Tuesday, December 24, 2013

बघून घे तू अखेरचे ....

बघून घे तू  अखेरचे 
आज सजलेल्या माझ्या देहाला

आजवर कधी स्वीकारले नाहीस
बघ आज मृत्यूने केला स्वीकार माझा
नको पश्चाताप करू
मला जमणार हि नाही पुन्हा तुझ्यावर जीव  ओवाळायला ......

जातो सये  कायमचे आता
तू मात्र कधीच रडायचे नाहीस
अन  डोळे मिटल्यावर  दिसलोच कधी
तर मला तू तेव्हा घाबरायचे नाही

समजून घे प्रेमाला माझ्या
तुझ्या सुखासाठीच  निघून जातो आहे
माझ्या वाटेचे सुखांना तुझ्या पदरी सोडतो आहे

येईल तुला हि आठवण माझी
तू पहिली भेट आठवायची
मी भेटलेलो त्या जागेवर जाऊन
तू  फक्त ये पुन्हा हाक मारायची ....

मी मात्र येणार नाही
पण ....
मला खूप आनंदर होईल
माझ्या मारण्याला ह्या 
तेव्हा खरेच तेव्हा शांती साध्य होईल ....

बघून घे तू  अखेरचे 
आज सजलेल्या माझ्या देहाला .... :'(
-
©प्रशांत डी शिंदे

दि . २४/१२/२०१३

मी निघून जात आहे ..

मी  निघून जात आहे

तुला आनंदी ठेवायला


माझ्या डोळ्यांतल्या आसवांनी

तुझी झोळी सुखाने भरायला .......
-
©प्रशांत डी शिंदे

Wednesday, December 18, 2013

ह्या मनाचे एक असेही जग असते..........

ह्या मनाचे  एक  असेही जग असते
विचारांशिवाय   कुठे तरी

एक रिकामे घर असते
असेच  घर  सजवायचे असतं ते
अन कुणी तरी भेटले कि जपायचे  असतं ते

वाट पाहण्यात  निघून जातं आयुष्य
पण  हरण्यातच तर 
कधी कधी प्रेमाचे यश असते .........
-
• ©प्रशांत .डी. शिंदे•
दि .१८/१२/२०१३

तीच माझे सारे काही ....

तीच  माझे सारे काही
तीच माझ्या श्वासात ही
ह्या मनाला प्रेमाने सावरणारी
तीच माझ प्रेमही

ती आहे तर कविताही
तिच्या हास्यात माझे आनंद
तिच्या रडण्यात माझे दु:खही


तीच  माझे सारे काही ....

-
• ©प्रशांत .डी. शिंदे•
दि .१८/१२/२०१३  

Friday, December 6, 2013

पाऊस काळोखाचा .........

त्या पावसाचे  वेड  कधीच मला नव्हते

भिजून निघालो त्यात कसे मी

मुखावर प्रश्न  माझ्या मनाचेच होते

पुढे जाताना  पहिले मी  तेव्हा

ते  डाग आयुष्यभराचे  होते   ..................

का  पडला हा पाऊस

चुकी माझी  नव्हतीच

मोह  तो  चित्र पाहण्याचा

रंग  माझे हिरावुनी गेला ...........

नशिबास माझे  काळोखात ढकलुनी गेला .........
-
© प्रशांत डी शिंदे

दि.०६/१२/२०१३