Tuesday, June 25, 2013

माझे मरण आले तेव्हा !

माझे मरण आले  तेव्हा
सगळी कडे निरव शांतता होती
मी एकटाच  राहिलो पाहत बंद  डोळ्याने

तिथे लोकंही  खूप जमून 
माझा देह सोडून दिल्यावर
माझी चिता  पेटवत  होती  ....
-
© प्रशांत शिंदे

तुला पाहण्याची ईच्छा.......

तुला पाहण्याची ईच्छा माझी

तुला भेटण्याची हुरहुर ही

आज ही तशीच आहे

तुझ्यासोबतचे क्षण ही तसेच आहेत

पण ...

तु मात्र माझी नाहीस

खरे तर माझेच नशिब कमजोर

जे तुझे नाव हातातल्या रेषांमध्येही नाही

म्हणुनच तर प्राण सोडण्याची

माझा हा अर्ज आजही

दालनात देवाच्या तसेच तातकाळत आहे....

-
© प्रशांत शिंदे

Tuesday, June 18, 2013

जेव्हा पासून break -up झालंय

जेव्हा पासून  break -up झालंय
मन कशातच लागत नाही
शोधत असते नजर माझी

ती मात्र कुठेच  दिसत नाही ....

खरे सांगू तुला
मी तिच्यावर खूप प्रेम करतो
पण तिला कुणास ठाऊक  हे का कळत नाही 
तिने हे असे वागावे
मला खरच काही  कळत नाही  ..

चुकी माझी एवढीच ना
मी  तुझी  जास्तच  काळजी करतो
का हे  तुला डोळ्यांत माझ्या दिसत नाही

जेव्हा पासून  break -up झालंय
सारखा  फोनकडे  पाहत असतो  मी
तुझा  call नाही तर एखादा massage  तरी येईल 
म्हणून फोन एक क्षण ही दूर ठेवत नाही मी

आता काय उरलंय  जगण्यात ह्या
प्रेम  माझे  हरवून  बसलो आहे मी
प्रेम युगुलांना पाहून  आता
त्यांच्यातच  तुला  पाहत असतो मी


जेव्हा पासून  break -up झालंय
वेड्यासारखाच    रात्री ही जागत असतो मी
तुझा  आवाज  ऐकू येईल म्हणून
डोळे मिटून  तुला आठवत असतो मी ...


जेव्हा पासून  break -up झालंय....
रोजच मरत असतो  मी ......
खूप  एकटा असतो मी .....

जेव्हा पासून  break -up झालंय.... :(
-
© प्रशांत शिंदे
१८-०६-२०१३

तुला पाहण्याची ईच्छा माझी..

तुला पाहण्याची ईच्छा माझी
तुला भेटण्याची हुरहुर ही

आज ही तशीच आहे


तुझ्यासोबतचे क्षण ही तसेच आहेत

पण ...

तु मात्र माझी नाहीस

खरे तर माझेच नशिब कमजोर

जे तुझे नाव हातातल्या रेषांमध्येही नाही

म्हणुनच तर प्राण सोडण्याची
माझा हा अर्ज आजही

दालनात देवाच्या तसेच तातकाळत आहे....
-
© प्रशांत शिंदे

माझ्या नशिबात प्रेमच लिखित नाही ...!

ही  हार  माझी नाही 

मी तर  हरतच आलो आहे
 

फाटक्या   ह्या ओंजळीतून  सुख सांडलेले
 

मी  नेहमीच  पाहत आलो आहे
 

तू गेलीस  आज
 

हे  ही  एक  दिवस होणारच होते
 

कारण माझ्या नशिबात प्रेमच  लिखित नाही ....
-
© प्रशांत शिंदे
१८-०६-२०१३

Thursday, June 13, 2013

मध्यस्थी पाऊसाची !!

आज  तू भेटलीस अन  पाऊसाने सुरुवात  केली
जनू  आपल्या भेटीला

बंधनात बांधण्यास  त्यानेच  मध्यस्थी केली
तशी तुझी माझी भेट हि पहिलीच होती
तरीही  तुझ्या ओठांनी माझ्या ओठांशी  बोलून
मनातली भीती हि  बघ कशी दूर  करून दिली
विश्वासाची  हि  मिठी म्हणे आता कधीच  सोडायचे नाही
म्हणूनच तरहे आयुष्य तुझ्याच साठी मी अर्पण केलं........
-
©प्रशांत शिंदे
दि .१३-६-२०१३

Tuesday, June 11, 2013

आज ठरवलंय तुला विसरून जायचं....

आज  ठरवलंय  तुला  विसरून जायचं
तुला कधीच आठवायचे नाही


तुझी खूप आठवण येते
कुणास दाखवायचेही नाही
आठवून तुला रडायचे नाही
कारण मी आज  ठरवलंय तुला  विसरून जायचं......

खूप  एकटा होतो आयुष्यात
जगण्याची आशा हि नव्हती
तू  भेटलीस  जणू  जगण्याला कारण  मिळाले
पण  हे काही क्षणांचेच होते

तू हि आयुष्यातून  निघून  गेलीस
सुखांना माझ्या ग्रहणच    लागून गेलं....
कुठवर मी विरह  सोसायचे  
ठरवलंय आता पुन्हा मागे पहायचे  नाही
तुला  विसरून जायचं ....
-
©प्रशांत शिंदे
दि .११-६-२०१३