Friday, December 26, 2014

एक अपघात आणि जन्मलेली माणुसकी ची कथा ....


 तिला उशीर झाला होता . एक पाय दारात ठेवतच आईला हाक मारली "आई मी जात आहे" . आईही "सांभाळून येगं   बाई म्हणाली ."
सकाळी ८ वाजले होते ऑफिस ला जाण्यासाठी सर्वांची धडपड . धावतच स्टेशनला पोहचली ८.१६ मि. ची रोजची ट्रेन पकडण्यासाठी ती उभी राहिली . एका हातात bag आणि एका हातात फोन आणि ट्रेन येई पर्यंत त्यात सुरु होता candy  crush .
रोजच्यासारखे कल्याणला फास्ट लोकलसाठी platform नंबर ७ वर उभी होती .तिने कशीबशी ट्रेन पकडली पण ट्रेन आधीच खचाखच भरून आलेली होती त्यामुळे आज लटकत जावे लागेल ह्याचा तिने अजिबात  विचार केला नाही .तिने ती ट्रेन पकडली आणि एका दोन्ही हाताने   दरवाजा पकडताच गाडी सुरु झाली . तिला आज ऑफिसमध्ये लवकर जायचे होते कारण आज महिन्याचा पगार आणि पगारात वाढ होणार होती , ती आतल्या बायकांना ओरडत राहिली ती आत चला, मावशी आत सरका मी पडेल पण कुणीच ऐकायला मागत नव्हते शेवटी तेच झाले डोंबिवली येण्या आधीच तिचा हात सैल पडला हात सुन्न पडले आणि ती गाडीवर येणारा दगड जसा पुन्हा मागे फेकला जातो तसाच ती ट्रेनखाली पडली . तसेच डब्ब्यात ल्या   बायकांना जाग आली अहो ती मुलगी पडली शेजारील खिडकीतून आवाज आला काय झाले " मुलगी पडली .." हाच आवाज ट्रेनला होता .
पण तिचा हात सुटताना तिला जाणवले आता आपण पडणार आहोत आता मी वाचणार नाही तिने आईला मनोमनीच हाक मारली " आई ..." आणि आईच्याही जीवाचा ठोका वाजला . ती खाली पडली तिच्या अंगभर रक्त होते कुणीच तिच्या मदतीला धावले नाही पण तिथून जाणारा एक फटके कपड्याचा मनुष्य तिथे पडलेल्या प्लास्टिक बाटली वेचत होता आणि त्याला ती मुलगी दिसली . त्याने मागे पाहिले त्याला काहीच सुचत नव्हते त्याने मागे पुढे कसलाही विचार न करता समोरून येणाऱ्या ट्रेन समोर आपल्या मळकट पिशवी सोबत  उभा राहिला आणि ट्रेन थांबली तसेच त्याने त्या मुलीला ट्रेनमध्ये टाकले  अजूनही तिच्यात जीव आहे कि नाही ठाऊक नव्हते ती जगेल कि मरेल  माहित नव्हते तरी तो तिला घेऊन गेला .ती बेशुध्द होती डॉक्टर तिला ICU मध्ये घेऊन गेले तेवढ्यात तिच्या घरच्यांना कुणीतरी कळवले .
तिची आई तिचे बाबा हातातले काम सोडून तसेच धावत रडत तिकडे पोहचले .तिथे   फक्त रडण्याच आक्रोश होता  डॉक्टरांनी सांगितले काही सांगू शकत नाही पण आम्ही प्रयत्न करतो जर ह्या मुलीला येथे पोहचण्यात थोडा वेळ झाला असता तर हि मुलगी कधीच मेली असती . आणि थोड्याच वेळात आतून आवाज येतो सर मुलगी जिवंत आहे .
पण एवढ्यामध्ये ज्या मनुष्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते ज्याने तिला इथपर्यंत आणले होते .
तो निघणारच तेवढ्यात  आईने त्यांचे पाय धरले आणि त्यांचे आभार मानले  तुम्ही आमच्या मुलीचे प्राण वाचवून आमच्यासाठी देवासारखे धावलात  तेवढ्यात तो व्यक्ती म्हणाला : "  देव मी नाही ताई मी तर माणूसच  पण हो मी माझ्यातला माणूस शिल्लक ठेवलाय तसे आज ह्या दुनियेत ठेवला असता तर तुमची मुलगी काय अजूनही प्राण वाचले असते ...."

ह्या कथेवरून एवढेच सांगायचे आहे कि माणूस कसाही असो मदत करणे हे आपले कर्तव्य आहे कोण गरीब कोण श्रीमंत असे कुणीच नाही मोठी आहे ती फक्त माणुसकी ......


-
लेखक ©प्रशांत डी शिंदे....
दि. २६/१२/२०१४ ....

Thursday, December 11, 2014

हरवत जाईल सारंच, रिकामी हाती मी तसाच..


हरवत जाईल सारंच, रिकामी हाती मी तसाच
पाहत वाटेवर उभा , डोळ्यांतुन हिंमत वाहुन गेली
माझे स्नप्नं येईल अस्तित्वात
ईच्छा तरी ह्या मनात ....

दु:खांचंच राज्य आहे, जगत आलेल्या आयुष्यात
सुख असावं साधंभोळं
दुर उभा तसाच माझ्या दाराशी
होईल अस्त दुखाचा मग सुख होईल एकरुप नशिबाशी

असेच जगत आहे आयुष्य
रिकाम्या हाती घेऊन स्वप्नांची झोळी
देवाकडे मागावं म्हणतात
पण देवही निद्रेतच
कसे जागवावं त्यालाही, खिशाही आहे रिकामाच

वेडी ही आशा, असेलही मी वेडाच
नात्यांसाठी जगतो आहे
नाहीतर मृत्युसोबत लपंडाव हा थांबवला असता केव्हाचाच


झगडत आहे नशिबाशी
सुख येऊ दे माझ्याही अंगणात
पण हे खोटंच असावं नशिबही
खरंच
हरवत जाईल सारंच, रिकामी हाती मी तसाच..
-
©प्रशांत डी शिंदे....
११-१२-२०१४

Tuesday, December 2, 2014

एक चंद्र असतो , एकच असते चांदणी ....

एक चंद्र असतो
एकच असते चांदणी
स्वप्न लक्षात कुठे राहतं
फक्त एकच चेहरा असतो ह्या नयनी

ती असते सामोरी
मी मात्र तिच्या ओठांव
री हास्य बनुनी
ती हसते मी पाहतो
माझ्या गप्प राहण्यानेच ती करते मला जवळी ....


एक चंद्र असतो
एकच असते चांदणी
सोबतच राहायचे आयुष्यभर
वचन घेतात दोघं सात जन्मीची

ती असते त्याची
तो असतो तिचाच
तरी मुद्दाम डिवचतो कधीतरी
म्हणतो ही आहे माझी प्रेयसी  

 
त्याला वाटते गंमत
ती होते आगीचा बंब
हा हसतो अन तिची आग मात्र प्रचंड 


रात्र होते तरी दोघांत असतं अंतर
प्रिये तुझाच आहे मी अन तुझाच असणार
तुझी केली होती थट्टा
तुझ्या अश्या रागाचा मी गं आहे दिवाना 


तिचा राग हरवतो
तिच्या गुलाबी चुंबनात    
असेच असावं आयुष्य आपले
दुखांतही   प्रीतीचा आसरा


असे हे प्रेमी अन सोबती आयुष्याचे
एक असतो चंद्र अन एकच असते चांदणी ...........

