Thursday, June 21, 2012

प्रेम रंग तो गूलाबी

प्रेम रंग तो गूलाबी
तूला खूप आवडायचा

तूझ्याचसाठी तो बागेतला गूलाब ही खूलायचा

त्याला तूझे हास्य आवडायचे

अन मला ही

पण....

तोडताना त्याला तो खूप रडायचा

तो काटयाशी खूप प्रेम करायचा

तो मला तेव्हा सांगायचा

माझे ही तैसेच होते

तूझ्यासाठीच तर मी त्यास तोडायचो

तो तर पून्हा जन्म घ्यायचा

कारण तो देवाला ही आवडायचा

माझे तर नशिबही करूप निघाले

त्याचा विरह तो मज मिळाला

खूप प्रेम होते माझेही

पण...

ती समजू शकली नाही

दोन क्षण प्रेमाचे पाहीजे होते मला

ते ही मला ती देऊ शकली नाही...
-
©प्रशांत शिंदे

तिचे स्वप्नं डोळयांना सूखावून जातं

तिचे स्वप्नं डोळयांना सूखावून जातं
.
काही क्षणाचे असोत पण
प्रेम ते स्वप्नच मिळवून देतं
.
बंद डोळयांचे प्रेम ते
बंद डोळयांतच राहतं
.
उघडया डोळयांनी ते
तूला दूर करून जातं...
-
©प्रशांत शिंदे

भिमा तूझी ही कैसी कहानी....!!

.डोळयांत हया माझ्या येतं हो पाणी
भिमा तूझी ऐकून कहानी

जगलास कैसा रे भिमा
तूझी कैसी कहानी

काही नाही बघ दयावयास मजपाशी
अश्रूच वाहूनी बघ देतो आदरांजली..!!

तूझ्याचमूळे आलो माणसात आम्ही
जगतो आहोत तूझी साथ होती तेव्हा

भिमा तूझाच रे होता सहारा
हटवल्यास अस्प्रूशयतेच्या जिवघेण्या निखारा..!!

डोळयांत भिमा येतं पाणी
कैसी जगलासी
तूझी कैसी जिवन कहानी..!!

धन्य होती ती '' आई रमाई''
तिच आमच्या दलितांची आई
प्रेम तिनेच दिले दलितांना
परके वाटताना मायेची सावली तिने दिली

धन्य झालो मी तूझे नावाने जन्मलो
निळया रक्ताचा मी जय भिम झालो
आठवतं भिमा तूझी संघर्षमयी कहानी
दगडासही रडवतात तूझी गाणी... !!

डोळयांत येतं हो पाणी
भिमा तूझी ही
कैसी कहानी....!!
-
©प्रशांत शिंदे

जगायचय मला पण जगू शकत नाही

जगायचय मला पण जगू शकत नाही

एकटे रहायचय पण राहू शकत नाही

आठवणीच अशा काही दिल्या तिने

ज्यांना मी विसरूच शकत नाही....
-
©प्रशांत शिंदे

सगळेच खरे बोलतात असे नसतं

सगळेच खरे बोलतात असे नसतं

धोका मिळाल्यावर त्याची जान होते

खरे प्रेम मिळेल हे ही कठीणच

असे ते डोळयांत

अश्रूंचा सागर उफाळून आणतात

विरह तेव्हाच जाणवतो
अन....
तेव्हाच प्रेमाची खरी गरज जानवते..
-
©प्रशांत शिंदे

मी एकटा असताना

मी एकटा असतानाही
मला एकटेपणा जाणवत नाही..!!

कारण तूझ्या आठवणीत
मला वेळेचे भाणच राहत नाही
रंगवून रंगवून किती स्वप्ने रंगवीणार मी

एक दिवस तर तू सोडून जाणार
मी रंगविलेली सारीच स्वप्ने
आरशासारखी तूटून जाणार..!!

स्वप्न हे स्वप्नचं असतं
एक दिवस तरी तुटणार ते

पण....

