु होते 
अभ्यास तर होतोच 
पण पलीकडील बाकावरील  कोपर्यातली मुलगी 
तिकडे लक्ष जाऊ लागतं 
ती आवडू लागते अगदी घरातल्यांपेक्षा अधिक 

अभ्यास कमी अन तिच्याशी बोलावेसं फार वाटतं 
अभ्यासात भोपळ्याला सुरुवात होऊ लागते 
तिच्या सोबत जाताना आता भीती मात्र कसलीच नसते 

घरात लपून रात्री फोनवर बोलणं सुरु होतं 
घरातल्या शांततेत हळू आवाज गोधडीतून येऊ लागतो 
सकाळ झाली कि डोळ्यावर झोपेनं शाळेला दांडी मारतो 

दिवस निघून जातात तिचे नखरे वाढतात 
शाळेच्या अखेरच्या दिवसाला 
शाळा नापासचा निकाल अन 
" आता बस.... झाले आता विसरून जा ..
बोलून स्वप्नांना तिच्या पायाखाली चिरडले जातं 

खचतो हरतो घरतल्यावर राग निघू लागतो 
कसे तरी मनातून जावं म्हणून कामास निघून जातो 
मनातून मात्र तिचे चित्र तसेच राहतं

कसे तरी सावरत लग्न होऊन जातं 
आयुष्याला पुन्हा नव्याने जगू लागतो 
लहान लहान गोष्टीने संसार उभा करतो 
मुलांसोबत खेळत आयुष्य अखेरीस पोहोचतं
येतात दु:ख त्यातून कसेतरी आपण निसटतो 

आयुष्य च्या शेवटी मग समोर नाती दिसू लागतं
डोळ्यात पाणी अन अजून जगावे वाटतं
पण आयुष्य हे थांबवून थांबत नसतं
निघून जातो आत्मा कुठेतरी 
शेवटी राहतात आठवणी 
राहतो फक्त देह 
देह जवळ रडणारी काही माणसं
निघून जातो श्वास होतो आयुष्याचा अंत 

प्रवास हा आयुष्याचा 
एक आठवण बनून राहतं ............
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.२४.०४.२०१५ 

Thursday, April 23, 2015

मला विसरुन जा....

तु विसर मला
क्षणांत कसं आलं  ओठांवर
प्रेमाचा असा अंत का ?

निघुन  जावं दुर कसे
कसे मनाला समजवावं
प्रेमाचा काय दोष माझ्या
मिळावा विरह ओंजळीत ह्या

कसे येतं ओठांवर
मला विसरुन जा....

आठवण  बनुन तरी भेटायचं नाही
सोबत मग सारंकाही घेऊन जा
अगदी हे आयुष्यसुद्धा

तुजवीन जगावं कसे
मनाला तेवढं सांगुन जा......

पुन्हा भेटावं वाटतं मनाला
डोळ्यांत तुला सामावुन घ्यावं वाटतं
तुझ्या मिठीत विसावं वाटतं
ह्रदयाला एकदा सांगुन जा
नातं हे आपलं
पुन्हा एकरुप होऊन जा.......

-
©प्रशांत डी शिंदे....
दि.२३.०४.२०१५

कधी संपेल दु:ख माझे .......




काय आहे हे आयुष्यं
का असे जगतो आहे
दुसर्यांनाच मिळावे  सुख
मला दिसावे फक्त दुख हे माझे
दिवस जातात तसे
नैराश्यात 
बंदिस्त मन माझे 


कुणी तरी सांगावे आता
कधी संपेल दुख माझे .......


कुठे चुकलो मी
काय दोष आहे माझा
नशिबाच्या भांडणात कसा हा जन्म माझा
तरी जगतो आहे नव्या स्वप्नांच्या आशेत
कधी तरी यावे सुख ओंजळीतही  माझ्या

जिथे तिथे मिळाली निराशा माथी ह्या
देवाच्या दारात अश्रू वाहतो आहे
कसे दिसत नसावे हे अश्रू माझे तयासी
का ऐकू न यावी हि हाक माझी
तरी देव शोधतो आहे

कसेबसे मिळावे प्रेम क्षणभरांचे  
ते ही नशिबातून हरवते आहे

कोण समजेल दुख माझे
कोण असावे माझे
न सोबती न इथे कोण कुणाचे

कुणी तरी सांगावे आता
कधी संपेल  दुख माझे ....................
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.२३-०४-२०१५

Saturday, March 28, 2015

नशिबाची खेळी....

अजुन कसं हसावं
खोटं तरी कसं जगावं

मनात काहुर दु:खांचा असे
देवासमोर उभे राहुन 
आसवांनी मी ओवाळावं किती  

धडपड सारखीच सुखांना एकदा पाहण्याची
आजवर मिळेना कदाचीत भेट घडावी निजलेल्या देहापाशी

अशी नशिबाची खेळी ही
बारी असे कधी तुझी कधी माझी....
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.२८.०३.२०१५..

Monday, January 19, 2015

कसे सांगायचे तुला ...........



कसे सांगायचे तुला
किती दुख माझ्या ह्या मनात
भेटीचा आनंद की विरहाची नशा झाली  ह्या जीवनात

तुझ्या मनात राहायचे आहे एवढेच स्वप्न माझे
तुझ्यासोबतच आयुष्य जगायचे
बांधायचे होते घरटे छोटेसे  माझे

तु म्हणशील ती दिशा होती
तूच आरसा माझा
तूच माझे जग अन तूच होता आधार माझा


कसे
सांगायचे तुला
हे आयुष्य म्हणजेच आहेस तू
तू नाहीस तर आहे अधुरे जीवन माझे

दुरावा कसा येतो
क्षणिक शब्दांच्या चर्चेत
हरवून जातात स्वप्न अन मिळतात फक्त मोती आसवांचे

कसे
सांगायचे तुला
किती दुख माझ्या  ह्या मनात ....................
-
 ©प्रशांत डी शिंदे....
दि. १९-०१-२०१५