-
©प्रशांत डी शिंदे....
०२/१२/२०१४ ....

Tuesday, November 4, 2014

तुझी सौभाग्यवती.....

ओठांना टोचलं तर राग मानु नको सख्या रे
मी अशीच साधीभोळी
कुठं देऊ मी वेळ सजावया 
मला कुठं कळतं फँशन अन नटनंथटनं
मला आपली साडी चोळी बरी रे....
पण प्रेम माझे जाणुन घे
हातातल्या जखमा ह्या
तुझ्या स्पर्शाचे औषध दे

दासी समज तुझी कि तुझीच मी बाहुली
माझ्या दु:खात मागे रहा उभा तु होऊन माझी माऊली
तुच माझं प्रेम तुच आहेे अस्तित्व 
तुझ्याच मिठीत होऊ दे बंद डोळे
जाऊ दे मला अंगणातुनी होऊन तुझी सौभ्यग्यवती....
-
©प्रशांत डी शिंदे....
04-11-2014



Monday, November 3, 2014

माझं हे आयुष्यं .............

माझं हे आयुष्यं म्हणत
आयुष्यं निघुन जातं
शेवटी काय? ....
तर म्हणे देहामधला हा आत्मा
शरीर सोडुन जातं

कुठं जातं?
कुठुन येतं काही ठाऊक नाही
फक्त मरणातंर त्याला
कुणीही नाव ठेऊन जातं....
-
©प्रशांत डी शिंदे....
२२ /०८/२०१४

दान नशिबाचं...........

हातातुन सांडलं सारं
सुखानं भरलेलं दान नशिबाचं

डोळ्यांनी चक्क बदलत गेलं
 

नात्यांनीही दारातच रोखलं
आभाळात तेव्हा काळोख दाटला
अन पावसालाही माझे हसु आलं


ना अंगाणात जागा ना
त्या भिंतीआड आपले कुणी
माझं आयुष्यं जसे त्या फुटक्या काचा....


वेचुन घेतल्या जरी त्या कुरुपच आता
जवळ कुणी घेणार नाही म्हणे
काढतील रगात ह्या


डोळ्यांत आला प्राण
अन तो ही उगीच भांडतो आहे
 

जगुही द्यायचे नाही तुला
मरणही द्यायचे नाही

त्या देवाचा निरोप आलाय
पैसे हातात नसतील जवळ
तोवर तुझ्या
रचं एक लाकुडही जळायचं नाही......
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.26-08-2014...

नियतीही सारखे खेळ खेळत असते..........

नियतीही सारखे खेळ खेळत असते
म्हणे दु:खांमागुन सुख येत असते


डोळ्यांसमोर कोसळतात माणसेही
अन वाली तयास कोण दिसत नसते....


दुखांची खेळीच वेगळी असते
आपण फक्त सोंगट्यांसारखे वागत असते....
-
©प्रशांत डी शिंदे....

१/०९/२०१४ 

Thursday, August 7, 2014

कोपरा दुखांचा ..

ती रात्रही तशीच
त्या वेदनाही तश्याच
थोडावेळ ओलेचिंब करून गेला तो पाऊस
मात्र दुखांचा कोपरा कोरडा बघ तसाच .........
-
©प्रशांत डी शिंदे....


Wednesday, July 30, 2014

भिजून जाऊ दे पावसात ह्या ..........

भिजून जाऊ दे पावसात ह्या
ओलेचिंब नयनांस ह्या
 

कोरडे पडले मन हे
स्तब्ध वाटे चारी दिशा
 

भिजून जाऊ दे पावसात
पुन्हा ओल्या होऊ दे आठवणी तुझ्यामाझ्या ....
-
© प्रशांत डी शिंदे
दि.३०-०७-२०१४

Thursday, July 10, 2014

तू माझ्याविना जगायला शिक ..............

जगायला शिक माझ्याविना तू
पुन्हा  स्वप्न नवे पाहायला शिक

जीवनाचे डाव खेळलो आपण
मी हरलो तू फक्त जिंकायला शिक

हातात नशीब गोंदलय  तुझ्याही
एकटेच दुखांशी लढायला तू शिक

हरवलेत दोन जीव
एकाचे हृदय तर स्पंदन दुसरयाचे
देवाकडे अश्रू गळून
प्रेम आपले परत मागायला शिक

जगायला शिक वेडी
नसेल उद्या मी तू
माझ्याविना 
जगायला शिक ..............
-
©प्रशांत डी शिंदे
दि.१०-०७-२०१४ 

Tuesday, June 10, 2014

कालही माझीच अन आजही फक्त माझीच आहेस ....

दूर गेलीस निघून
आठवणी मागे ठेवल्यास

तुझे स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांत
आज फक्त अश्रुधारा उरल्यात

तुलाही ठाऊक असेलच
माझ्या हृदयाचे हुंदके
पण ....
तू येऊ शकणार नाहीस ठाऊक आहे मज ते

मनाला हि आता समजावतो आहे
तू कुण्या दुसर्याचीच झाली आहेस

पण मनन मनात नाही
म्हणतं सारखं
" तू कालही माझीच अन आजही फक्त माझीच आहेस ....."
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.१०-०६-२०१४

Monday, May 26, 2014

वेदनांचा रंग कसा..

वेदनांचा  रंग  कसा
प्रश्न माझ्या मनी सदा

सख्या समान   सोबती जसे
पाण्यासारखाच गंधही दिसे

भिजतो रोज तयात
अन डोळ्यांमधुनी दरवळे आसवे

वाहुनी जाऊनी स्वप्न जीवाचे
पायाखालीही अंधारच मज दिसे
-
©प्रशांत डी शिंदे
दि.२६-०५-२०१४
 

Wednesday, May 21, 2014

आवडतं मला पुन्हा नव्याने तिचे व्हायला ....

सोपं आहे आपलेसं करणं
प्रेम करणं मात्र कठीणच

गुलाब किती सुंदर असतं
काट्यासारखं  सोबत राहून  जगणं
आहे खूप कठीणच


आवडतं ते गुलाब सर्वांनाच
पण जीव त्याचा त्या काट्यांतच

असंच आहे आमचंही हि नातं
आंबट कधी
तर कधी खूप गोडच
तूटून  पडलो तरी
आवडतं मला पुन्हा नव्याने तिचे व्हायला ..........

-
©प्रशांत डी शिंदे
दि.२१-०५-२०१४

Thursday, May 15, 2014

आठवण म्हणजे फक्त तीच असते ............

पाऊस येतो आभाळ दाटतं
वारा वाहत येतो
बेभान होऊन वेड्यासारखा तोही
नुसताच फिरत राहतो

त्याला कारण एकच असतं
आठवण......
आठवण  अन फक्त आठवणच
ह्या वेदनेचं नाव असतं
कुणाला दिसत नाही  पण
शरीर मात्र खूपच घायाळ असतं ........

होतात वेदना पण काय करणार
ह्यावर मलम लावणारा आपलं असा कुणीच नसतं
मित्र असतात थोडे असतात सोबती
पण ते निघून गेल्यावर हे घर  एकट्याचे
पुन्हा मोकळेच असतं ............


