Friday, December 30, 2011

kya hua tera wada

Jab Jab Phool Khile - Pardesiyon Se Na Ankhiyan Milana - Mohd Rafi


प्रेम म्हणजे काय मला कळले ना कधी...

प्रेम  म्हणजे  काय मला    कळले  ना कधी... 
प्रेम  म्हणजे  काय  मला  कधी  कळले  नव्हते 
ती  भेटली  मनात  जसे  बेभान  वार्यांचा  वादळ  उठले 


भान  हरवून  बसलो मी , 
असे  कधी  झाले  आणि  ह्याचा  अर्थ  काय 
 न  कळले  मला  कधीच , 


हा  एक  भास  समजून  मी  पाहिले   न  कधी  
पण  रात्र  हि  मला    मोठी  वाटायला  लागली   
तिचे   रूप  स्वप्नात  दिसणे  म्हणजे  काय  असणार 
 मला  कळले  ना कधी 
 कारण  प्रेम  म्हणजे  काय  मला   कळले ना   कधी ..


तिचे   हसणे  सतत  कानात  माझ्या   सप्तसुरां         सारखे  राहतो 
 ती  दूर  असून  मला   जवळ  असल्याचा  भास  होतो , 
 हे का  होता  मला  कधी  कळलेच  नाही ,
 तिचे  ते  डोळे  म्हणजे  मला  माझे  जग  दिसतं  
  त्यातच माझे  स्वप्नांचे  घर  असेल   , 
 पण  ते  शक्य  नाही 
   कारण  प्रेम  म्हणजे  काय  मला   मला   कळले ना    कधी  


तिने  हि  केले  असेल  प्रेम   माझ्यावर कधी 
  तिने  मला  दिला  हि  असेल  इशारा  तिच्या  होकाराचा  
 पण  काय  करू  मी 
 प्रेम  म्हणजे  काय मला     कळले ना    कधी... 


आज  ती  नसताना  माझी  होणारी  हुरहूर  पाहता 
वाटले  मला  प्रेमच  झाले    असावे  
 पण  प्रेमाचा   स्पर्श  मला भेटलाच  नाही  कधी 
 जरी  झाले   प्रेम  आता  पण  हे  कळले उशिरा   मला 
आता पशाताप करतो आहे मी
  कारण आता ती  माझी  उरलीच  नाही ..
हो..  प्रेम  म्हणजे  काय मला    कळले ना  कधी... 

Thursday, December 29, 2011

एखादी गोष्ट जी तुम्हाला हवी आहे त्या मागे धावण्या पेक्षा तिच्या कडे दुर्लक्ष केलेले चांगले , कारण ती गोष्ट दुसर्या साठी असते आणि जे आपल्या साठी असते ते आपल्या ला न मागताच मिळून जाते ..
-
प्रशांत शिंदे

नसेल उद्या इथे मी तू उदास होऊ नकोस !!

नसेल उद्या इथे मी  तू  उदास होऊ  नकोस 
मी निघून गेल्यावर  आठवत बसू नकोस ..

एकटे पण  बोचेल तुला   असे  वाटून घेऊ नको 
मी  जवळ  आहे  वाटून   तू  वावर 
मी  उद्या नसताना  तू स्व:तच  सावर .

मी  होतो  तेव्हाही तुझाच   आणि आजही  तुझाच  समजून घे 
 होऊ न शकलो जरी तुझा मी 
तरी  तू  दोष स्वत :ला देऊ नकोस ..

नसेल उद्या इथे मी  तू  उदास होऊ  नकोस 

आकाशाकडे   बघ कधी  मीच   तुला  दिसेल 
रात्रीच्या  चांदण्यात   कोपरयात बसलेला एका  तारा    मीच असेल 
  
माझ्या  मनाचे पाखरू  आज हि  तुझ्या कडेच  राहतं
 आठवण सारखी  येते म्हणून  तुलाच पाहत राहतं 

आठवण  तर  येईल  तुला माझी   पण  उदास   उद्या  होऊ नको 
प्रेम  माझे  खरे होते म्हणून  उद्या  दु:खात  कधी  राहू नकोस ..

हसत  हसत  निरोप  दिला मी   
रडू नको  कधी 
मनात तुझ्या राहील  सदा मी 
 तिथून  काढू नको कधी ..


नसेल उद्या इथे मी  तू  उदास होऊ  नकोस 
मी निघून गेल्यावर  आठवत बसू नकोस ..



