Friday, December 28, 2012

असेच करायचे असतं...!

असेच करायचे असतं...!

असेच करायचे असतं
आपल्याला  अश्रू मिळाले  तरी चालेल 
पण ...??
तिच्या  मुखावर हसू आणायचे असतं ..
असेच करायचे असतं..
ती आपली झाली नाही तरी
तिला  आपलेच मानायचे असतं
तिच्या आठवणी  पुस्तकात लिहून 
त्याचा  एक  एक पान  चाळायचे असतं ....

असेच करायचे असतं ...!

आहे  जरा  वेडा मी
जे  तुझ्यात गुंतून बसलोय
तुझ्या सहवासातला  प्रत्येक   क्षण तो
मी एकट्यात आठवत बसलोय
पहिल्या प्रेम आहे हे  जे कधीच  विसरायचे नसतं ...

असेच करायचे असतं ... !
-
© प्रशांत शिंदे

Friday, December 21, 2012

तुझ्याकडेच पहायची मी ...!

तुझ्याकडेच  पहायची  मी ...!

जेव्हा जवळ  यायचा  तू  श्वास  माझा  फुलायचा
अन तुलाच पाहावेस वाटायचे
तुझ्या मिठीत  हरवून जावे वाटायचे
तुला प्रेम करत  तुलाच  स्वाधीन होऊन जायचे....

आवडतो  तो स्पर्श तुझा
अन जेव्हा माझ्या केसांतून  हात  तुझा  फिरायचा
तुझ्या हातातले ते  फुल माझ्या केसांत तू मळायचा ...

तुझ्याकडेच  पहायची  मी ...!

बेभान  व्हायचे मी तुझीच व्हायचे मी
तुझे  हे प्रेम  आयुष्यभर  मिळू दे
देवाला हि  हात पसरून मागायचे मी ....

तुझ्याकडेच  पहायची  मी ...!

© प्रशांत शिंदे

Wednesday, December 19, 2012

कुणीतरी असावं !!

कुणीतरी असावं U r my pumkin pumkin म्हणणारं

कुणीतरी असावं सारखं Sms करणारं

रात्री झोप नाही येत बोलुन मलाही जागवणारं

कुणीतरी असावं Docomo ते Docomo वर तासनतास बोलणारं

कधी हसणारं तर कधी डोकं दुखवणारं

कुणी तरी असावं गप ना रे म्हणणारं...

कुणी तरी असावं टकल्या म्हणणारं

माझ्या रागाला आवरणारं

असच कुणीतरी  अगोदर रागावणारं अन मग जवळ घेणारं....

असावं कुणीतरी..!!
-
© प्रशांत शिंदे
१९/१२/२०१२


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Tuesday, December 11, 2012

माझे काय अस्तित्व !

माझे काय अस्तित्व

मी  कधीच  हरवून  बसलोय

माझे काय  अश्रू  त्यांना

मी कधीच  गोठवून बसलोय

राहिलंय  अंधार तुझ्या  विरहाचा

त्यालाच  आपले मानून 

दिवस  रात्र तुला आठवत

तिथेच  डोळे पुसत बसलोय ....
-
© प्रशांत शिंदे

Monday, December 10, 2012

तुझी अन माझी भेट पहिली !

आठवतं  का  तुला  तुझी अन माझी  भेट पहिली
मला आज हि आठवते
तुझ्या कडे पाहताना  तेव्हा हि  माझ्या नजरा  झुकलेल्या
अन आज हि तसेच आहे
तूच  बोलत होतास  तेव्हा  

अन मी गप्प होते
का  मी
मी बोलत नाही म्हणून  हातात  हात  धरून  विचारात     होतास
मग मी  हि  तुझ्या  डोळ्यांत  बघून
माझ्या  नजरेनेच  तुला सांगत होती
भाव ते मनातले जाणून
तू  मिठीत  घेऊन तुझ्या  हृदायचे स्पंदने  ती  ऐकवत
होतास
किती रे  प्रेम होते  ते  तुझ्या स्पंदनांनी  सांगत होता होतास

तशी ती भेट आपली खूपच खास  होती
कारण  तीच  आपली  आपली पहिली भेट होती ..

पण  आता तसे राहिले नाही
मी  तुला  आवाज   देताना  हि
तुझा  मात्र  तसा साद  येत नाही

खूप  बदलला   आहेस  रे  तू
तू पहिल्या भेटीतला  तू राहिला नाहीस
आज तुला  खरच  वेळ  नसतो  का माझ्यासाठी
मी तर  आज हि  तशीच आहे रे
तुझ्याच  वाटेवर थांबलेली

का  ते  दिवस  खरच परत येणार  नाहीत ...
नाही  रे जगता  येत  मला तेच   क्षण  आठवतात रे
तोच तू आठवतोस  अन तो  स्पर्श  प्रेमाचा आठवतो
पण तसे  आज  होतच  नाही

कारण तीच  आपली  आपली पहिली भेट होती ..