तरी मैफिल जमवतो
थोड्या गप्पा मी हि मारत असतो
पण क्षणात विचार बदलतो
उठतो दोस्त पाहत राहतात
माझ्या ह्या आजाराने तेही त्रस्तच असतात .........

निघतो तिथून जातो तिथेच पुन्हा
जिथे हातात हाथ तिने
धरला होता पहिल्यांदा

अन त्या जागेला स्पर्श करून
पुन्हा आठवणी ओल्या करतो

वाटतं ती सुद्धा  माझी आठवण काढत   असणार
तिचं अन माझं नातं कधीच संपलं असतं

तरीही मन मात्र कुणाचाच ऐकत नसतं
आता सारखी चिडचिड होते
म्हणून एकटे राहायला लागलो  ................

ओरडते आईही माझी
अरे विसर आणि उठ तू पुन्हा
मी दाखवत नाही दुख माझे
पण आई मात्र सर ओळखते
चेहऱ्यावरून हात फिरवत
काळजी घे रे म्हणते .....................

आठवणींचे असेच असतं
ती आपली कधीच नसते
दुसर्यांनी आपणांस दिलेली नको असलेली
पण हवीहवीशी गरज असते ............

हीच ती आठवण
आठवण म्हणजे फक्त तीच असते ............

-
©प्रशांत डी शिंदे

दि .१५-०५-२०१४








Wednesday, May 14, 2014

दुखाची कथा आज डोळ्यांतुनी घे वाचुनी ..........

कोसळली ती रात्र
चांदण्यांच्या भांडणात
एकाच चंद्र एकटाच
राहिला पाहत कोपरयात

वाऱ्यानेही घेतली माघार
आभाळाचेच   का ऐकायचे मी आज
न कारण न कसलाच वाद होता
प्रेम केलं हाच तो गुन्हा होता

आली ती लाट कशीतरी
किनारयावरच जरा विसावली
दुखांपासून दूर व्हायचे म्हणून
वाळूमध्ये   ती सामावली

दुखाची कथा आज डोळ्यांतुनी घे वाचुनी ..........
-
©प्रशांत डी शिंदे

Monday, May 12, 2014

असा कसा हा जीव ....

हातातल्या रेषा पुसट होताना पाहीलं
जेव्हा नशिबात नव्हते आनंद
वेदनांना बाहुपाशात येताना मी पाहीलं .......

डोळ्यांत अश्रू दाटलेले
मी स्तब्ध तसाच ....

संध्याकाळच्या कोवळ्या उन्हातही
पाऊस कसे भिजवतो खपल्या
आठवणींना चिघळताना 
जीवाशी खेळताना माझ्या मी पाहीलं ......
 

असा कसा हा जीव
मरतानाही केवढ्या वेदना 

-
©प्रशांत डी शिंदे

दि.१२-०५-२०१४   

Sunday, April 27, 2014

नशिब ..

हात तिचे रंगले होते
मेंहदीत नाव नविन आज कोरले होते

मी पाहीले नाही तिला
ती नवरीसारखी खुपच सुंदर दिसत होती

माझ्यावर आभाळच कोसळले होते
ती आता माझी नव्हती

काय करू मी तिला सांगुही शकलो नाही
प्रिये माझे हात दारिद्र्याने धरले होते..

तु खुष रहा एवढीच माझी ईच्छा होती
तु गेल्यावर जिवानेही साथ माझी सोडली होती...
_
©प्रशांत डी शिंदे
दि.27-04-2014

Wednesday, April 23, 2014

ठरवले आहे मी विचार नाही करायचे ....


आता ठरवले आहे   मी  विचार नाही करायचे
हरवून जाऊन तयांत आपण नाही झुरायचे
.
जगावे हे आयुष्य घेऊन थोडा  मोकळा श्वास
झालंय हे मन दूषित वारंच  आहे विचारांचे 
.
मी बळी नाही पडायचे ठरवले आहे पक्के
खचून जातो माणूस राहत नाही कुणाचे
.
मनात ध्यानात नसतं काही
घरात भासही होतात विचारांचेच
डोळ्यांसमोर दिवसाही अंधार दाटतो
मग भूकही पोटातच रडते
प्रश्नच आहे विचारांचे
उत्तर थोड्यांनाच सापडतात
इच्छा तेव्हा एकच मला आता मरायचे ..........
.
कित्येक आहेत रुग्ण ह्याचे
त्यावर  नाही तोडगा
नशिबाचा बळी कुणी तर कुणी बळी आहे   धोक्याचा
कुणी घालतो साकडे देवाला
कुणी नशिबालाच दोष देतो
वाढलेल्या ताटातही  त्याला विचारांचेच भोजन दिसतं..........
.
आता मात्र  खूपच झालं
कसे निवांत बसायचे
ठरवले आहे प्रेमानेच आता विनवणी त्याला घालायचे ........
.
जाऊ दे रे बाबा आता
सोडून दे माणसाला
करून विचार बघ मुकतो आहे जो तो जीवाला
निघून जा दूर कुठे तू
उत्तर बनूनच भेट दुखांचे
आनंद मिळेल गरिबाला ह्या
हात उठतील  मग आशीर्वादाचे .............

सोडून दे ह्या मनाला
घर मोकळे ठेव विचारांचे ............
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.२३-०४-२०१४

Tuesday, April 22, 2014

घडणारं घडत राहतं.........

घडणारं घडत राहतं
त्यावर कुणी हसतं 
तर दुखी मन तेव्हा मात्र रडत राहतं

कुणाचे स्वप्न सत्यात तर कुणाचे
आयुष्यंच   उध्वस्त होतं
आयुष्याच्या खेळात बहुधा
असंच काही  घडत राहतं

कुठे वसलेलं गाव ते
नदीच्या किनारी
वाहत्या पाण्याचा खळखळाट  ही ते
मरणावर एखाद्याच्या चुपचापच निघून   जातं

आंधळी  होते रात्र ही तेव्हा
जीव निघून जातो जेव्हा
दिसू लागतात नजरांना
आपलीच लोक रडतांना
देता ही येत नाही आवाज असण्याचा
कळतं मिळाला मृत्यू तेव्हा

जाळून जातं घर काहींच
विजत नाही अश्रूंनी ती आगही तेव्हा
आली ती लेकरं रस्त्यावर
छत्र मात्र कुठेच नाही
देवाकडे  पाहून मग
विसरून जातो तो माणुसकीही  तेव्हा....

घडणारं घडत राहतं
कुणी हसतं 
कुणी रडत राहतं  ............
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.२२-०४-२०१४








Monday, April 21, 2014

आयुष्याचेही रंग अनेक आहेत..........

आयुष्याचेही रंग अनेक आहेत
कधी रंगहीन तर कधी शापित आहे

जगणे असह्य झाले तरी जगतो  इथे
नशिबाचे हे खेळणे आहे

नसतं हातात काहीच  शिल्लक
दुखांनीच घेरले आहे
क्षणिक गंध येतो सुखांचा
क्षणातच सारेकाही विखुरले आहे ......

