Tuesday, October 29, 2013

का करतोस प्रेम माझ्यावर सारखे ती विचारते ...........

का करतोस प्रेम माझ्यावर सारखे ती  विचारते
का तुझीच  ओढ  लावलीस
जागेपणी हि स्वप्न  पाहते तुझेच 
का रे इतके जीव लावलेस....

म्हणालो मी  तेव्हा  सये
जगणे  हे असह्य माझे
कधी  दुख तर सारखे  डोळ्यांत आसवे
स्वप्नभंग  नेहमीच अन नेहमीच मी  एकटे
फक्त  नजरेने होकार  दिलास तू 
मी  तुझ्या  प्रेमात पडलो
फक्त  कपाळावर तुझ्या प्रेमाचे ओठ मी  टेकवले ............

माझ्या ह्या प्रेमाची निशाणी  अंगावर  मी गोंदवले
असेच  सोबत राहा  सये
तूच जगण्याचा आधार  झालीस
सुख काय असतं  प्रिये  तुझ्याच  मिठीत मी अनुभवले ...............
-
©प्रशांत डी शिंदे

Friday, October 25, 2013

माझ्या मनाला समजावून पाहिलं.....!

माझ्या मनाला  समजावून  पाहिलं
कधी कधी  थोडं हसून ही पाहिलं ...........
 

खूप दुख आहेत मनाला
त्यापासून   थोडं दूर  जाऊन पाहिलं ...............

जमलंच नाही विचारांच्या जाळ्यातून 

मुक्त होऊन फिरायला
मला नको हवे होतं ते
मी आज  तुझ्या  डोळ्यांत ही आसवे पाहिलं ................

मी चुकलो सये
माझ्या मनाची  स्थिती खूपच  विचित्र
नसतं तुझ्यावर चिडायचं मला
तरी ही तुझे मन  दुखावतो
तुला माझ्यासाठी रडताना पाहून 
मी मलाच खूपच  दोषी  धरलं...............

समजून घेशील का  सये माझ्या  वेड्या प्रेमाला
तुझ्या आधारासाठी  मी  रोजच
त्या  दगडासमोरही  फुल  वाहिलं
कधी नव्हे ते माथा  टेकवून
त्याच्या चरणांत अश्रू  मी वाहिलं..............

किती  वेडे हे मन 
किती वेडी ही माया
राग ओसरून  गेल्यावर तुला मी  माझ्या मिठीत  पाहिलं ................
-
©प्रशांत डी शिंदे
दि.१८-१०-२०१३

भेट तुझी माझी .............

तुझ्या प्रेमाची  आस
आज हि मनाला  तशीच  आहे

तुला ही  आठवत असेलच  
ते  दिवस आपल्या  प्रेमाचे

ते फुल बागेतले आपणांस पाहून  खुलायचे
आज ही वाट पाहतात ते दोघांच्या मिलनाची

त्यांच्या  सुगंध  दरवळायला
बघ  आनंस  साद  ते  देत आहेत ......
-
©प्रशांत डी शिंदे




Wednesday, October 23, 2013

आठवते ती मला आज ही ..............

एकाच  रंगाने  रंगलो होतो  दोघेही
एकाच वेळी  प्रेमात पडलो होतो दोघेही

नजरेस नजर भिडली होती
तेव्हा मोहरले होते दोघेही

पण ह्या प्रेमाची  आयु  कमी होती
तिला माझे प्रेम कळलेच नाही कधी

तिच्या मनात वास्तव्य   होते  दुसरे कुणाचे तरी
पण  तिने  हे सर  लपवलं
खोटं का  असो ना पण
तिने  थोडे मला जगायला शिकवलं ..........

ठरवले मी मनाशी आता
निघून  जायचे  दूर 

वेगळे विश्व  बनवायचं
रोज  ठरवतो मी आता
पण  आठवते ती मला  आज ही ..............
-
©प्रशांत डी शिंदे

Tuesday, October 22, 2013

काय किंमत आहे माझी, मला कधीच कळली नाही ....

काय  किंमत  आहे माझी
मला कधीच  कळली नाही
जे माझ्या ह्या गुलाबाला स्वीकारणारी आयुष्यभर लाभली नाही

त्या  अश्रूंची धार ही
जिने कधीच  एकटे मला सोडले नाही

भिजत राहिलो आयुष्यभर
जसे त्यांचेच ऋणी होतो मी

भोगत राहिलो मग  दुख
सोसायाचेच होते जे अबोलपणी  
खरेच नव्हते सोबती माझ्या तेव्हा  कुणी

वाटत होते  असेच जायचे मोकळ्या हाती
पण .....
कुठून तरी  आले ते फुल अखेरीस माझ्या ही  देहावरी ..............