मना-मनाने जोड्लेले
भावनांच नात कसं तूटणार ते

तु दूर गेली होतीस
आणखी दूर जाणार

अन....

हा दूरावा कायम असाच राहणार....!!
-
© प्रशांत शिंदे

दफना दो हमें

दफना दो हमें
आग बूझ नहीं पाएगी

ईंतजार में उनके
वोह जलती ही जाएगी

मर जाए हम
तो सिनेसे लगाना

दिल की आग है ये
आपसे ही बूझ पाएगी

आप ना आए तो
तूम्हें याद बनके तडपायेगी....
-
©प्रशांत शिंदे

एक ही ख्वाब था

एक ही ख्वाब था
तूम संग जिने का

ख्वाब ही रह गया

ख्वाबो पर तो
भरोसा ही नही था हमारा

आप ही बेवफा थे

जो अपना कहकर
बेगाना कर दिया..
-
©प्रशांत शिंदे

बोलायला आज काहीच ऊरले नाही

बोलायला आज
काहीच ऊरले नाही

काही तूला सांगायचे होते
ते ओठांतच राहून गेले

तूझी आठवण माझ्या ह्रदयात
तशीच आहे

आठवणींत तूझ्या
मन ही घायाळ होऊन गेले

मला तू हवी आहेस गं
तू समजून का घेतले नाही

तूझे प्रेमाचे शब्द
त्या कागदावरच आहेत गं.....

काही नको पैसा-अडका
प्रेमाचे दोन शब्द फक्त देऊन जा...
-
©प्रशांत शिंदे

तिला फूल आवडायचे

तिला फूल आवडायचे
आणि मला ती

तिला फूलांच्या पाकळ्या आवडायच्या

मला तिच्या गालांतली खळी

तिच्या साठी दू:ख सारेच लपवायचो

पण...

तिला माझ्या डोळयांत अश्रूच आवडायचे

मी तिला नेहमी हसतच ठेवायचो

पण....

तिला मी रडतानाच आवडायचो....
-
©प्रशांत शिंदे

चालताना सोबती

चालताना सोबती
पाऊले जड झाले

प्रेम नाही पण विरहच
माझ्या नशिबी आले

तू दिलेल्या जखमा
खूपच चिघळत आहेत

जगणे ही माझे नकोसे केले
चालताना पाहतो मी
कोण सोबती आहे माझ्या..??

चालताना ही एकटाच मी राहीलो
एकटा मी एकटाच पडलो

एकट्याचे जगणे तूझे हे
शेवटही एकटयानेच जायचे

रडणे आता सोडणे आहे मज
भेटले तयासी आपले मानूनी
चालायचे आहे मज

एकटा मी एकटेच शेवट आहे मज.....
-
© प्रशांत शिंदे

कफन ना ओढाना हमपर

कफन ना ओढाना
हमपर ऐ यारो

अब तो हमारी अर्थी
सजानी बाकी है

एक फूल आता ही होगा
हाथों में उनके

जीनसे चिता हमारी
जलनी है.....
-
© प्रशांत शिंदे

तूच निशा होती ......तूच चांदनी माझी

तूच निशा होती
तूच चांदनी माझी

प्रेमाचा सूगंध माझ्या

अन..
माझ्या डोळयांत दिसनारे
ते चित्र तूच होती

जवळ घे ना मला
प्रेम थोडं घेउ दे

मिठीत मला घेऊन
दोन शब्द मला ऐकूनी मरु दे...
-
© प्रशांत शिंदे

प्रेम तिने ही केले . ...प्रेम मी ही केले

प्रेम तिने ही केले
.
प्रेम मी ही केले
.
फरक येवढाच होता

मी तिच्यासाठी प्रेम केले
.
अन....
.
तिने काही मिळवीण्यासाठी मला प्रेम केले....
-
© प्रशांत शिंदे

आज तुझी आठवण

आज तुझी आठवण
मला रात्र रात्र जागवत असते ,

तुला शोधत मन पाखरु ही
वेडेपीसे होत असते,

दूरावा असह्य होतं म्हणून

ते एकट्यातच रडत असते..
-
©प्रशांत शिंदे

श्वास हा माझा का थांबत नाही

श्वास हा माझा
का थांबत नाही
जाताना का थांबवून नाही गेलीस..