देऊन जातो प्रेम अन माया
मरण येउनही तोच  जिवंत आहे

आयुष्य ह्याच नाव  आहे
खडकाळ अंगणातही  लागली सुमने आहे

आयुष्य ह्याचेच  नाव आहे.......
-
©प्रशांत डी शिंदे ....

दि.२१-०४-२०१४


Wednesday, April 16, 2014

दु:खांसोबत जगायला शिक..

हसायला शिक
जगायला शिक
उघड्या डोळ्यांनी दु:ख लपवुन
समोर जाऊन लढायला शिक

कुणी नाही ईथे कुणाचे
जिवाची तुझ्या किंमत करायला शिक

आपले म्हणायला रक्तही आपलेच
वाहुन गेलेल्या रक्ताला विसरायला शिक

काळजाला सारेच देतात वेदना
वेदनांसोबत तु मरायला शिक

कितीही स्वप्न तुटले तुझे
चंद्रासारखे मोठं मन करायला शिक.....

दु:खांसोबत तु जगायला शिक......
-
©प्रशांत डी शिंदे

असे दिवस येतात ..............

असे  दिवस  येतात
कुणीच  सोबत  दिसत नाही
एकटे चालताना सावलीही मग साथ देत नाही

जगायचे कुणासाठी आपले कुणीच  नसतं
उरलेल्या ह्या आयुषला कुठलेच रंग नसतं
अंधार आयुष्यात कुठवर राहणार आहे
इथे तर कधी संपेल हे जीवन ह्याचेच पक्क नसतं

असे दिवस येतात
हाथ  रिकामेच सापडतात
खूप आशेने मुत्ठीत दाबून ठेवतो सुख थोडंसं
पण खरे तर ते सुख कधीच  आपले नसतं ..........

असे दिवस येतात
कसे तरी जगायचं
कोसत त्या देवाला मग कधीतरी कंटाळून जीवही  निघून जातो ....
 -
©प्रशांत डी शिंदे ....
दि.१६-०४-२०१४ 

तुला तर माझी आठवणही येत नसेल.......



तुला तर माझी आठवणही  येत नसेल
माझ्या विचारांत ,माझ्या मनात फक्त तूच असतेस
कसे एकटे जगतो आहे मी
माझे मला खरेच कळत नाही

पुन्हा गर्दीत शोधतो तुला मी
एकट्या जीवाला ह्या
वेदनांत जळताना बघतो मी

तू मात्र कुठेच  दिसत नाहीस
त्या वाटा , ते लोक सारे काही  तसेच आहे
त्यामध्ये फक्त तुझाच चेहरा दिसत नाही
नैराश्यात   जखडलो आहे मी
आता तर  स्वप्नांतही आधार असतो
खरेच एवढे कम नशिबी आहे का मी ..........


खूप त्रास होतो आता
तुझी सवय झाली आहे
तुला कळत नसेल ते
माझ्या भावना मात्र रडत राहतात

कसे समजवायचे  मला मी
आईचेही  डोळे  माझ्याकडे पाहून वाहतात
आईला म्हणतो माझीच  चुकी  आहे ही
खरेच प्रेम असे दुखावरचं खपलं असतं .........

आता पहिल्यासारखी आपली भेट होत नसते
सुन्या पडलेल्या रस्त्यावर त्या
तुझी सावली कुठेच सापडत नसते

तरी शोधत राहतो तुला
हि रात्र मला छळत  असते
मन  ऐकत नाही
फुला-पानांमध्ये तुला शोधतं

वेड लागले तुझे मला
तुझ्याच विचारांतचं हे माझे मन असतं

तुझे नाव  विसरावं वाटत
पण कसे  कळत नाही
सारखा भास होतो तुझा
दूर जाऊनसुद्धा
तू आजही परवा एवढीच जवळ वाटतेस

आता मी थकलो आहे
त्यात तुझ्या  आठवणींतच हरवलो आहे
तू पुन्हा येशील  ठाऊक नाही
आलीस तरी पुन्हा माझी होशील ठाऊक नाही ......

मी जेवढे तुला आठवतो
तेवढेच प्रेम तू देशील ठाऊक नाही ........


तुला तर माझी आठवणही येत नसेल ...........

तुला तर माझी आठवणही येत नसेल ...........
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.१६-०४-२०१४

Sunday, April 6, 2014

तुला वाटत असेल मी तुला विसरलो...

तुला वाटत असेल मी तुला विसरलो
कुणाच्या स्वप्नांत मी ही आता हरवलेलो असेल

आजकाल तुझ्याकडे पाहतही नाही
तुला वाटत असेल मी तुला आठवतही नसेल
खरे तर ...
जसे तु ही मला चोरुन पाहतेस
 
तसे माझी आजही तुझ्यावर नजर आहे
तुला वाटत असेल मी आता खुष असेल
पण तुझ्याशिवाय कसला आनंद
तुला ठाऊक आहे तुझ्याशिवाय माझे मीच नसेल

तुच शिकवलंस पुन्हा प्रेमात पडायला
जुन्या जखमा लपवुन पुन्हा थोडं हसवायला
माझे प्रेम आहेस
तुच शिकवलंस ना शोना हरतानाही उठुन जिंकायला....
-
©प्रशांत डी शिंदे
दि.06-04-2014

Thursday, April 3, 2014

सुख ओंझळीत दे तू जरा ...........

मूक होऊनी का  बसलास देवा
डोळे उघडूनी बघ ना जरा
गीत गातो तुझे तसे मी
तू हि थोडे  बोल ना जरा..............

प्रीतीच्या कळ्या उमलना तू जरा
गंध घेईल बाहुपाशात माझ्या
सुखाच्या मिलनासाठी  हो  आतुर तू जरा .................

किती दुरावा मिळतो नशिबाचा
तोंडावर लेकरांच्या येऊ दे तू  हसू जरा

गरिबीच्या उन्हात पोळले आयुष्य
आता प्रेमाची  भाकर थोडी 
नशिबाच्या ताटात वाढ तू  जरा

एकले चालतो आहे न पाठी  न सोबती माझ्या
तिच्या मायेची सावलीत विसावा मिळू दे जरा ..................

असे हे जीवन माझं
सुख ओंझळीत दे तू जरा ...........

©प्रशांत डी शिंदे
मो.९८१९६१६७१४

Thursday, March 27, 2014

एका प्रेम वेड्याची कहाणी ....

कसे तरी दिवस काढत जगत होता तो ,
त्याच्यासोबत असे कोणतेच नाती राहिली नव्हती प्रत्येकास मदत  करत आज रस्त्यावरच येउन पडला होता  नशिबाचे खेळ असतात हे  त्याला हि ठाऊक होतंच पण  कुणाचे वाईट नको हा त्याचा स्वभाव, म्हणूनच  आपल्याजवळ काही नसतानाही आपल्याकडून जेवढे होईल तेवढे तो नेहमीच करायचा . त्याचे हे रूप कसे  विचारात असाल तर मी सांगतो ...

मुंबईत राहणारा हा मुलगा . घरातली   परिस्थिती   तशी हालाकीचीच काम करायचे महिनाभर आणि त्यातून जे पैसे मिळतील ते पैसे महिनाभर पुरवायचे  हे सर्वेच करतात  आणि ह्याच्या घरचेही तसेच होते . लहाणपण कसे गेले कळले नाही कसेतरी शाळा पूर्ण करून  लगेच छोटे-मोठे काम  तो करू लागला , तसा तो मेहनती होता पण त्याच्या खांद्यावर हाथ  ठेवणारा आणि कर म्हणणारा असा कुणीच  नव्हता तरी तो  मेहनत करतच होता . 

