Thursday, July 25, 2013

" माझी वाट पाहशील ना " ...........

तिला विचारले मी " प्रेम करशील का  माझ्यावर ? " .
तुझ्यावर जीव  ओवाळील म्हणाली ..........

हृदय  माझे  जपशील का आयुष्यभर
त्यात घर करून राहील म्हणाली ..........

आयुष्यात  किती हि दु:ख  आली
सोबत तुझ्या  उभी राहीन  ती म्हणाली........

दुखत  राहतोस  रे तू
तुझे दुख मी  घेऊन जाते  ती म्हणाली ..........

म्हणाले  ते  सारे " सुखात नाही  राहू शकणार तुम्ही "
पण प्रेम आमचे अमर करून  गेली ती ......

मला न  सांगताच  दूर निघून  गेली  ती ......

ओळख प्रेमाची आमच्या  दुनियेस ह्या देऊन गेली  ती ............

हातात  हात धरून निघते रे राजा म्हणून गेली ती

तिचा भास  आज हि  होतो मला
दाराशी    जातो मी तिला  शोधायला
पण  ती फुले बागेतली म्हणतात  वर्षे  झाली  जाऊन रे तिला .......

मी  वेद  वात  पाहतो तिची
ती जाताना येते  रे म्हणून   गेली

" माझी वाट पाहशील ना " ती म्हणून  गेली .........
-
• ©प्रशांत .डी. शिंदे•

Wednesday, July 24, 2013

तू समजून घे..............

शब्दांवर जाऊ नकोस
त्यातल्या भावनांना समजून घे .........

हसण्यावर जाऊ नकोस
भिजलेल्या पापण्यांना निरखून घे .......

बोलणारे तर बोलतच असतात
कधी तरी माझ्या ह्या हृदयाचे हि ऐकून घे .......

किती प्रेम दडलंय हृदयात ह्या
माझ्या मनाला हि तू समजून घे .............
-
• ©प्रशांत शिंदे•

तुझ्याविना जगताना ...!

तुझ्याविना जगताना
मी तुझीच होऊन गेले
हातात हात असताना
हात कधीच मागे सुटून गेले....

तुझ्यावर प्रेम करत गेले मी
अन....
तुला ते सांगताना शब्दच सारे हरवून गेले ....

तुझ्या प्रीतीच्या खेळात
मी सख्या नेहमीच डाव हरत गेले
तुझी होता होता आज माझेही मी न राहून गेले .......

तुझ्याविना जगताना
मी तुझीच रे होऊन गेले ..........
-
• ©प्रशांत शिंदे•

Friday, July 19, 2013

प्रेमाचे नाते .......

ओळख ना  पाळख असते
तरी हि  त्याची खरी गरज असते
नको  असतो  अबोला त्याचा
त्याच्या शब्दांना ऐकायची  हृदयाला सवय असते
एकदा जुळले हि बंध
मग ....
हे नाते प्रेमाचे असेच  असते  ....

प्रेमाचे नाते  असेच  असते  .....


-

• ©प्रशांत. डी .शिंदे•

तुझी पापणी .......!

मी माझ्या ह्या हातांनी तुझी  ओंजळ
सुखांनी भरून द्यावी

एकच इच्छा माझी सये

ह्या मृत माझ्या देहाला पाहून
तुझी पापणी ओली न  व्हावी ........
-
• ©प्रशांत. डी .शिंदे•

Thursday, July 18, 2013

मला खरेच कळत नाही ....

मला खरेच कळत नाही तिचे हे सारखे रुसणे
डोळ्यांत आसवे आणून माझ्याशी सारखे भांडणे....

मला खरेच कळत नाही माझी काय चुकी असते
हरून जातो तिला मनवताना मग
तीच जवळ घेते .....

माझे डोळ्यांत पाणी पाहून वेडा आहेस का म्हणते ....
तुझे प्रेम असेच हवे मला निरंतर
म्हणूनच तर नेहमी तुला मी जाणवून देते ....

मला खरेच कळत नाही
काय ह्या प्रेमात नेहमी असेच दुखणे असते ......

मला खरेच कळत नाही ...........
-
• ©प्रशांत शिंदे•

१८-०७-२०१३

मित्र हे असेच असतात ...........