माझ्या ही जाण्याचे शोक का  करावे कुणी
निजू द्या  आता मला
डोळे लागलेत थोडे तरी ..................

काय किंमत आहे  माझी 
मला कधीच कळली नाही
अन आज ह्या देहावर  आलेल्या  फुलांनी ही 


-
©प्रशांत डी शिंदे

निजू द्या मला ....

निजू द्या मला थोडे तरी
आज कुठे डोळे मिटलेत
आयुष्यभर सोसले दुख मी
आता कुठे  ते ह्या  वाहत्या  डोळ्यांचे
अश्रू  सारे परतीला एकवटलेत    ....
-
©प्रशांत डी शिंदे

Monday, October 21, 2013

मन................

वाऱ्यामध्ये  वाहून  जावं
बेभान लहरीसारखे  मोकाट फिरावं
किती  वेदना  ह्या  विचारांचे
वाटत थोडं  मिठीत तुझ्या हलके व्हावं...............

समजून घेतेस मला
माझ्या डोळ्यांतल्या  त्या अश्रुधारांना
मग तुझासोबत वाटतं आयुष्याने असेच सुगंध बहरावं .............

मन आहे  हे कधी  हसायला लावतं
तर कधी एकटेच राहायला शिकवतं
किती आवर घालायचे ह्याला
प्रेमानेच  सारखे समजवायचं ...................

वेड्या मना  सोड आता ते  विचार
तुलाच  तुझे आयुष्य घडवायचे आहे ..................
-
©प्रशांत डी शिंदे
दि.२१ -१०-२०१३




Monday, October 14, 2013

जरी माझी झाली नाहीस .............

जरी माझी झाली नाहीस
तरीही  मी तुझ्यावर  प्रेम करतो ............

तुला  पाहण्यासाठी मन माझे  
दारात तुझ्या  पाखरू बनून थांबतो ..........

प्रेम केलंय मी
तुला  कधी  रडवायचे नव्हते
तुलाच मिळवायचे होते  फक्त
पण  आज तुलाही  हरवून बसलो मी ......... :(
-
©प्रशांत डी शिंदे

Thursday, October 10, 2013

दुखांचाच बाजार...........

दुखांचाच  बाजार  आहे हा
खेळण्यासारखे  मोडून पडतो आम्ही
मिळतात  काही  हातही  सावरायला
कधी कधी  असे हातही 
पाठीवरून हरवून बसतो आम्ही ........
-
©प्रशांत डी शिंदे

दगडाचे काळीज माझे ........

दगडाचे काळीज माझे

असे तुला  सतत वाटतं

तुझ्या आठवणींत  त्यालाही पाझर फुटतो

हे एवढं लपवताना फक्त  मलाच   ठाऊक असतं .........
-
©प्रशांत डी शिंदे

Tuesday, October 1, 2013

ती भेट अखेरची होती ................


ती भेट अखेरची होती
ओळख मात्र जुनीच होती ...........

कालची रात्र  अन  दिवसही माझ्यासाठी शापितच  होती
कारण जिच्यावर जीवापाड  प्रेम केले
तिच्या गळ्यात आज दुसऱ्याचेच मंगळसुत्र  होते .........

कपाळ ही कुंकवाने भरलेले
ती आता सौभाग्यवती होती
अन नेहमीसारखेच माझे नशीब शापित होते  ..........

कालपर्यंत  माझ्याच मिठीत जगणारी
माझ्यासोबत आयुष्याचे वाट चालणार म्हणणारी
माझ्या डोळ्यांत एक थेंब न पाहणारी
आज मात्र  गप्प होती
मला  विसरून जा 
आता तुला माझ्याशिवाय  जगायचं म्हणत
माझ्या  डोळ्यांतली आसवे
माझ्या इतकेच   तिलाही तेवढेच  भिजवत होती ........

मला ठाऊक होतं  ती  आजही  माझीच होती
नशिबाचे  युध्द होते हे
अन त्यात मी नेहमीच  हरत आलो
कालच्या युद्धातही तेच  झाले
पण ह्यावेळीस मात्र मी  माझ्या  प्रेमालाही गमावून आलो होतो  ...............

ती भेट अखेरची होती
ओळख मात्र जुनीच होती .............

ती तिच्या संसारात जगू पाहत होती
मी तिच्याविना दिवस  मोजत होतो
पण  माझ्यात जीव तिचा
एकट्यात नेहमीच मला आठवत रडत होती ..............

अशी माझी प्रेम कहाणी 
सुरु होण्याआधीच  श्वास सोडत  होती ...............

-

©प्रशांत डी शिंदे
दि .०१-१०-१३