शाळा ,कॉलेज च्या दिवसात मुले मित्रांसोबत धमाल करतात ,मस्ती करतात प्रेम करतात पण ह्याला मात्र ते लाभलेच नाही  लाभले ते फटके नशीब एवढीच ह्याची कथा . पण त्याकडे दुर्लक्ष्य करून  तो जगात होता पण त्याच्या आयुष्यात    एक दिवस कुणीतरी येत ज्याच्या येण्याने त्याचे जीवन आनंदी होऊ लागतं त्याला आता ती हवी असते पण  मनात  तोच विचार जर आपण लग्न केले तर तिला हि आपल्यासारखेच जगावे लागणार, आपल्यामुळे   तिच्या नशिबात दुख नको .. मग तो निर्णय  घेतो आता आपण ह्या प्रेमापासून दूर निघून जायचे आणि तिला काहीतरी कारण काढून  दूर करतो . पण त्याला ह्या गोष्टीचे  खूप दु:ख होतं खूप त्रास होतो कारण मनापासून  प्रेम केले होते ना पण काय करणार नशिबात आलेल्या दुखला भोगावे तर लागणारच .. त्या मुलीचे हि खूप प्रेम असतंच पण तिला सुखात पहायचे होते म्हणूनच तर तो  तिच्यापासून दूर झाला . तिच्या घरातल्यांनी तिचे लग्न करून दिले ती लग्न करून गेली  हा मात्र त्या दिवशी  खूप रडला कारण आता जगण्यासाठी काहीच  नव्हते आणि मरण येत हि नव्हते  आता फक्त  वाट पाहत होता कधी  मरण येतं ह्याची .. ती लग्न करून कुठे गेली कळलेच नाही वय निघत गेले  हा जसा मेहनत करत होता तसाच   राहिला पण  कधी कधी तिची खूप आठवण यायची  तेव्हा तो तिला आठवायचा तिचा तो  पाकिटात ठेवलेला छोटासा फोटो आजही लपवून ठेवलेला होता तो पाहत रडायचा तिला पाणीपुरी खूप आवडायचे  तो त्या गाडी जवळ जाऊन एकटाच पाहत उभे राहायचा तो तिथे येणा~या जाणा~या मुलीमध्ये तिला शोधायचा  आणि थोडा हसायचा  पण जेव्हा त्याला कळायचे कि ते स्वप्न आहे पुन्हा तो तिथून निघून जायचा . तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला त्याने पण तिचा पत्ता काही लागला नाही .
बघता बघता वय  ५० च्या   वर झाले होते तो आजही एकटाच होता त्याने तिच्याशिवाय आयुष्यात कुणालाच आणले नव्हते . तो थकला होता , कसे असतं ना आयुष्यापण कुणाला राजेशाही बक्षीस म्हणून मिळते तर काहींना रडतच जगावे लागतं आणि मरणही येत तेव्हा खांदे द्यायलाही पैसे आहेत कि नाही पहावे लागतं  .
असेच तो हि एक दिवस एकटाच बसलेला होता सुट्टीचा दिवस होता रविवार होता . तो दिवस तसा रोजच्याच सारखा होता एकटाच बसलेला तिला आठवत आणि स्वतःला समजावत ती आता आपली नाही हे मनाला समजतच नव्हते .
त्यादिवशी का ठाऊक नाही तिच्या येण्याची चाहूल  झाली पुन्हा तिचा हसरा चेहरा माझ्या नजरेला पडला ती आनंदी होती मला पाहून पण माझा हा अवतार पाहून तिच्या डोळ्यांत पाणी आले होते. तो उठला आणि म्हणाला " वेडे रडतेस कशाला तू आनंदी आहेस आता , बघ तुझ्या नशिबात असे माझ्यासारखे दुख नाही "....

ती म्हणाली मला ठाऊक आहे तुझे ते भांडण मुद्दाम होते मला ते उशिरा कळले रे .मला सुख मिळावं म्हणून तू  माझे दुख हि तूझ्य नशिबात मागून घेतलेस , असे म्हणत तिने त्याला मिठीत घेतले ,काही क्षण श्वास थांबतो कि काय असे त्याला झाले होते कारण खूप दिवसाने तिचा  स्पर्श  झाला होता आणि आनंद  काय असतो ते जाणवले होते पण ते आपल्या नशिबात नाही हे समजताच तिने तिला दूर केलं तिच्या मिठीतून सुटका केली .

तो म्हणाला हो  मला असे दुखत तुला ढकलायचे नव्हते मी प्रेम केलें तुझ्यावर तुला सुखी पहायचे होते . बघ माझे काय मी कालही असाच गरीब आणि आजही असाच गरीब आहे .पण एक मागू  तू मला देशील का ?
ती रडत होती  तिला त्याला असे पाहवत नव्हते असा थकलेला शरीर कधी गळून पडेल असा तो दिसत होता .. ती म्हणाली  मग ना सोन्या मी देईल तुला तू मागशील ते .. तू म्हणशील  माझ्यासोबत आता हि लग्न कर तर मी आजही  तयार आहे .

तो म्हणाला  नाही असे नाही करायचे मला . तू फक्त मला थोडा वेळ तुझ्या मांडीवर डोके ठेऊ देशील का ?

तिने त्याला जवळ घेतले आणि डोके तिच्या मांडीवर ठेवले .
तो म्हणाला शोना मी जर आता मिलेओ तर गं ?....
तिने तिचा हाथ त्याच्या तोंडावर ठेवला आणि म्हणाली गप काही पण नको बोलूस .
तो म्हणाला खरेच  शोना आता तुझ्या जवळच हे घडणार आहे ..मी खरेच तुझी वाट पाहत होतो गं ..मला हे जगणा नकोसे झालेलं मी तुला खूप शोधण्याचा  प्रयत्न केलं तू कशी अशील  बघण्याचा प्रयत्न केलं  पण तू  सापडली नाहीस .
 पण आता तू आलीस ना तुला असे सुखी पाहून मी खरेच तृप्त झलेओ आता मोकळा झालो हे जीवन संपवायला ..
तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या .
आणि त्याने डोळे मिटून घेतला  आणि खरेच तो बोलला ते झालं त्याने त्याचा श्वास सोडला होता , हे जग सोडले होते ....ती त्याला मिठीत घेऊन खूप रडत होती आणि देवाला म्हणत होती देवा का प्रेमाची अशी परीक्षा ? का  ?.....

Friday, March 21, 2014

वाटतं आयुष्य इथेच संपून जावं....

वाटतं आयुष्य इथेच संपून जावं....
जगण्याला  नाही मिळाला 

पण .... 
मरणाने तरी किंमत माझी कळावी .....
खूप काही स्वप्न आहेत  मनी
 

खूप इच्छाही आहेत
पण नशिबाचीच साथ नाही
इतकाच माझा दोष आहे .............

वाटतं आयुष्य इथेच संपून जावं....
तुझा होऊ शकत नाही
पैस्यांनीच विकत मिलता सारं
त्यात प्रेमाला इथे वाव नाही

का बनवलं ऐसे
का ऐसे जगायचे
दुखीच राहून जगायचे तर नकोच हे आयुष्य .............