आठवणी घायाळ करतात मला
मला जगू ही देत नाहीत
ह्रुदयात होती तू माझ्या
त्याला जखमी करुन तू गेलीस

न सांगताच जायचे तर
आठवणी सोबत
का घेऊन नाही गेलीस....
-
©प्रशांत शिंदे

हूंदका तूझा तो

हूंदका तूझा तो
काळजास माझ्या स्पर्शून गेला

वेदना मूक्या तूझ्या त्या
मज बोलून गेल्या

तप्त होता तो आभाळ
तयास ही पावसात बदलून गेला ....

एकटे करुनी मजला
अशी तू सोडूनी गेली

हूंदका तूझा तो
सारेच मज सांगून गेला

मांडला होता डाव संसाराचा
तयास ही तू उधळून गेली

हूंदका तो तूझा
डोळयांना माझ्या भिजवून गेला

तूजकडे येण्याची वाट ती
मजसाठी तू अंधूक केली

आठवणींचे काजवे ते
सोडून मजसाठी
एकटे पाडूनी गेली....

हूंदका तो तूझा
ह्रुदयास माझ्या जखमा देऊनी गेला....
-
©प्रशांत शिंदे

आयूष्य हे एकदाच मिळतं

आयूष्य हे एकदाच मिळतं

आपल्या परीनं जगायचे असतं

रस्ता एकच असतो जगण्याचा

चालत आपण रहायचे असतं

सू:ख अन दू:ख असतं काय.??

येथेच उत्तर
आपल्यालाच शोधायचे असतं

आयूष्य हे मिळतं एकदाच
आनंदाने जगायचे असतं....
-
© प्रशांत शिंदे

माझी बेस्ट friend तिला म्हणायचो

मला ती आवडायची
तिला न मी आवडायचो

माझी बेस्ट friend तिला म्हणायचो

तिच्यासाठी मी
दूनियेशी लढायचो
ती माझी बेस्ट होती

डोळयांतले तिच्या पाणी ते
माझे डोळे ही भिजवायचे

मग तिला हसवून
मलाच मी सूखवायचो

तिला माझी Best Friend मी म्हणायचो

आता ती मला भेटत नाही

पण....

माझ्या मैत्रीचा गंध तसाच आहे

असे काय चूकले मला

सोडून तू गेलीस

मैत्रीची ती वेल जिला मी
जपले

ती कळी विश्वासाची
तोडून

विरह रोग देऊन तू गेलीस

विरह रोग माझ्या मैत्रीलाच
का लागावा...??

उपाय ही कदाचीत तूझ्याकडेच असावा

तूला मी आवडत नाही
मात्र मला तू आवडतेस

कधी तरी असो

पण....

मित्राला तू आठवतेस....

आहेस जेथे कूठे
तू आनंदीच रहावी

मी नाही तेथे

पण....
पाखरांनी भेट तूज द्यावी

पाखरांनी पाहून उंच उंच उडावे

नाते आपले पाखरांनी त्या
आकाशास ही सांगावे

आज मी वाट तसाच पाहतो

तू पून्हा येशील याची
आस मी धरतो

खरंच माझी Best Friend तिला म्हणायचो....
-
© प्रशांत शिंदे

तूझेच स्वप्नं होते

तूझेच स्वप्नं होते
माझ्या ह्या नजरांना
तू स्वप्नांतूनही नीघून गेलीस

तूझ्या मीठीत घेऊन
माझ्या हृदयाला
उदास करुन तू गेलीस ....!!