मित्र हे असेच असतात
मुलीला प्रपोस कर
तू पुढे  जा मी आहे घाबरायचे नाही अजिबात म्हणत
मागच्या मागे  पाल काढतात
अन आपला उतरलेला चेहरा  पाहून हसतात
मित्र  हे असेच असतात ....

कधी  डब्बा  आणला कि  चोरून  खातात
आपण मात्र उपाशीच राहतो
मग आपल्याच डब्यातला घास   त्यांच्या डब्यातून देतात
घे खा थोडे  म्हणत
आपल्या पाठीवर हात ठेवतात
खरेच  मित्र  हे कमालच   असतात
मित्र हे असेच असतात ....

घरात भांडण  झाले कि
चल  बसू आपण म्हणत  हातात बाटली देतात
चल मूवी बघायला जाऊ म्हणत खिशे खाली करतात
साले मित्र हे असेच असतात ....

वेळ मात्र सारखी नसते
कधी   आपले दुख  पाहून  गळ्यात हात टाकून  रडतात
काय साले मित्र असतात
शिव्या घालत मरणावर माझ्या
शेवटचे खांदे ही  हेच  देतात
खरेच साले मित्र  बाकी मित्रच असतात ...........

मित्र हे असेच असतात ....
-
• ©प्रशांत शिंदे•

Wednesday, July 17, 2013

तू फक्त मिठीत घे ....

जेव्हा  एकट वाटतं   मला
डोळे भरून येतात आठवून तुला
तेव्हा  खरेच  गरज असते तुझी
डोळ्यांत माझ्या आसवे पुसून
तू फक्त मिठीत  घे ......

विचार खूप येतात मनाला माझ्या
वेडंच आहे  मन माझे
जे तुझ्याच  जवळ राहावे वाटतं
मग तुला ओरडते किती मी
भांडण  हि करते ....


तू समजून घेत जा ना राजा
मी तुझ्यावर किती रे प्रेम करते
मला गप्प करायला मग
तू ओठांवर ओठ टेकवून
ते सुख अनुभवायला
मला तू  फक्त  मिठीत घे  ....

गळ्यात हात टाकून मला तू
माझे केस  तू मोकळे कर
तुझ्या  जवळ  घेऊन मग म्हण
इथेच  तुझे मन मोकळे कर ....


एवढी  इच्छा माझी आता   तू पूर्ण कर
माझी अखेरची  वेळ आली  तरी
माझे डोळे बंद पाहून आसवे गाळतांना  तू  फक्त मिठीत घे .......

तू फक्त मिठीत घे ...........
तू फक्त मिठीत घे ...........

-
• ©प्रशांत शिंदे•
१७ -०७- २०१३

Tuesday, July 16, 2013

अबोला....


अबोला धरायचे तु

रागवायचे मी ही

आसवाच्या पावसात मग

सोबत भिजायचे दोघांनीही..
-
• ©प्रशांत शिंदे•

शराबी ही नजर तुझी.... !

शराबी ही नजर तुझी

नेहमीच मला घायाळ करते

तुझ्या डोळयांत पाहताना

माझे ही ह्रदय बेभान होत असते....
-
• ©प्रशांत शिंदे•

हसुन बघावं पुन्हा ....

हसुन बघावं पुन्हा
डोळयांत पाणी आल्यावर

जगुन पहावं पुन्हा
आयुष्यातुन कुणी गेल्यावर

दु:खतर येतच राहतात आयुष्यात
शोधुन पहावं सुख थोडं
कितीही मोठं दु:ख मिळाल्यावर..
-
• ©प्रशांत शिंदे•

नजरा हया बोलतात तेव्हा...!

नजरा हया बोलतात तेव्हा

ओठ गप्प होतात

कळत नसतं सारयांनाच ही नजरेची भाषा

वेळ गेल्यावर त्याच नजरा
नेहमीसाठीच ओल्या होतात....
-
• ©प्रशांत शिंदे•

Monday, July 15, 2013

ती ..

डोळ्यांत भावना तिच्या
मिळावा कुणीतरी डोळ्यांना आस तिच्या
ओठांना हि हसता येतं
पण विचारांशी असतो सारखाच वाद तिचा
निर्मल झरयासारखी ती
साधाभोळा स्वभाव तिचा
दुखंत सामील होते ती
हसवते खेळवते ती
जगते आहे लढता लढता
सुगंध आहे केसांनाही तिच्या ......

 -
• ©प्रशांत. डी . शिंदे•
१० - ०७-२०१३

वेदना माझ्या हृदयाच्या ..!