वाटतं आयुष्य इथेच संपून जावं....

प्रेम माझे  तिला  कळू दे
नाशिबावीन जन्म  माझा
तिचे प्रेम थोडे मिळू दे .......................

थोडे प्रेम मला हि मिळू दे .. :(
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.२१/०३/२०१४

Friday, March 14, 2014

इच्छा .....


ऐकावे कधी श्वासांनीही
मनानेही साथ द्यावी
निघून जावं देहातुनी ह्या
अन पापणीही कुणाची ओली न व्हावी ..........
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.१४/०३/२०१४ 

ऐसे जीवन दिले देवा..............

ऐसे जीवन दिले   देवा
सुख कुठेच माझे नव्हते
प्रेमासाठी धडपड केली
पापणी नेहमीच ओली राहिली  ............

ऐसे जीवन दिले  देवा
अंधारच अंधार भेटला

आधार घ्यावा वाटला थोडा
तिथे दगाच  बक्षिसी भेटला ..................


रिकामे हाथ होते माझे
नशिबही कोरेच राहिले

वाढले स्वप्न पाखरासारखे
झेप घेताना स्वप्नांची
मग  ते  पांगळेच राहिले ......

ऐसे जीवन दिले देवा
क्षणभरही सुख अनुभवायचे नाही
साधे भोळे वागणे माझे
सूत्र एवढेच
"कुणास दुखवायचे नाही "

भरभरून वाटले प्रेम नि माया मी
कारण एवढेच देऊ शकलो
पण मी मागणी केली तेव्हा
माझ्यासाठीच मात्र ती संपली .....................

ऐसे जीवन दिले देवा
मरणही लाभले नाही
निराशांचेच मला दोस्त भेटले

दुखांशिवाय कुणीच  नाही ................

विदुषकच रे मी 
इथे पायातल्या  चप्पलचे हि   वर्चस्व 
माझ्या जीवाला इथे जराही  किंमत  नाही  

डोळ्यांत रक्त आले
आज  आसवांनी हि साथ सोडली
तरी नाही बोलणार तुला
कारण
  क्षुद्राला ह्या
जगण्याचा तर हक्कच रे नाही........

एक छोटी इच्छा  मनी माझ्या
एवढं  तरी ऐकशील का??

पुरे जगणे झालं हे  आता
भिक म्हणून तरी  मृत्यू देशील का ?
निरर्थक ह्या श्वासांना थांबवून
विसावा थोडा देशील का ? .............

ऐसे जीवन  दिले  देवा
शेवटी  हातही   नांगडेच  राहिले
प्रश्नांचेच आयुष्य देउनि
उत्तरांनीच   जन्म घ्यायचे राहिले  ..............
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.१४/०३/२०१४

दैवत्व............

कहाणी माझीच एवढीच लिहली दैवाने
दैवत्व त्याला लाभले माझ्या दारिद्र्याने
नशिबी हा संसार देउनि
म्हणतो जग असेच फाटक्या नशिबाने .....
-
©प्रशांत डी शिंदे ....

Thursday, March 13, 2014

मोह तुझा .................


असा कसा हा मोह जडला
तिलाच पाहत राहावे वाटतं
इतकी सुंदर आहे ती कि
मोहात कुणीही पडेल
म्हणूनच तर तिला लपून पाहत राहतो मी ............


ती जेव्हा हसते मोहरून जातात पाखरेही
अन उमलून जातात कळ्याही
मग बहरतो ऋतू प्रीतीचा
अन वाटतं तिच्याच बाहुपाशात असावं जरा मी .......


अंधारलेला  हे जीवन माझे
तिने भेटताच वाटलं  झाले सफल जीवन हे
ती बघते प्रेमाने जेव्हा
खरेच तेव्हा होतो बेभान मी
अन फक्त तिच्या आनंदासाठीच सोडून येतो सारे माझे  मी..........


वाटतं तिने फक्त माझीच असावे
दुस~याची झाली तर कसे जगणार आहे मी
सवय झाली आता तुझी
वाटतं आता आयुष्य फक्त तुझ्यासोबतच जगावे मी ..................

-
©प्रशांत डी शिंदे ....
दि. १३/०३/२०१४

Thursday, March 6, 2014

काय दिवस होते ते....

काय  दिवस होते  ते
कुणीतरी आपले असायचे
हस~या चेह~यामागे दडलेलं दु:ख
कुणी सहजच  ओळखायचे ................

सारखेच  वाटायचे
असावे कुणीतरी
पण ती मात्र दूर असायची
जवळ असली कि नजर 

तिच्या हसण्यावरच   माझी असायची
किती सहज दूर करायची विचारांचे प्रदूषण
अन मोकळे मन करून थोडे हस म्हणायची .................


काय दिवस होते  ना..  ते हसत खेळत घालवले
सोबत आहेत ते क्षण आजही
फक्त न फक्त आठवणरुपी
तिचा मात्र काहीच पत्ता नाही .......



काय दिवस होते ना ते
एकमेकांस भेटून आनंदी होण्याचे
पण आता चोहीकडे भयाण आहे
तू कुठेतरी दूर आहेस
अन..मी हरवलेल्या ह्या अंधारात आहे ....

-
©प्रशांत डी शिंदे.....

दि.०६-०३-२०१४

Wednesday, March 5, 2014

मी एक उनाड पक्षी ................


न  सुखांची अपेक्षा होती
न  जगण्याला कारण होते
आकाशाचे   पंख मनाला
म्हणून  सतत विचारांतच हरवत होते .............

मी एक उनाड  पक्षी
मनातल्या मनात घर करणारं
कुणाच्या दुखांत आपले दुख पाहणारे
तर कधी त्याच्या चेहऱ्यावरचे अश्रू बनून वाहणारं

असाच आहे मी
थोडे थोडे म्रुत्युसमिप   जाणारं
अन जाताना मात्र कुणाच्या आठवणींतून जगणारं
-
©प्रशांत डी शिंदे.....
दि.०५/०३/२०१४

Monday, February 17, 2014

प्रेम आहे धोक्याचे ...

किती दिवस असतात प्रेमाचे
किती आयुष्य आहे ह्या सुखांचे
डोळ्यात उतरलेल्या प्रेमळ स्वप्नांना
कितीवेळ असेच पहायचे ..........

आनंद असतो प्रेमात 
जेव्हा तुझा हाथ हातात असतो
मिठीत तुझ्या असताना दुखांचा भास अदृश्य असतो
जगायचे असतं आयुष्य तुझ्या सहवासातच
पण का असे दृष्ट लागते प्रेमाला
वळणे येतात मध्येच धोक्याचे .....................


किती जपायचे हे नातं मीच नेहमी
तू ही आता जपतजा 
खचतो मी सांभाळताना त्यांना
तू येउन सांभाळत जा .............

खूप नशिबाने मिळतं हे नातं
म्हणूनच डोळ्यांना काहींच्या खुपसत असतं
अन आपल्या प्रेमाच्या   सागराला 
वादळरुपी दिशाहीन करीत असतं ..............


नाही जमत प्रत्येक  भावना असे
तुझ्यापासून लपवणं
तू तेव्हा माझ्या हृदयाचे दुख थोडे समजत जा .........