आठवून तूला मी
आता रोज रडत असतो

पण ......

तू तर भिंतीवरच्या चित्रामधून
जवळ नाही येणार

कृर आहे तो
मला एकटे केले

तूझ्या सोबत मिळणारे
सुख ही सारे नेले....!!

एकटा झालो मी देवा

परत तिला पाठव

मला जगायची आशा
आता परत जागव.....!!
-
© प्रशांत शिंदे

अश्रू हे माझे आज वाहू दे

अश्रू हे माझे आज वाहू दे

तूझ्यासाठीच डोळे हे पाणावतात

खूप आठवतेस तू

का मला समजून तू घेतले नाहीस

आज तू जवळ नाहीस माझ्या

पण....
तूझ्या आठवणींसोबत मला जगू दे.
-
प्रशांत शिंदे

तूझ्या डोळयांत आज

तूझ्या डोळयांत आज
पाहीले मी दूसरेच कूणीतरी

डोळे माझे ही
भरुन आले तेव्हा

पण....

ते अश्रूच तूला दिसले नाही

जे मी तूझ्यासाठी गाळत होतो

प्रेमच माझे होते आंधळे

जे एकतर्फीच करत होतो ....
-
©प्रशांत शिंदे

डोळे भरुन बघू दे

डोळे भरुन बघू दे
उद्या डोळे माझे बंद होतील

तूझ्यासोबत जगण्याची ईच्छाही
तेव्हा संपवून मी जाईल

नसेल उदया कूठेच मी
तू मला भेटून जा

काहीच नको आहे तूजपासून
चार शब्द प्रेमाचे बोलून जा

तू माझी होशील वाटलं

पण....????

ते शक्य नव्हतं

ओंझळीच माझी फाटकी होती
त्यात तूझी काय चूकी होती?

काहीच मागितले नाही तूला मी
आयूष्यात

पण....????

आज मात्र मी मागतो

मरेल उद्या एक फूल शेवटचे
तू मला देऊन जा

भेट आपली शेवटची

दोन थेंब अश्रूंचे

माझ्यासाठी ही तू गाळून जा..
-
©प्रशांत शिंदे

मरण मला येईल तेव्हा

मरण मला येईल तेव्हा
मिठीत तूझ्या मी असावे

मृत्यूने ही वाट पाहत
बाहेरच थांबावं

सोडशील मज जेव्हा तू
त्याने प्राण माझा घेऊन जावे

नाही तर....

दिर्घ आयूष्याच्या पत्रीकेत
नाव तिच्यासोबत असावे...
-
©प्रशांत शिंदे

देवा मला देताना तू

देवा मला देताना तू
हात मागे घ्यायचा

माझ्याशी काय वैर तूझा
तू असा का वागत गेलास....????

आकाश दिलेस तू
पण....????
सावली मिळत नव्हती

घर दिलेस तू
त्याला दार नव्हते ....

दू:ख मला दिलेस
मग....
त्यातून सावरनारी का दिली नाही.....
-
©प्रशांत शिंदे.

तोच किनारा

तोच किनारा
अन....
त्याच लाटा होत्या

तिच वाळू
अन....
त्याच शिंपल्या

तोच आहे मी
काल ही एकटा
अन....
आज ही एकटाच..

तीच खोटी होती
माझे स्वप्न वाटायची
पण....
अपघात होती ती....
-
© प्रशांत शिंदे.

स्पर्श तूझा तो

स्पर्श तूझा तो
आज पून्हा देशील का....??

तूझा तो गंध श्वासात घेऊन
जगायचे मला

तो गंध मज देशील का....??

तूझ्या त्या डोळयांत
माझे मलाच पाहू देशील का....??

रसरसीत ते गूलाब माझे
ओठांनी स्पर्शील का....??

एकदा मिठीत घेऊन
मला पुन्हा जवळ घेशील का....??

