Tuesday, May 28, 2013

तुझे हे लाजणे ..

तुझे  हे  लाजणे सये

मोहात मला  पाडतं

माझे  दारिद्र्य आहे 

म्हणून ....

मन  माझे तुला चोरून पाहते
-
© प्रशांत शिंदे

Wednesday, May 22, 2013

भेट आठवणींची ..!!

तिच्या मनात फुललेलं

हृदयात तिच्या  दरवळलेलं

आज हि  जपून आहेत   त्या आठवणी

मला  भेट  म्हणून तिने   दिलेलं.....
-
©  प्रशांत शिंदे

Tuesday, May 21, 2013

तुझा सुंगंध ..!

तुझा  सुंगंध  जसा मोगरयास  ही फिके  पाडते

म्हणूनच तर  मन माझे  तुझ्याच  भोवती फिरते

पण  जेव्हा

माझ्या मिठीत  येतेस

प्रेमाचा  रंग  बघ कसा  अजून खुलतो .... :)
-
© प्रशांत शिंदे

 

आता कुठे हसू लागलो आहे मी ....

आता  कुठे हसू लागलो आहे मी
तुला  विसरलो  आहे  असे  सांगतो
खरे तर आठवणी सोबतच जगू लागलो आहे मी ..

आता तुला  माझा  कसलाच त्रास  होणार नाही
कारण  ते शहरच तुझे  सोडून आलो आहे मी
सारी नाते  सारे  सोबती  सोडून
आज  एकटे जगू लागलो आहे मी ....

एक खरे सांगू तुझ्याच आठवणी  आहेत
म्हणूनच  जगू लागलो आहे मी ....

आठवतात  ते  दिवस मला आज ही
जेव्हा  तू  माझ्या जवळ असायची
कधी  रे आपण  लग्न करू 

सारखे मला बोलत असायची
पण  माझे  दारिद्र्य 

माझ्या  प्रेमात ही  आडवे  का यावे
जे  तुला  आज  दुसर्याचे पाहत  यातना भोगतो आहे मी ....

तुला मात्र  माझे  दुख नाही  मी दाखवणार
कारण  मला ठाऊक आहे
कळेल तुला  हे  तेव्हा 
डोळ्यांतले तुझ्या पाणी बनणार आहे मी .....

हरलो आहे मी  आयुष्याच्या  ह्या  युद्धात
पाकळ्यांसारखे गळून  पडलो आहे मी
तुडवत आहे  भावनांना  माझ्या आज सारेच
तरी  अश्रू  लपवून  जगतो आहे मी ....

तुझा फोटो  छातीशी  ठेवून
तुझ्या आठवणींत जगतो आहे मी
आता खरेच  हसतो आहे मी ....
- 

© प्रशांत शिंदे

Monday, May 20, 2013

कुणाच्या दुखावर कधीच नाही हसावं !!


पाण्यावर पहावं

आकाशाकडे बघावं

सुख मिळेल तिथुन घ्यावं

पण..

कुणाच्या दुखावर कधीच नाही हसावं.....
-
© प्रशांत शिंदे

Thursday, May 16, 2013

कधी तरी येशील !!

कधी  तरी  येशील 
अशी आस  आज हि आहे
तरी जगात आहे कारण
जगण्याला ह्या
तुझ्या आठवणींची साथ आहे  ......
-

© प्रशांत शिंदे

Tuesday, May 14, 2013

अवचित सारे घडतं ..!!


अवचित सारे घडतं ..!!

कधीच दुरावा मिटला नाही
वाढत गेला अजुनही

दोघांस कधी जवळ आणलेच नाही...

अभागी आहे मी
जे नाते कोणतीच
मला लाभले नाही
जवळ केले त्यांना
पण आपले त्यांनी मानलेच नाही

अवचित सारं घडतं..!

दु:खच दु:ख जगण्यात हया
एकांताने कधी सोडलेच नाही

जगण्याची आशा नाही
तरी जगतो आहे
कारण मरणानेही माझे ऐकलेच नाही ....

तुझी एक आशा आहे
तु आजही मला ओळखत असशील
पण का मला एकदाही
'' कसा आहेस शोना ''
विचारतही नाही....

खुप आठवण येते तुझी
कसे सांगु तुझ्याविना राहवत नाही....

अवचित सारं घडतं....!!
-
© प्रशांत शिंदे

मी जळलो तेव्हा काही आसवे पडली !!

मी जळलो माझ्या जवळ काही आसवे तेव्हा पडली असतील
आसवांना पाहू शकणार नाही मी
कारण त्या आसवांनीच
माझे हात कधीतरी धरले असतील
मी जाईल निघून कधीच पुन्हा दिसणार नाही
पण .....
माझ्या आठवणी त्यांच्या डोळ्यांत
तसेच जिवंत मी तेव्हा ठेवल्या असतील.....

मी जळलो तेव्हा काही आसवे पडली असतील
मी निघालो आहे आज
काही पाकळ्या नक्कीच माझ्यावरती पडल्या असतील ....