जखमांच्या  वेदना  नाही होत  ग मला
माझे प्रेम कळत नाही तुला
हे  पाहून वेदना होतात .....

माझ्या खर्या प्रेमाची थट्टा केलेली  पाहून 
खरेच  कंठ  माझे दाटतात

येतात हे अश्रू  डोळ्यांत 
त्यांना  किती असे  सारखे पुसायचे

कुणी तरी  सांगावे  मला
प्रेमाला माझ्या का तिने  तुच्छ  मानावे ....

नको करूस  प्रेम एवढे  तिच्यावर
कसे मी  ह्या हृदयाला समजवायचे

खरंच वेदना होतात मला
का हे तुला जाणवत  नाही ....

-
• ©प्रशांत. डी .  शिंदे•

तुला कळले कसे नाही .....!

किती प्रेम करतो  तुझ्यावर मी
फुलांसारखे जपत आलो  तुला मी
तुझ्याच साठीच तर आजवर जगात आलो आहे मी ...
तुला कळले कसे नाही  शोना ....


गीत  लिहले आज  तुझ्यावर 
ऐकवण्यासाठी अश्रुंसोबत  आलो आहे मी

का ग  ऐसे  सोडून  जावे तू
देऊनी  शपत  आठवून मला  कधीच  एकटे रडायचे नाही
बंधनात  अडकुनी ऐसे  एकटे
सांग ना  शोना  कसे गं  जगणार मी

तुला कळले कसे नाही शोना ....

मोगरयांचा गजरा  बघ हा
तुझ्यासाठी आज घेउनि आलो आहे मी
म्हणायची ना तूच 
हा  सुगंध म्हणजे  प्रेम आपले
असेच  सोबत ठेवायचे आहे मला
फुल हे  सारेच  सोबत तुझ्या आज घेऊन जाते आहेस  तू .......

तुला कळले कसे नाही शोना ....

का  एकटे सोडून  मला
आयुष्य  हे जगायचे वचन  घेतले आहेस तू ....

अधुरा गं  मी तुझ्याविना  
ठाऊक नाही  हे वचन ही  उद्या 
दृदय माझे पाळेल कि नाही  ....

सांग ना सये तुला
दुख माझे हे कळले का नाही....
-
• ©प्रशांत. डी .  शिंदे•

Thursday, July 11, 2013

दुनियादारी .....!

हातात आता दारूची बाटली दिसत होती
डोळ्यांत पाणी
मी म्हणायचो मला जास्त झाली आहे
पण मित्र म्हणायचे तू दुखात आहे ..

मी एकटाच राहत होतो
कुठल्या तरी कोपर्यात बसलेला सापडत होतो
मी म्हणायचो माझे दिवस भरले आता
ती म्हणायची
बस कर ना आठवणे मला ....

मी शांत झोपत होतो
लोक म्हणायचे किती आहेत दुख याला ....

खरे सांगायचे म्हटले " तर कुणी नाही ह्या जगात मला "..

नास्तिक होतो देव तरी काय करणार
म्हणूनच तर आधी गरीब केलं
आणि मग तिच्यापासून हि दूर केलं होतं मला

मी म्हणायचो नशीब फुटके आहे माझे
नेहमीच हरत असतो
मित्र म्हणायचे ती गेली सोडून तरी साला
अजूनही तिच्यासाठीच रडत असतो ...
काय करणार प्रेम केलं होतं ना मी
मग भोगावे तर लागणार एकटेपण ....

भेटेल पुन्हा कुणी तरी
पण पुन्हा कसा विश्वास ठेवू
पुन्हा कसे प्रेम करू ......

असेच राहू जो पर्यंत आहे ... मग काय संपवून टाकू हे आयुष्य
-
• ©प्रशांत. डी. शिंदे•

Tuesday, July 9, 2013

सांगायचेच राहून गेलं....

सांगून टाकावे  म्हटले  तिला
मी  खूप प्रेम करतो तुझ्यावर
पण
क्लास मध्ये  जवळ  जाऊन तिला सांगायचेच  राहून  गेलं....

बागेत  सोबत जायचो  आपण
हात हि हातात धरायचो
पण
हा हात  आयुष्यभर सोबत  राहील का माझ्या  ?
विचारायचेच  राहून  गेलं ....