आठवतात ते दिवस
तू मला मिठीत घ्यायची

पुन्हा तू माझीच होशील का....??

खूप आठवते गं तू....
पुन्हा जवळ घेशील का....??
-
©प्रशांत शिंदे

नको वाटतं ते रुप

नको वाटतं ते रुप ज्याचा हेवा करते ती

रुपाने भूरळ कसे पाडायचे तिला बरोबर जमतं

मी शोभत नाही सांगून दूर करते ती

रुप म्हणजे काय त्या मोराकडे विचार

फूलवून पिसारा मज बेभान करते ती

हे तूझे रुप तूला आवडत असेल खूप

पण....????

त्या रुपाने कितींना छळत असते ती

कर तूझ्या रुपाचा तू गाजावाजा

दूसरयांना दूखवण्यात कसली ही मजा....
-
©प्रशांत शिंदे

डोळे हे पाणावतात

डोळे हे पाणावतात
पण....
ते पहायला तू नाहीस

पाऊस येतो नी
सारे ओले करुन जातो
पण....
तू मात्र भिजत नाहीस

तू तर ती ज्योतच नव्हती जी
माझ्यासाठी जळणार होती.....
-
©प्रशांत शिंदे

केलंस ना तेच

केलंस ना तेच
जे तूला करायचे होते

झालं ना तेच
जे पाहीजे होते

मला एकटेच पाडायचे होते
मी स्वत:च झालो........
-
©प्रशांत शिंदे

तिचे माझे प्रेम

तिचे माझे प्रेम
एका आरश्यासारखे होतं

कधी माझ्यात ती तर
तिच्यात माझे प्रतिबिंब
शोधत असायचो

आरसा तो त्याला चौकटच नव्हती

तूटून पडला खाली
त्याचे तूकडे - तूकडे झाली

कारण....????

ती विश्वास कूण्या दूसरयावरच करत होती
-
©प्रशांत शिंदे

ए चांद

ए चांद तू आज
उनको मिलके आजा

उन्होने हमें याद किया है.
उनकी आखों से गिरे
आंसू को हमने
अब भी मेहसूस किया है

ये जो बारीश है
वो उनके आंसू है
जो आज हमें
याद कर के गिर रहे है.

कल हम हो ना हो
तो इस चाँद को ही
मिलने केह देंगे......
-
©प्रशांत शिंदे

राहू दे ना एकटेच

राहू दे ना एकटेच
मला एकटेच बरे वाटतं

तूझ्या सोबत बोलताना मी
तूझ्यात गूंतेल सतत वाटतं

तूझे हसने माझ्यावर
जादू करत असतं
तू मला मिळावी म्हणून
ह्रदय रडत असतं

प्रेमात पडून रडल्यापेक्षा
एकटयात रडू वाटतं
राहू दे ना एकटेच
मला एकटेच रहावे वाटतं....!!

नाही करायचे प्रेम
ज्यात माणूस ही रडत असतो
राहू दे एकटेच
मला एकटेच रहावं वाटतंय....!!

प्रेमात नेहमी धोका मिळतो
आपले म्हणून तो
परके करत असतो
नको असे नातं जे
आठवण बणून राहील

आयूष्याचे जगण्याचे
कारण बनून जाईल
राहू दे ना एकटेच
मला एकटेच बरे वाटतं ....!!
-
©प्रशांत शिंदे

विचार करायचा तो तिने केला

विचार करायचा तो तिने केला

तिला फूल हवे होतं
ते तिने तोडलं

त्या फूलाला तोडून
जखमी होते केलं

पण...????

त्या फूलाच्या जखमा तू
पहायचे होते

मला एकटे करुन गेलीस

पण जाताना एकदा

डोळयांतले माझे अश्रू तर
पहायचे होते ....
-
©प्रशांत शिंदे

ती नवरी असते

ती नवरी असते
श्रीमंत ना गरीब असते

लागलेली हळद तर सारखीच असते

डोळे भरुन येतात
ते पाणी तिच्या
पापण्यांत असते

गोरी न काळी असते ती

सोडूनी घरांशी नाते जोडते

ती नवरी असते....!!