भावनांची वादळे  उठली अचानक 
छेडताना तार हि  तुटली अचानक 


दृष्ट कोणी लाविली  स्वप्नास माझ्या 
उमलण्या आधी कळी  सुकली अचानक 

वादळे बैचेन आणि अस्वस्थ लाटा
कोणती  नौका अशी  बुडाली अचानक 


भावनांची वादळे  उठली अचानक ..


पाहून आलो होतो   चीतेवरती  तिलाही
बहरलेल्या ज्वालात  ती  दिसली अचानक .


भावनांची वादळे  उठली अचानक 
छेडताना तार हि  तुटली अचानक ..


Wednesday, December 28, 2011

जीव ..

" जीव म्हणजे माझ्या मते एक वारा एक वादळ , आपल्या सोबत आपल्या मध्ये  फिरत असतो जो पर्यंत आपला जीव आहे  . ज्या दिवशी ते वादळ थांबेल  त्यादिवशी आपण  ह्या जगाशी नाते सोडलेले असेल .."
                 


 एक अखेरचा श्वास जो आपल्याला जाणवतो आपल्यातून  निघून जात  आहे  पण ज्याचा  तो  श्वास  जात असतो  त्याचे काय होत असणार  तो श्वास सोडून जायला नक्की तयार असतो  कि त्याला हि  भावना असतील ?, एका क्षणात  तो अखेरचा श्वास  जातो आणि  सगळे शांत होऊन जातं . हि  शांतता नकोशी वाटत असते  कारण तो व्यक्ती आपण हरवतो  त्याला आपण गमावतो ..
               


   जिवंत असताना कितीही  लागले तरी  त्याच्या वेदना लागणारयाला तर होतंच असतात  पण      त्या त्याच्यापेक्षा  दुसर्यांना म्हणजे  आपल्या जवळच्या  व्यक्तीला अधिक होतो . पण त्या वेळेस जीव असतो म्हणून ते सहन करून घेतो पण ज्या वेळीस त्याला जाळतात  त्यावेळीस  त्याला काहीच  वेदना  होत नाहीत पण तो जाळ  आपल्या मनात  एक विचार देऊन  जाते  ती म्हणजे  आज हा आपल्याला  सोडून  गेला ,  उद्या ह्याच  जागी मीही असणार  त्यामळे मी असा विचार  करतो जे काही करतो आहे  त्यातून आपली  एक चांगली  आठवण  म्हणून   तरी कुणासोबत  , कुणाच्या  मनात घर करून  राहील  असे करायचा  प्रयत्न मी करतो ....  
               

Tuesday, December 27, 2011

शोधशील मला जेव्हा..

शोधशील मला  जेव्हा  मी  निघून  जाईल 

शोधशील मला  जेव्हा  तुझ्या  डोळ्यात पाणी येईल 

निघून  हि जाईल  इथून  जेव्हा  माझी गरज  नसेल 


पण  कधी  डोळे बंद  कर तुझ्या मनात मीच असेल 


पाहत  बसशील  वेड्या नजरेने    पण  मी कुठेच नसेल 


आठवण तर  करून  बघ कधी   


  एक गोड   हसू  बनून  तुझ्या गालावरती दिसेल 


माहित आहे  तू  खूप  विचारात असतेस 


वेड्या  ह्या दुनिये मध्ये  माझीच प्रतिमा  नसेल 


राग  नाही येत  तुझ्या  अश्या वागण्याचा 


नाही म्हणून सांगत असतेस  वाईट  वाटतं   ह्याच  बहाण्याचा ..


माहित  आहे मला 


आज हि  तू  एकटेपणी  मलाच  शोधात येशील 


कंपनलेल्या  हृदयाला तूच   स्थिरता    देशील ..


मी  दिलेल्या पुष्पाला किती दिवस जपशील 


लिहलेल्या  कवितेतून आठवत मला बसशील ...


नाही  झालीस माझी  तू  


पण  आयुष्य  तुझे  आनंदी  असताना  मी  पाहिल  


आठवण   इथे येईल माझी पण  मी जगातून निघून जाईल ..