ती  डब्बा आणायची
मी ही मुद्दाम  माझा डब्बा लपवायचो 
ती मात्र पाहून  हाताने जेवण भरवायची
अन मी  समजायचो हा चंद्रच  आता  मी मिळवला ....

आवडायचो   तिला ही  मी
पण ...
कोण आधी बोलेल ?
 

वाट पाहण्यातच  वर्ष  संपून गेलं
ती  वेगळी  झाली  ,मी वेगळा झालो
तिला पुन्हा भेटशील का ?विचारायची हिम्मतच नाही झाली ....

मी तसाच  राहिलो आयुष्यभर
तिने मात्र संसार थाटला
 

मी  मात्र निजलो  डोळे बंद  करून
मला शांत  पडलेलं पाहून
म्हणाली शोन्या ...
 " का रे माझ्यावर प्रेम करतो  सांगायचे तुझ्या अंतरातच का रे  राहून गेलं ? "....
 

-
• ©प्रशांत शिंदे•
एक  हृदयस्पर्शी कथा बाप-लेकीची ....<3

एक लहान मुलगी  जिची आईचा  तिचा  जन्म होताच मृत्यू होतो   आणि तिचा सांभाळ पूर्णपणे पप्पांनीच   केला
तिचे   तिच्या पप्पा वर  खूप प्रेम होते
एक दिवस  पप्पांना म्हणते :

मुलगी :पप्पा तुम्ही कधी  मला  मारले  का  नाही ??
पप्पा :  बाळ , मी तुझ्यावर  खूप  प्रेम करतो म्हणून ..<3
मुलगी : पण मुलगी तर दुसर्यांची  असते  असे म्हणतात ?

पप्पा : हो  बाळ ..पण  रक्ताचे नाते असतं हे म्हणून जीव लागलेला असतो ,
आणि तू तर  माझी गोजीरी  आहेस माझा  जीव  आहेस , तुला कसे  सोडू मी ..

जेव्हा लग्न करून  जाशील तेव्हा  काय माहित  माझे कसे होईल ....
तुझ्या आईने पण  मग  मला  सतावून  सोडले  असते .. माझी  मुलगी कशी असेल तिकडे, जेवली   असेल  कि  नाही ... बरी तर असेल ना ...
आणि तीच काळजी मलाही  असेल ..

मुलगी  : लव्ह यु  पप्पा <3
आणि  पप्पांना जोरात मिठी  मारत  दोघांचे हि  डोळे पाणावतात ...

एक  दिवस त्या  मुलीचे  लग्न  ठरतं..
आणि  पप्पा लग्नाच्या तयारीला लागतात , पप्पांना  असे काम करताना  पाहून  मुलगी  हि मदत  करू लागते  कारण  घरी काम करणारे दोघेच ..

पप्पा  जवळच्याच एका  दुकानात आपल्या मुलीसाठी  साडी घ्यायला  जातात डझनभर  साड्या पहिल्या नंतर  एक साडी  पप्पा आपल्या  लाडकीसाठी निवडतात ..
मुलगी  साडी घेऊन  दुकानाच्या  बाहेर पडते आणि  पप्पा दुकानदाराचे पैसे द्यायला थांबतात  ..
तेवढ्यात एक  मारुती कार रस्ता ओलांडून   दुकानाकडे येते पापांना  ते  दिसत पण  पप्पा काही हालचाल  करण्याआधीच त्या कारने  गोजोरीला  खाली पाडले होते  ....
पप्पानी घेऊन दिलेल्या साड्यांवर रक्तच रक्त  होते पप्पा धावत जाऊन आपल्या  लाडकीला   जवळ  घेतात  आणि  त्यांच्या  डोळ्यांतून अश्रू  अनावर  होतात .

त्या अवस्थेत हि 
ती पप्पांना बोलते  :  "मला  तुमच्या सोबत राहायचे होते , मला  लग्न  करून  दुसर्या घरी जायचे नव्हते " ...

 आणि पप्पांना खूप दुख होतं आपल्या  लाडकी ला कधी  एक  हात  उचलला  नव्हता  आणि ती आज रक्तात भिजलेली होती ...
 हे  दुख  त्यांना सहन होत नाही आणि  पप्पांचा हि  श्वास  संपून   जातो .....

त्या  कार ने  एक नाही  दोन  जीव  घेतले ....
बापलेकीचे  प्रेम  पाहून  तेथिल लोकांचे हि  डोळे भरले होते ....