सोडूनी जाते माहेर

अन.....

सासरही आपले करते

ती नवरी असते....!!

हात हातात घेऊन
साथ देते

ती नवरी असते....!!

आई - बापाची नी मग
दूसरयाची बाहूली होते
ती नवरी असते....!!
-
©प्रशांत शिंदे

आयुष्यासोबत खेळत बसलो

आयुष्यासोबत खेळत बसलो

वाटलं जे मिळेल ते नशिबातच लिहलंय

त्याला मिटवनारा कोन मी

आयुष्यासोबत खेळत बसलो
नाते आपली मानून

त्यांनीच मागून वार केला

मी एकटा होतो म्हनून

काय माहित होतं
ईथे आपले असे कुणीच नसतं

गोड बोलूनच छातीत
तेच दुखवत असतं

आयुष्यासोबत खेळत बसलो
एक कोडं समजुन

गुंतागुत होती त्यातून मला
सोडवू न शकलो मी.....
-
© प्रशांत शिंदे

माझी चिता पेटताना !!

माझी चिता पेटताना मी फिरुन मागे बघीतले

जे डोळे मला द्वेषाने बघत होते

ते डोळे माझ्यासाठी

ओले झालेले मी आता बघीतले....

आता तरी थांबऊ नको तू मला

माझ्याच देहातून

मला जाताना मी बघीतले

कधी जे मला डीवचत होते

ते आज निरोप देताना मी बघीतले....

प्रेम देऊ शकले नाही कधी

माझे लचके तोडून ईथे

सगळेच निघून जाताना मी बघीतले.....
-
© प्रशांत शिंदे

जाऊन बसलीस कूठे तू !!

जाऊन बसलीस कूठे तू
मला दिसतही नाहीस....

आकाशातली चांदणे ही
तूला शोधायला विसरत नाहीत....

खूश राहा तू
आहेस जिथे कूठे.....

माझ्या तर अंतरी तूझ्याशिवाय
दूसरे कूणी बसत नाही.....

आहे मी तूझाच
दूसरया कूणाचा होणार नाही....

प्रेम केले तूझ्यावर
पण......
मलाच ते कधी मिळणार नाही...
-
© प्रशांत शिंदे

मला वाटायचे तू माझीच होतीस

मला वाटायचे तू माझीच होतीस

माझ्या कडेच पहायची
पाहून हसायची

गोड ओठांवर तुझ्या

माझेच नाव आनायची

पण ....????

ठाऊक नव्हते तुझ्या मनात काय होते ,

एका चुकी मूळे मला तू वेड्यात काढत होती ...
-
प्रशांत शिंदे

एका पेक्षा एक कारण देऊन टाळतेस तू मला

एका पेक्षा एक कारण देऊन टाळतेस तू मला

सारखीच म्हणतेस तूला मी भेटणार नाही

सारखीच म्हणतेस तू मला आवडत नाही

पण ....????

मी नसताना का अश्रू तुझे का आवरत नाहीत तुला

हे तर प्रेमच आहे

नकारात हि
होकार देऊन अश्रू हे सांगत आहेत ..
-
¤प्रशांत शिंदे ¤

हसत हसत गेली ती !!

आयुष्यात माझ्या अंधार करुनी हसत हसत गेली ती
.
जाताना परतीचे पायवाट पुसत गेली ती
.
प्रेम मागत होतो मी
.
पण ....????
.
आयुष्यभर पुरतील एवढे दु:खच देऊन गेली ती .....
-
© प्रशांत शिंदे

रात्र रात्र जागून मी कविता आता लिहित असतो

रात्र रात्र जागून मी कविता आता लिहित असतो

तू तर येणार नाहीस म्हणून

शब्दांनाच भेटत असतो

कळले असती कविता

तर ...????