किती दिवस असतात प्रेमाचे
किती आयुष्य आहे ह्या सुखांचे
जपताना कळतं हे  प्रेम आहे खरेच  धोक्याचे ...

-
प्रशांत डी शिंदे
दि.१७/०२/२०१४



Wednesday, February 12, 2014

असेच असू दे प्रेम आमचे ........

जेव्हा  मनाला हुरहूर लागते
तिचा भास होतो
अन श्वासांचे संगीत तिच्या माझ्या कानी पडू लागतं..................


असेच असू दे प्रेम आमचे ........

ती आहेच अशी की मोहात कुणीही पडावे
कधी इतक्या जवळ असते माझ्या की
दोघांत काहीच अंतर नसतं
अन कधी इतक्या दूर असते की
डोळ्यांना  दूरवर तिचे चित्रही नसतं ..............

तिला माझे प्रेम कसे कळलं
हे एक गुपितच आहे
जेव्हा ओठांजवळ  ओठ येतात
श्वासही फुलू लागतो
मग .....
मिठीत येताच  दोघांसही   कळतं....खरंच आता एकमेकांची गरजच आहे ....

ती म्हणते मला खूप खूप आवडतोस तू 
मी म्हणतो तू माझा श्वास आहेस 
तुझ्याशिवाय माझे आयुष्य जसे अंधारलेले विश्वच आहे .....

खूप प्रेम आहे दोघांचे हे दोघेही जाणतात
म्हणूनच तर  थोडे भांडण तर कधी
आसवे आणुनी  सतत जवळ येण्याची कारणेच  शोधतात ..............


असेच असू दे प्रेम आमचे ...............


किंमत दोघांच्या मनाची होती
न होते गर्व  सौंदर्याचे कधी
म्हणूनच तर हे नाते  खूप पवित्र वाटत होते ........

शपथ  घेत होते रोजच 
स्वप्नही दोघांनी पाहिली
थोडे थोडे करून झोपड्याला ही ते  महलाचे रूप देत होते ...............

 

असेच असू दे प्रेम आमचे ........

असेच जगत होते दोघेही  मिठीत एकमेकांच्या मग
मृत्यूही सोबतच  येउ दे
दोघांनी  निरोप घेतला जरी सोबत
मग दुनियानेही आपल्या प्रेमास पाहून रडू दे ..................

असेच घडू दे  प्रेम करणा~यांचे
इतिहासाने   ही मग  प्रेमाला शब्दरूपी उतरवू दे .............

असेच असू दे प्रेम आमचे
आज सा~यां जगाला   पाहू दे .............
-
©प्रशांत डी शिंदे
दि.१२/०२/२०१४

Tuesday, February 11, 2014

शपथ नात्याची .............

आठवण बनून  भेटतात सारेच
पण ओठांवर नाव बनून मोजकेच राहतात

दु:खात सांत्वन करतात सारेच
पण आसवे पुसणारी मोजकीच असतात


कामापुरते गोड बोलून वार करणारे सारेच असतात
पण नात्यात गोडी ठेवून सोबत राहणारे क्वचितच सापडतात

लोभ नसतो कशाचा फक्त नातं महत्वाचे असतं
असे लोक मात्र नशिबानेच मिळत असतात ...........

मी कुठवर साथ देईल सांगू शकत नाही
पण  अर्ध्यावर नातं  सोडणार नाही 
तुझ्यावर आलेल्या संकटांत एकट्याने लढू देणार नाही
विश्वासाचे नातं आपले निरंतर जपून ठेवणार आहे ...............


म्हणूनच तर नातं हे अनमोल आपले बोलणारेही
फक्त   माझ्यासारखीच असतात ..........

-
©प्रशांत डी शिंदे
दि.११/०२/२०१४



Friday, February 7, 2014

Valentine ........

valentine येण्याची  चाहूल आता आधीच होऊ लागते
पण  पूर्वीसारखी मज्जा मात्र प्रेमात आता कमी वाटते

ती लाजत  भेटायची , थोडी भीतीही मनात  दिसायची
आता मात्र तिच्या डोळ्यांत  माझे मला शोधावं लागतं
ती मिठीत  घेते नेहमीच पण भासच मनी राहिलाय
तुझ्या  तर सावलीने
ही  हात सैल सोडलाय   ........

कसला हा  गुलाब  दिन
अन  कसले फसवे आनंद
आयुष्यभर अश्रू देऊन का मनवायचे valentine ...........

प्रेम करायचे मनाने  हृदयालाही सामावायचे
आनंद  मुखावर  देऊन बंद  डोळ्यांनाही सुखवायचे

valentine ची चाहूल आता आधीच  होऊ लागलीय
रोजच्या तिच्या कटकटीने ती नकोशीच आता वाटू लागलीय ...........

तरी  बंध  जुळलेत हे , कारण  प्रेम  दोघांचे अनंत आहे
मनात काहूर असली तरी स्पंदने मात्र एक आहेत

होतात दुखी दोघेही अश्रू  आपले पाहून
मग  ओठांचा आस्वाद  देऊन 

एकरूप होतात सुख अन दुखः ही..............

असा  हा valentine  नेहमीच नवा वाटतो
प्रेमास  दुसर्यांच्या पाहून ते आपल्याही प्रेमाला आठवतो .............

असा हा valentine ........
-
©प्रशांत डी शिंदे
दि.०७/०२/२०१४

Thursday, February 6, 2014

एक पहाट रोजचीच.............


एक पहाट  रोजचीच ती
आज मात्र  नवीन वाटली
डोळे  माझे उघडण्याआधीच  , तिने अंधाराची भेटही गाठली ............

तिला प्रेमाचे  वेड , वेडे होतो मी ही
मी तिच्या प्रेमात अन तिने मात्र प्रेमाचीही लाज न राखली ................

सोबत  थोड्या क्षणांची , आठवण  बनून  सोडायाची  
तिने  ठरवूनच मिठीत घेतले होते , पुढे  मिठी सैल सोडायाची

एक पहाट रोजचीच
आज मात्र नवीन वाटली .........

जगत तर आहे जीवन  हे  मात्र
उठण्या आधीच  तिरडीही  सजली ............ :'(
-
©प्रशांत डी शिंदे
दि.०६/०२/२०१४

Monday, February 3, 2014

मन हे असेच असतं ना ....

कसे  असतं ना मन आपले  .....
कुणाच्या हसण्याने  कळीसारखे उमलतं
हृदयात बसवून त्यास
मग हृदयाचे  स्पंदन बनवतं ...............

किती  जीव लावायचा 
त्याची हि  एक  सीमा नको का
आठवण काढून  मग कित्येकदा
पापण्याही बरेच  भिजवतं..............

शोधत राहतं वेड्यासारखे
मग फुलांनाही ते  विचारतं
कुठे असेल बरे ती ??सांगा .....??
अन पाखरांना हि ते विनवतं....................

असेच का होत असतं बरे  ह्या प्रेम लहरींना
का बरे किनारा लाभत नाही
जरा  विसावा घेतला कि ते ओसरल्याशिवाय राहत नाही ......

लोक ह्यालाच प्रेम म्हणतात ....बरं...
दुराव्यात  जवळ तर  मिठीमध्ये त्यांच्या
ते स्वर्गसुखच   मिळवत असतं ...........