काही आसवे नक्कीच पडली असतील....

© प्रशांत शिंदे
दि .९-०५-२०१३

भेट शेवटची !

नको  येऊ  आता  भेटीस हि  माझ्या
भेट   क्षणिक  होऊन  जाईल
तुझ्या  हातातली    ती  फुले हि
तेव्हा माझीच होऊन जाईल
जेव्हा  माझ्या  श्वासाचे
तुझे  नाव  घेणे स्तब्ध होऊन जाईल ....
लपेटली असेल मी  चाद्दर  त्यात  कोणताच  रंग  नसणार
सफेद  त्या  कपड्यासारखा देह हि माझा
नजरे आड होऊन  जाईल
तू  आणलेली ती  फुले हि  तेव्हा  सुगंध  सोडून  जाईल
राहील मग आठवणी माझ्या
मग  वेळो वेळी त्या तुझ्या  डोळ्यांतून  वाहून  जाईल ....

नको  येऊ भेटीस  माझ्या
हि भेट  आता शेवटची  होऊन  जाईल ....
-
© प्रशांत शिंदे
१४-०५-२०१३

Monday, May 13, 2013

थेंब दवांचे !!

थेंब  दवांचे  आयुष्यावर  पडले 
भिजून गेले  क्षणभर  सुखाने
वेळ  निघून  जाता वेळ सरता सरता
सुकून  गेले  ते  सुख  ही आयुष्यभर .........

© प्रशांत शिंदे

Friday, May 10, 2013

कुणी तरी असावे ....

आसवे पुसणारे हि कुणी तरी असावे

चेहऱ्यावर  हसू आणणारे  कुणी  तरी  असावे

रडणे तर रोजचेच  झालंय

त्यातून सावरणारे  कुणी तरी असावे....
-
© प्रशांत शिंदे

काही आसवे पडली असतील....

मी जळलो माझ्या  जवळ  काही  आसवे तेव्हा पडली  असतील
आसवांना   पाहू  शकणार नाही मी
कारण  त्या  आसवांनीच  
माझे हात  कधीतरी  धरले असतील
मी  जाईल निघून   कधीच  पुन्हा दिसणार नाही
पण .....
माझ्या आठवणी त्यांच्या  डोळ्यांत
तसेच  जिवंत मी तेव्हा ठेवल्या असतील.....

मी जळलो  तेव्हा   काही  आसवे  पडली असतील
मी  निघालो आहे   आज
काही पाकळ्या  नक्कीच   माझ्यावरती  पडल्या असतील  ....

काही  आसवे नक्कीच  पडली असतील....

© प्रशांत शिंदे
दि .९-०५-२०१३

खूप प्रेम आहे तुझ्यावर माझे !!

माझे   प्रेम नाही   हे तू  खरेच खोटे बोलली होतीस
माझे  प्रेम तर  तुझ्याच साठी होते
त्याला  प्रिये  तू थोडे  तरी  जाणायचे होतेस
पण....
ठाऊक  होतं मनात तुझ्या हि  गंध    दरवळलाय
हेच   तर नकळत  माझ्या प्रीतीच्या पुष्पाने

तुला   न कळत   माझ्याकडे   ओढवलय....  
खूप  प्रेम आहे  तुझ्यावर   माझे
शोना .......
-
© प्रशांत शिंदे
दि .९-०५-२०१३

Tuesday, May 7, 2013

तुझा हात हातात होता ....

तुझा हात हातात  होता
मला जगावे   वाटत  होतं
तू सोबत नाहीस  आज शोना
म्हणून तुझा  फोटो  पाहूनच
मरण यावं वाटत होतं ....

-
© प्रशांत शिंदे


नातं ..


Friday, May 3, 2013

माझी इच्छा !!

माझी  इच्छा !!

माझ्या  देहाची  राख तू
तेव्हा  हातात घेऊन  रडणार
जेव्हा  मला आठवत तुझी ओंजळ सुखाने भरलेली असणार
मी मात्र निघून गेलो दूर कुठेतरी
अन ...
माझेही आयुष्यही  मी  तुझ्या नावी केलेलं   असणार

वेळ  येत राहील ,प्रसंग हि येतील
काही  चांगले  तर  काही  वाईट करून जातील
तू  मात्र  घाबरायचे नाहीस
मी नेहमीच  तुझ्याच आजूबाजूस  असणार
माझा  देह  नाही  दिसेल  तुला
पण   माझा आत्मा नक्कीच  दिसणार
जेव्हा  बिघडलेल्या  गोष्टींत तुला माझी ओळख दिसणार ....

तू   मात्र रडायचे नाहीस
न  मला आठवायचेस
कारण 
तुझे  डोळे  पुसणे माझ्या हातात  तेव्हा नसणार .... !!

माझी  हि  इच्छा   तुला नक्कीच  पूर्ण झालेली  दिसणार .....
नक्कीच  पूर्ण झालेली  दिसणार ....

-
© प्रशांत शिंदे
०३ -०५-२०१३
दु . १:३७ मि.