हाथ कधी सोडला नसता

आता तर तुझ्यावरच कविता लिहित असतो

कोरे कागद मिळत नाही

म्हणून ....????

हृदयावरच कोरत असतो ...
-
© प्रशांत शिंदे

पहिल्या सारखा हसत नाहीस तू...

पहिल्या सारखा हसत नाहीस तू

पहिल्या सारखा बोलत नाहीस तू

सगळे म्हणतात मी खूप बदललोय

कसे आज सांगू तुम्हास .....

मी दुखांनीच पछाडलोय .......
-
प्रशांत शिंदे

वाट पाहत होतो कुणी आपल्याची!!

वाट पाहत होतो कुणी आपल्याची

त्यात तू मला भेटलीस

वाटले तूच ती असावीस

जी माझ्या जगण्यातला अर्थ मला जाणवेल

तूच ती असावीस माझा क्रोध ही शांत करून दाखवेल

माझ्या त्या क्रोधातले प्रेम मला मागेल

जाणशील मी आहे अधुरा जिथे

साथ मला तू देशील

माझ्या जगण्याचा केंद्रबिंदू तू बनून आयुष्यात उजाळा करशील

अशी ती तूच असावीस

तू मला भेटलीस

अंन ....

जगायलाच मी शिकलो

एकटे असताना प्रेम जमवायला मी शिकलो

भेटलीस तू आता बघ प्रेमच प्रेम मी देईल

अर्ध्या वर सोडू नकोस नाही तर
जगणेच मी विसरून जाईल ....
-
© प्रशांत शिंदे

मला आज तुझी आठवण येते!!

मला आज तुझी आठवण येते

गेलेले दिवस पुन्हा नजरे समोर आणते

तुझ्या आठवणीत हरवून जातो मी

उमलत्या काळी सारखे शहारून जातो मी

तू मला समजून का घेत नाहीस

मी तुझाच पण तू का दुसर्याची होत आहेस

एकदा तरी माझ्या डोळ्यातले जाणायचे

मुक्या ओठांतल्या शब्दांना समजायचेस

खरच तू आठवण आज येते

डोळ्यात माझ्या पाणी देऊन जाते ...

-
प्रशांत शिंदे

रात्र हि कशी आज उदास

रात्र हि कशी आज उदास
अशीच नसते उदास
जणू तुझ्याच सोबती असणार आज
तुझ्या संगवे आली आज
 
का जणू चंद्रही गेला आज
आज तरीही जाणवते तू अजूनही माझ्या समोर आहेस
नसताना हि तुझाच भास आहे
मी तुझाच आहे पण का असा भास आहे
तुझ्या संगती मला जगायचे आहे
 
तू आहेस मी आहे नको हि दुनिया
बद- नशिबी आहे हि दुनिया
तिनेच जगणे कठीण केले माझा .
 
दुनिये अजून तू जिंकली कोठे
घेतली माझी माघार मीच केला माझा पराजय
माझी माघार तुला आनंद देईल
पण मला बळ देणारी तूच आहेस
रात्र हि कशी आज उदास !!
-
प्रशांत शिंदे,

Tuesday, June 12, 2012

तेच ते दिवस

तेच ते दिवस 
जे सोबत आपण घालवले
आठवतात मला अन तुलाही आठवत असतील

बोलायचो आपण घरात कोपरा एक शोधून
मग चालू व्हायची चर्चा आपल्याच सर्व मित्रांची
खूप खूप मस्ती आपण फोनवरच करायचो
कधी टोमणे मारून डोळ्यांत पाणी
तर कधी हसत हसत निजवायचो  ..!!

तेच ते दिवस 
आपली खूप महिन्याने भेट व्हायची
मग सारे भेटून कडकडून मिठी मारायचो
कुणी शब्दांनी तर कुणी अंगाने वार करायचो ..!!