-
• ©प्रशांत शिंदे•

Friday, July 5, 2013

येशील का तु सये..



येशील का तु सये
तेव्हा निरव शांतता पसरली असणार
माझ्या देहाजवळ येऊन
कपाळावर एक चुंबन दयायला...

येशील का तु सये
फुलांमध्ये लपलेलो मी तु शोधायला
अंगावर सफेद चादर काढुन
श्वास घे म्हणायला....

येशील का तु सये.....!!
-
• ©प्रशांत शिंदे•

आवड तुला माझी आजपर्यंत कळली नाही



आवड तुला माझी आजपर्यंत कळली नाही

माझी आवड तू होतीस

आजतरी समजून घे

कधी माझ्याकडे पाहिले नाहीस

आज डोळेभरून तू बघून घे

उद्या पुन्हा हा देह माझा

कुणास कधी दिसणार हि नाही ....
-
• ©प्रशांत शिंदे•

थोडं तिच्याबद्दल ........


तिच्याबद्दल सांगायचे म्हटलं की
शब्द सापडत नाही
कोरया कागदावरचे रंगांनीही
तिचे चित्रही रंगत नाही
अशीच आहे ती
बघताच भूरळ पाडणारी
माझी जरी नसली
तरी मला मोहात पाडणारी...

तिच्याबद्दल सांगायचे म्हटले की
माझी स्पंदनेही ऐकत नाहीत
तिच्या नावावर तर
माझी कविता ही थांबत नाही...
अन कवितेला मात्र ती
कधीच वाचत नाही..

तरी मी नाव घेतो तिचे
कारण ह्रदय हे आता माझेही ऐकत नाही
-
• ©प्रशांत शिंदे•
02-07-13

शब्द मांडणे म्हणजे..

शब्द मांडणे म्हणजे बुद्धीबळाचा खेळ..

शब्दांना खुप महत्व असते
फक्त पाहीले जाते
त्यांची रचना आपण कसे करतो....
कारण ..
पुढील घटना त्यावर अवलंबुन असतात
-
• ©प्रशांत शिंदे•

माझे प्रेम..!




तुझ्या दिसण्यावर नाही
तर तुझ्यावर प्रेम केलं आहे

हार नाही मानली कधी
जरी प्राणज्योत माझी मावळली आहे

प्रेम करतेस तु
तुझ्या नजरा आजही बोलतात

तुलाही काळजी आहे माझी
तुझी स्पंदने बघ मला
जोरात ओरडुन सांगतात

हयाच तुझ्या अदावर प्रेम केलं
खरं सांगु तिथेच माझं तोल गेलं
होशील माझी ही आस
आजही अंतरी आहे..

वेळ अखेरची असली तरी
मुखावर तुझ्यामुळेच तर आनंद आहे..
-
• ©प्रशांत शिंदे•

रूपवती...!




सुंदर तुझ्या बोलण्यावर

आज जग हे सारं फसतंय

सारखे तुझ्याच मागे मागे कसे लागतंय

चुकी तरी काय त्यांची

काय ठाऊक त्यांना

हि सुंदर रूपवती आता

फक्त माझ्याच जाळ्याला अडकतंय ....
-
• ©प्रशांत शिंदे•

आपल्या प्रेमाची कहाणी ..!

आपल्या प्रेमाची कहाणी ..!
______________________________
आई नंतर  आज  एक तुला आपले मानलंय
तुझ्या  कुशीत  मी 
माझे अस्तित्व  आज  शोधलंय

आजवर कुणासाठी  नाही जगलो
पण  तुझ्यासाठी जगायचंय
तू  माझी  झालीस  आता
तुला  सुखात  मला  ठेवायचंय

खूप  स्वप्न  पाहिलेत मी
तुझ्या अन माझ्यासाठी
दोघांनी  मिळून आता  अस्तित्वात ते  आणायचंय 

तू म्हणायचे मला  छोटंस  बाळ पाहिजे
मी म्हणायचे मला छकुलीचे पापे  घ्यायचेत 
दोघांमध्ये ह्यावरून कधी कधी भांडण  हि  घडायची
मग जवळ घेऊन मी  लगेच तुला   मनवायचं..