-

१०/१२/२०१२

© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Friday, December 7, 2012

तुला आठवताना मी नेहमीच हरवून जायचे .......

तुला आठवताना  मी  नेहमीच  हरवून जायचे
तुझे  नाव  ह्या ओठांवर  थांबून तसेच  राहायचे
मग पुन्हा जायचे  मी  त्या जागेवर
जिथे  तू अन मी भेटायचो
तोच तो किनारा  होता  त्याच  त्या लाटा
तिथेच पलीकडे   दगडावर  तुझाच  भास तिथे मिळायचे

तुला आठवताना मी नेहमीच  हरवून जायचे
अन त्या  दगडांवर  माझे  डोळे  लगेच  ओलावायचे

मग  डोळे  पुसून  मी तसेच घरी यायचे
गेला  तो काळ अन  गेली  ती  वेळ
सांगत  माझे  एकटेपण मला छळायचे...

माझे एकटेपण  तेव्हा  माझ्यावरच  हसायचे  ....माझ्यावरच  हसायचे

तुला आठवताना मी नेहमीच  हरवून जायचे ........

-
© प्रशांत शिंदे

इच्छा नसताना हि आयुष्य हे जगत असतं ..

तसे तर  माझ्याकडे बोलायला  काहीच नसतं

शब्दच  असतात  सोबत

जे मनास  माझ्या  नेहमीच  ओलावत असतं

विचार  असतात मनात  ज्यांचे उत्तर

जगताना  शोधत  असतं

शोधून  मिळत नाही ते  उत्तर प्रश्नांचे

तरी  हि  हे  आयुष्य जगत  असतं

इच्छा  नसताना  हि  आयुष्य हे जगत असतं ....
-
© प्रशांत शिंदे

Friday, November 30, 2012

माझे तुझ्यावरचे प्रेम तुला कधीच कळले नाही !

माझे  तुझ्यावरचे  प्रेम  खूप होतं

हे तुला कधीच कळले नाही

उगीच  काळजी  करत  जगलो तुझी मी

तू माझी कधीच  झाली नाहीस

तुला  जपत राहिलो  मी  मला  जखमा  घेतल्या

तू  सोडून गेल्यावर  मात्र  त्या माझ्यावरच  हसल्या

माझे  तुझ्यावरचे प्रेम  तुला कधीच कळले नाही

आयुष्य सरले माझे तरी ही तू

कधी  मागे  वळून पहिले नाहीस ,,,,

माझे  तुझ्यावरचे प्रेम  तुला कधीच कळले नाही ...!

माझे  तुझ्यावरचे प्रेम  तुला कधीच कळले नाही !

-
© प्रशांत शिंदे

तुझे दु:ख मी माझ्या नशिबात मागावं !


जाणीव आहे मला तु माझी असण्याची

प्रेम तु ही करते आहेस माझ्यावर

फक्त वाट पाहत आहेस

नाव  तुझे माझ्या  ओठांना ऐकण्याची

तुझं रागावणं अन अबोल माझ्याशी धरणं

ठाऊक असुनही मी तुझाच तरी

संशय  घेतेस तु मी दुसरया कुणाचा असण्याची 

तुला वाटतं  मीच तुला मनवावं

तुझ्या डोळयांत पाणी पाहून मी ही गहीवरावं

हो  गं शोना  मी तुला उदास पाहत नाही

वाटतं तुला हसत मी ठेवावं

अन ..

तुझे दुख ही मी माझ्याच नशिबात मागावं...

तुझे दु:ख मी माझ्याच नशिबात मागावं.. !!

-

© प्रशांत शिंदे
२९/११/२०१२


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

माझे खूप प्रेम होते तुझ्यावर ...

तू नाही  समजलीस  गं
माझे केवढे  प्रेम  आहे तुझ्यावर
फक्त रागवत गेलीस  अन
लाथाळलेस  तू माझ्या  हृदयाला

समजून  तरी घ्याचेस  माझा  जीव  तुझ्यासाठी तुटतो
नाही  समजलीस  ना तुझ्यासाठी  जगलेल्या  त्या रात्रींना

माझे प्रेम  तसेच आहे गं  तुला  समजावू नाही  मी शकलो
तुला  ओळखता हि आले नाही  अन  मी  तुला  गमावून  बसलो

समजली  नाहीस  तू माझे  खूप प्रेम होते  तुझ्यावर ...

माझे  खूप प्रेम होते  तुझ्यावर  ...

-
© प्रशांत शिंदे
३०/ ११/२०१२

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Friday, November 23, 2012

भावना वेड्या मनाच्या..!



पहील्या भेटीत एका प्रेमवेडयाने व्यक्त केलेल्या भावना..