तेच ते  दिवस
आपले मन हलके करायला आपण
खूप खूप वेळ बोलायचो
आपणच जवळचे आहोत
म्हणून कधी जीवाशीही खेळायचो  ..!!

तेच ते दिवस
सगळ्यांसाठी जीव तुटायचा सर्वात जवळचा तेव्हा तूच रे वाटायचा
तुझ्यासाठी मी खूप काही सोसायचो

 तरीही बोलताना मात्र हसूच हसू दाखवायचो ..!!

तेच ते दिवस
आपल्यात भांडण होते झाले एवढे दिवसाचे क्षण
त्यांना मनात कुठे गाडले
तरीही आठवतात अन डोळे भरून येतात
सांगताही येत नाही म्हणून
मनामध्येच घुसमळतात..!!

आज खूपच आठवतात ते सोबतीचे दिवस
माहित नाही ते पुन्हा भेटतील कि होईल एकट्यातच   शेवट ....!!

चूकलो मी अन चुकली आहेस तू हि
पण मान्य करायची हिम्मतच दोघांस होत नाही ...!!

ये पुन्हा तू खरच सोबत हवी आहे
माझ्यासाठी तर तुज शिवाय येणारी पहाट नवी आहे ...
वाट बघतो रोज तू पुन्हा तशीच भेटशील
हरवलेले क्षण ते पुन्हा भेट तू देशील

तेच ते दिवस आता पाहिजे आहेत मला ...!!
-
(¯`v´¯)
.`·.¸.·´ ?
¸.·´¸.·´¨) ¸.·*¨)
(¸.·´ (¸.·´© प्रशांत शिंदे

Thursday, June 7, 2012

मी तर कविता लिहतो ..!

वाचायला तर चारोळ्याच  चांगल्या  वाटतात
.
बघायला  तर  त्यातले शब्द  हि  सुंदर  वाटतात
.
एक एक  शब्द  कसा व्यवस्थित मांडला  असतो
.
जसा  मनातल्या   कोपर्यातून  तो काढलेला  असतो
.
मला  नाही जमत  त्या  चारोळ्यात  लिहणे .
.
मी तर कविता लिहतो
.
मला  जमत कवितेत  दु:खच दु:ख कोरणे ....
-
(¯`v´¯)
.`·.¸.·´ ?
¸.·´¸.·´¨) ¸.·*¨)
(¸.·´ (¸.·´ ©प्रशांत शिंदे

Wednesday, June 6, 2012

तूच ना ती ..!!

तूच ना  ती ..!!
मी कधी दिसलो नाही  तर वाट पाहत थांबणारी

तूच ना ती
मला उदास पाहता  हास्यगुलाब देणारी

तूच ना  ती
माझे  अस्तित्व  आहे सांगून

मलाच एकटे पाडणारी

अन....

जाताना डोळ्यांत अश्रुंचे निखारे  देणारी

तूच ना ती  ..!!
-
(¯`v´¯)
.`·.¸.·´ ?
¸.·´¸.·´¨) ¸.·*¨)
(¸.·´ (¸.·´ ©प्रशांत शिंदे

घायाळलेलं मन माझे ..!!

घायाळलेलं मन माझे ..!!

काही तरी शोधात असतं
जायचे असतं दूर
तरी पैलतिरीच थांबत असतं
जखमा दिल्यास  तू ह्या काळजास माझ्या
तरी..??
हे वेडे मन माझे
तुला तुलाच आठवत असतं

घायाळलेलं मन माझे ..!!
असेच  काही सांगत असतं

एकटच असतं जमलेल्या  मैफिलीत  ह्या
अजून हि  तिलाच  शोधत असतं
विसरलेला गीत तुझे ते
सतत समोर माझ्या बडबडत  असतं

घायाळलेलं मन माझे ..!!
-
(¯`v´¯)
.`·.¸.·´ ?
¸.·´¸.·´¨) ¸.·*¨)
(¸.·´ (¸.·´©प्रशांत शिंदे