Monday, December 26, 2011

मला ठाऊक आहे तू परत येशील

मला ठाऊक आहे तू परत येशील 


अंधारलेल्या आयुष्याला उज्वलीत तू करशील 
तुझ्या हास्या मधल्या गोडव्याने 
आयुष्य हे माझे बहरेल 

तुझ्या साथीने माझे भविष्यही उद्या बदलेल 
सागरात हि लाटांची होते जशी खळ खळ
तुझ्याच साठी राणी माझी होत असते धावपळ
 

जीव आहे तो पर्यंत साथ तुला देतो
आकाशातले तारे सारे तुझ्याच साठी घेतो
ठाऊक आहे राणी तू परत येशील 


माझ्या मनातले सारे प्रश्न तू सोडवशील ,,
नदीच्या कडे वरती वाळू जशी उरते
तसेच माझे मन कसे तुझ्याच भोवती फिरते
ठाऊक आहे मला तू परत येशील ..
करू नको दूर अशी
कि जगणे कठीण होईल
तू दिलेल्या रंगा मधून सारे रंग निघून जाईल .
वेळ थोडा घेशील पण तू परत येशील
ओसाडलेल्या आयुष्याला तूच राणी फुलवशील .
.


मला ठाऊक आहे तू परत येशील 
-
प्रशांत शिंदे

एक आठवण !!

मी रोज  पाहतो  आपले  सोबती आपले मित्र,  नातलग त्यांना  स्मशान   भूमीत नेताना पाहून आपल्याही मनात  धाकधूक होत असते ." माणसाचे कसे  आहे ना जो पर्यंत जिवंत असतो  तो पर्यंत  त्याला आपल्यासाठी जेवढे करता येत नाही त्याहून  जास्त तो दुसर्यांसाठी करत असतो , ज्या मुळे  दुसरे  त्याच्या  शेजारी  त्याच्या आठवणी घेऊन रडत असतात त्याच्या  आठवणी ताज्या करतात , पण काय फायदा ना तो ह्या जगातून निघून गेलेला असतो ." तो कधीच  ह्यापुढे त्याच्या सोबत न कसली चर्चा ,ना कसले सल्ले ना काही मदत  तो करू शकत आणि ह्याच साठी सगळ्यांचा जीव त्यांना दोष देत असतो  कि हा व्यक्ती  मेल्यावर  माझे काय होईल ? ..  ह्याने आपल्यासाठी  खूप काही दिले आहे  खूप मदत केली . पण  आपण खरेच काही केले का त्याच्या साठी  ह्याचाही  पश्चाताप तिथे तो करत असतो .
मी हि गेलो  काही वेळा त्या स्मशान भूमीत त्यांना जळतांना मी हि पाहिले तो जो जीव नसलेला व्यक्ती म्हणजे  माझा मित्रही होता  आणि माझ्या आजी ला हि  जळताना  पाहिले  पण आजी जेव्हा ह्या जगात मला पोरके करून गेली  त्यावेळीस हा विचार आला कि  माणूस आपल्याला सोडून जाऊच कसा शकतो ?.
    मी पाहिले  लाकडांवर  आपल्या माणसांना झोपलेले  त्यांच्या काहीच  हालचाली  होत नव्हत्या . हालचाली करणे  आणि आपल्याकडे  पाहणे त्यांनी केव्हाच  बंद केलेले  असते .त्यांचे दु:ख  होते आणि दु:ख म्हणजे आठवणी ह्या आठवणी त्याच्या नावाने आणि त्याच्या कार्याने आपल्या सोबत राहतात .
त्यांना त्या लकडासोबत   जळताना  असे  वाटले  हा माणूस  कशासाठी  ह्या जगात आला होता  ,आता हि  ज्वालांमध्ये जळतो आहे  आणि आयुष्यभर सु:खापेक्षा  दु:खाच्या  अग्नीत जळत आला आहे .
प्रत्येकाला सु:ख  शेवट पर्यंत मिळत नसता तो कितीही श्रीमंत असला तरी तो जेव्हा  शेवटचे  दिवस मोजत असतो त्या वेळेस   जे  त्याला  दिसतं  ते दु:खच असतं.  ज्या वेळेस  जवळच्या व्यक्तीला हरवतो  ना त्या वेळेस  ती होणारी  जाणीव म्हणजे  दु:ख . जे प्रत्येकाच्या जीवनात असतात ज्या पासून आपण पळू शकत नाही .             हा .. फरक फक्त एवढा आहे कि गरीब असतो  त्याच्या कडे  ते जरा जास्तच  असतं  आणि त्यातूनही तो सु:ख मिळवत असतो  आणि जो  श्रीमंत  असतो त्याला  केव्हा तरी दुखाची जाणीव  होते .
 ह्या  सारयातून जो  जातो  तीच आपल्या कडे  आठवण  म्हणून  राहते ..