Sunday, May 10, 2015

आई.....

एक घर असतं तुटकंमुटकं
पडद्याआड दडलेल्या एका अस्तित्वाचं

उन्हात उभी राहुन 
लेकरांना मिळणा~या सावलीचं

पोटाला पिळ मारुन घास तुला 
भरवणारं

तुझ्या दुखांत तुला सावरणारं 
जखमा पाहुन मायेनं गोंजारत रडणारं

नसतं तिचं स्वप्नं काही 
नसते तिला फिकर स्वत:ची तिचा जीव असतो लेकरांत

असतं मायेचं भलं मोठं  हे आभाळ

हे एक नाव असतं जिव्हाळ्याचं
झोपेतही ओठांवर येणारं.. "आई ....

देवाआधी जवळ घेणारं.... माझी आई....
_
©प्रशांत डी शिंदे....
दि.१०.०५.२०१५

Friday, May 8, 2015

तुझ्याचसाठी हे आयुष्यं माझे..

 हातांवरच्या  रेषांचे  चित्र पाहतो  आहे
जगण्यातल्या रंगात सुगंधी तुझा रंग शोधतो आहे

डोळ्यांसमोर दिसतात दु:ख माझे
दुखांस ही हरवतो आहे  ..

तुझ्या हसण्याने बहरला ऋतु  हा
तुझ्या स्वप्नांना पाकळ्यांमध्ये तुज सोपवतो आहे....

हसत रहावी  एवढेच आहे  स्वप्नं माझे
तुझ्याचसाठी हे आयुष्यं माझे.....
-
©प्रशांत डी शिंदे....
 दि.०८-०५-२०१५