असेच  आपले  आयुष्य  निघून जायचं
मग.... 
उतारवयात  दोघांनीच  कुठेतरी निवांतात  राहायचं

दोघेच  गप्पा मारायचे  अन   
पुन्हा  लग्नाचे  पहिले दिवस आठवायचे

असेच एक  दिवस तू 
अन  एक दिवस  मी  हि  हे जग  सोडायचं ....
आपल्या प्रेमाची कहाणी
आपण  असेच असेच  घडवायचं....

-

• ©प्रशांत शिंदे•

Thursday, July 4, 2013

ये जवळ माझ्या तुला शेवटचे आज मिठीत घेऊ दे ..!

ये जवळ  माझ्या तुला शेवटचे  आज मिठीत  घेऊ दे ..
____________________________________________

तुझ्या डोळ्यांमधून मला माझे चित्र आज मिटवू दे
तू आज  दुसर्याची झाली आहेस
मग  मी कशाला तुझे  दुख म्हणून जगावे
लिह्ल्यात मी कविता तुझ्यावर
कधी काळी  तुला खूप आवडायच्या
माझ्याच साठी  लिहतोस ना
मग  मलाच  वाचून दाखवत जा  म्हणायची ...

तुझ्यावर लिहलेल्या एकूण एक कविता आज
ह्या पाण्यामध्ये  भिजवू दे
वाहून जाऊ दे त्यांना
तुझ्यासाठी त्या आता कवडीमोल आहे ..

नाही पहायचे मला माझ्या  ह्या कविता कुणी वाचाव्या
मग  त्याच्या हृदयाला स्पर्श करून
त्याचा हि कंठ  दाटावा....

एकच  मागणी आहे  माझी
ये जवळ  माझ्या तुला शेवटचे  आज मिठीत  घेऊ दे ....
-
• ©प्रशांत शिंदे•

किती वेडं असतं ना प्रेम ....!!

किती वेडं असतं ना प्रेम
हे मी आज पहिले आहे
तू विसरली जरी मला
मात्र आजही मी  तुझाच  चाहता आहे ..

किती वेडं असतं ना प्रेम
जातभेद काहीच पाहत नाही
तू  मात्र हे जात मानतेस
मी  फक्त माणुसकी मानतो
जातभेद पाहणारे तर अनेक आहेत
मी वेडा तुझा तुझ्यावर निस्सीम प्रेम करून  बसलो ...

किती वेडं असतं ना प्रेम
एकदा आपले मानले कि विसरता हि येत नाही
तिच्यासाठी धडपडतं
मग  रक्त हि गेले  तरी काही हरकत नाही ..

तिच्या हसर्या चेहर्यासाठी
आयुष्यभर झटावे  म्हणतं
मग तिच्या तिरस्कार का असो
तिच्या  डोळ्यांत पाणी येऊ द्यायचे नाही ...

किती वेडं असतं ना प्रेम
जीव गेला तरी काहींना त्याची जाणीव हि  होत नाही ..
-
• ©प्रशांत शिंदे•

Monday, July 1, 2013

आवड तुला माझी.....

आवड तुला माझी आजपर्यंत कळली नाही
माझी आवड तू होतीस
आजतरी समजून घे
कधी माझ्याकडे  पाहिले नाहीस
आज डोळेभरून तू बघून घे
उद्या पुन्हा हा देह माझा
कुणास कधी  दिसणार  हि  नाही ....
-
• ©प्रशांत शिंदे•

कोरंच असतं आभाळही

कोरंच असतं आभाळही
इंद्रधनुष्य त्यात रंग भरतं 
कोरी पाटीवर ही  लिहलेले शब्द कुणी
कारण नसता पुसट करतं
आपण  तर भावनाविवश असतो
म्हणूनच तर सारेच आता
आपला फायदा उचलत  असतं ....
-
• ©प्रशांत शिंदे•

जिवन म्हणजे.........

जगणे म्हणजे काय असतं
रानामधलं एक फळ असतं

सारेच मिळवायला धडपडत असतात

पण..

मिळतं लगेच त्याचं नशिब असतं

काटयातुन कुणीमिळवतं

कुणी उपेक्षीत राहतं

हातात घ्उनी
कुणी हातानेच सांडवत असतं...

जिवन म्हणजे लहर सागराची

स्वार होण्यास सारेच पाहत असतं

कुणी मजेत स्वार होतो
तर काहींस जीवालाही गमावत असतो...

जगणे म्हणजे काय

खरे तर आंधळाच बरयाने सांगत असतो...
-
• ©प्रशांत शिंदे•