तरी रस्ता  अनोळखीच राहतो प्रेमाचा
अन आयुष्यही  एकलेच  पडून जातं
जरासे असामंजस्य
अन जगणे हे मृत्यू बनून जातं............

ओठांवर  नाव तिचे येताच 
जगणेही  तिच्याविना
नकोसे होऊन लागतं  ...........

मन  हे  असेच  असतं ना ....

आपले नसतानाही
त्यावर  वेड्यासारखे प्रेम करत असतं .............

कसे बरे हे प्रेम म्हणावे
खरे कि खोटे ..अन का  विश्वास ठेवावे ?   
हात  रिकामेच  राहतात शेवटी ....
नेहमीच आठवणींसोबत का  जगावे ........................

तरी  प्रेम  असतं हे
जे  तिच्यासाठी सुखच मागतं
तिला जीवन  देण्यासाठी मग  ते हृदयही  अर्पण  करतं
अन  तिला पाहतच निरोप घेताना 
तिचीही पापणी ओली करून जातं  ............... :'(
-
©प्रशांत डी शिंदे
दि .०३/०२/२०१४

Wednesday, January 15, 2014

तुझा ही हाथ सुटणारच आहे ....

ते तुझे  हसणे  नव्हते
ते नशिबीच  पडले होते
दारिद्र्य लाभले मज
आयुष्यही दुखांनेच घेरले होते ....

खरेच शोना माझ्या ह्या दारिद्र्यात 
तुझा ही साथ सुटणारच आहे ....

तू   जाशीलही  निघून
ही वेळच  तशी आहे
सगळे  सोडून  गेल्यावर
मला तूच कितीवेळ सांभाळणार आहे ......

तुझे सुख तुला मिळावं
आजवर दुसरं काहीच  स्वप्नी नव्हतं
आजही देवाकडे हाथ जोडून
तुला सुखी ठेवच म्हणणार आहे .......

खरेच शोना माझ्या ह्या दारिद्र्यात 
तुझा ही हाथ सुटणारच आहे
एकटा आलो  इथवर  अन  मी
आता एकटाच  विरहात जाळणार आहे  ....

खरेच शोना माझ्या ह्या दारिद्र्यात 
तुझा ही साथ सुटणारच आहे....
-
©प्रशांत डी शिंदे
दि.१५-०१-२०१४

Tuesday, January 14, 2014

कशी हि भेट होती आपली ...............

कशी हि भेट होती  आपली
दोघांनी ही प्रेम म्हणून ती जपली

नात्यांची फिकर होती
ना कशासही सिमित
दोघांसही  ती  वाटली  आपली .........

एकमेकांनी स्वप्न पाहिले
पहिलेच  प्रेम होते ते
त्यावर दुखांचे धुके  दाटले

दोघांनी वाट  पहायची जाण्याची
पण  वेळ कधी नव्हतीच  जवळ  येण्याची
दूर  निघून  गेले ते   क्षण आज
राहिले  डोळ्यांत फक्त  आठवणी

माझी  होती तू  अन तुझाच  होतो मी
दोघांनी लिहलेल्या इतिहासात 
आता एकटाच  होतो मी ......
आता एकटाच होतो मी ....

कशी ही  भेट होती आपली ...
-
©प्रशांत डी शिंदे
दि.१४-०१-२०१४

Thursday, January 9, 2014

तुला माझे प्रेम कधी कळलेच नाही .....


हस~या  चेहऱ्यावर माझ्या
आजही तुला हसूच  सापडतंय
तुला का ठाऊक आत लपलेल्या हृदय
किती दुख सोसतंय..........

तुला माझे नेहमी  ओरड्नेच  दिसत आले
तुझ्या हास्यासाठी माझे मान खाली झुकणे 
कधी दिसलेच  नाही...............

तुझ्या सुखांना दारात तुझ्या खेळते ठेवले
पण त्यांशी  झुंजण्यात माझे  सुखांची आहुती  दिली
तुला मात्र कधी कळलेच नाही .........

तुझ्यासमोर असताना मी ही विदुषकासारखेच  वागलो
कारण तुझ्या डोळ्यांतले अश्रू मला कधी आवडलेच नाही

पण तरीही  दूर जायचे बोलतेस सारखी
खरेच  तुला माझे प्रेम कधी कळलेच नाही ....

खरेच तुला माझे प्रेम कधी कळलेच नाही .....
-
©प्रशांत डी शिंदे
दि.०९-०१-२०१४

मनाला ठाऊक असतं, मनामधले कोडे ..!

मनाला  ठाऊक असतं
मनामधले कोडे

हृदयास   ठाऊक असतं
जीवन  आहे थोडेच

जगायचे कुणासाठी  प्रश्न केला तर
आता कारण  आहेत खूप  थोडेच ....

तू माझा श्वास 
तूच ध्यासही
गुंतले जीवही तुझ्यात
तुझीच  आहे ओढही

प्रेमास जाणूनही
दुख  देतेस असामंजस्याचे
तुझीवीन सये जगणे आहे अवघडही ....
 

-
©प्रशांत डी शिंदे
दि.०९-०१-२०१४

Tuesday, January 7, 2014

डोळ्यांत फक्त आसवांचा किनाराच राहिला ....

किती तरी स्वप्न माझे अपूर्ण राहिले
डोळ्यांना वाट पाहणे आता रोजचेच  झाले

मिटलेली मुठ  ती आसवांची माझ्या
मुखावरच्या हसुने तुझा निरोप मी घेतला


कित्येक  स्वप्न माझे अपूर्ण ते
डोळ्यांत  फक्त  आसवांचा किनाराच  राहिला ....

परत   आलो एकटाच त्या अनोळखी विश्वातून
जिथे माझ्या भावनांचा खेळ सा~यांनीच   मांडला

आपलेच मानले होते तुला मी सये
इथेच  खरा दगा होता जाहला ....


तू नसतानाही कविता लिहल्या कित्येक आज
कविता  त्या बघ ओसाड  राहिल्या
प्रेमाचे  शब्द  तो माझ्या नाशिबतुनी वंचितच  राहिला .....

कित्येक  स्वप्न माझे अपूर्ण ते
डोळ्यांत  फक्त  आसवांचा किनाराच  राहिला ....


-
©प्रशांत डी शिंदे
दि .०७/०१/२०१४  

Thursday, January 2, 2014

सखा तूच खरा ....!



सखा तूच खरा ....!
___________________________

तुझ्या सारखे जगायला मला तरी जमत नाही
कधी फुलांतून रसाळ तर कधी मनातला ज्वर
असे कवितेतून दूर करायला मला असे शक्यच नाही .......

प्रेमाची भाषा  तुझ्या स्वरात ऐकिले
मनानेही मोठे व्हायला गड्या मला तरी जमत  नाही
दुख सार्यांचे तुझ्या हातांशी घेऊन
आनंद  स्वीकृतणारा तुझ्यासारखा तरी कुणीच नाही ....

अन मग येते  दोस्ती  हि आपली
दोस्तीत रंग भरणारा तू
पाठीशी  उभा राहणारा
मायेची गरज असता अलिंगन देणारा तो कृष्ण
माझ्यासाठी तर सखा तूच खरा .....
-
©प्रशांत डी शिंदे