काल ठरवलं मी तिला भेटायचं

ती ही आतुर होती भेटावयास

तिची लगबग मज भेटण्यासाठी होती

तिने ही घरी बहाना केला होता

स्पंदने तिची मला ती ऐकवत होती

ती म्हणाली पाहतोस का तु कधी

भिजलेल्या हया डोळयांना
आतुर असतात त्या रोज मला जागवण्यासाठी

मी जागते तुझी वाट पाहत
पण..??
केव्हा डोळे बंद होतात कळत नाही

वाटतं तु वाटच पाहत असतोस
मी निघते कधी चांदण्यात तुला शोधण्याची

जे तु एक मोती सारखा चमकतोस तुझ्या जवळ येताच
तु अंधारात सोडुन जातोस...

मी ही दाखवलं तिला
भावस्पर्श माझ्या डोळयांतलान

मी ही प्रेम करतो हे तुला कसे मी जाणवणार

वारयाच्या त्या लहरीमध्ये ही तुझाच सुगंध
माझ्या वेडया मनाला मुग्ध करत असतो

नको बोलु ऐसे मी किती तुला आठवण करतो

ते सोनेरी पान बघ तुला आठवण्याआधी ते पुरेपुर कोर असतं...

होशील ना माझी शोना..

कळलंय मला हे जिवन प्रेमाशिवाय अधुरं असतं..
-
© प्रशांत शिंदे
१३/१०/१२

पाहीलंय मी तिला ..!

पाहीलंय मी किनारयाला
किनारयास भेटणारया त्या क्षारांच्या लाटांना..

पाहीलंय मी वाट पाहणारया त्या तुझ्या नयनांना..

पाहीलंय आज सुकलेल्या त्या
दगडांना

जिथे बसुन तु काही तरी लिहायची

पाहीलंय मी त्या तुझ्या स्पंदनांना

ऐकलंय मी  येणारया हुंदक्यांना

वादळ बनलेल्या त्या तुझ्या विचारांना

पाहीलंय मी एकटं पडलेल्या त्या पाखराला

संपलेल्या त्या तुझ्या प्रेमाला

पाहीलंय मी तुला
माझी असुनही दुसरयाची होताना

पाहीलंय मी त्या दिलेल्या फुलाला रडताना.....
-
© प्रशांत शिंदे

१९/१०/२०१२
(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

माझी चिता पेटताना ..!

माझी चिता पेटताना

आग अजुन एकीकडे पडली होती

आठवणींची आग माझ्या ती

जिला पेटवताना ती अजुनच पेटत
घेत होती..

जी मला आठवत होती
ती माझी प्रेयसी होती..

माझी प्रेयसी होती...
-
© प्रशांत शिंदे
२०/१०/२०१२

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

तु फक्त तु !!

जेव्हा पावसात भिजलेलो आपण
मनसोक्त भिजणारी फक्त तु होती

आठवणींत हरवले असताना मी
मला जवळ करुन ओठांशी बोलणारी तु फक्त तु होती

अधुरं होतं जगणं माझे
माझी प्रेयसी बनुन हात धरणारी

तर कधी डोळयांतले भाव जाणनारी
तु फक्त तुच होती....

माझ्या ह्या कवितेची सुरुवात
अन अखेर तु फक्त तु होती....

© प्रशांत शिंदे
२७/१०/ २०१२


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

नाही कुणी माझे दु:ख जाणणारे...

दिसतोय मी हसताना

चेहरयावर हसु आहे

ते तर मी नेहमीच ठेवतो

कारण मला ठाऊक आहे

दु:खांवर माझ्या हसण्याचाच
तो लेप आहे..

 न कुणी पाहणारे

न कुणी जाणनारे

जगणे ही मुश्किल केलंय माझे

ऐसे हे दु:ख जे

अश्रुंसोबत ही न ते वाहत जाणारे..

आहेत दु:ख सांगु कुणास मी

नात्यांमध्ये असतानाही बाहेर मज ठेवणारे..

नाही कुणी माझे दु:ख जाणणारे... 
माझे दु:ख जाणणारे..


© प्रशांत शिंदे
१७/११/२०१२

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे


Thursday, November 22, 2012

आता असेच जगतो आहे मी ...!!

दु:ख खूप आहेत  आयुष्यात माझ्या 
लढता लढता  जगतो  आहे मी 
माझे  दु:ख माझ्या  चेहऱ्यावर हि  लपवतो आहे मी 
आता  असेच  जगतो आहे मी ...

खूप प्रेम केलं   तिच्यावर  
पण  तरी  ही   ती  दुसर्याची झाली 
तिला  दुसर्याची  पाहून  अंतरात रडतो आहे मी 
आता असेच जगतो आहे मी ....!!

ती  गेली  निघून काहीच कारण  न  देता 
नेहमीच भांडायची ती वाटले असेच असेल यंदा 
मी  तिला मानवले हि  पण ती हसता हसता  गेली 
आता तिच्या आठवणीच  राहिल्यात सोबत 
रात्रभर त्यांना आठवत राहतो मी 
आता असेच  जगतो आहे मी ......!!

तिच्यासाठी जगताना स्वतचे अस्तित्व विसरलो मी 
आता  तिच्या  आठवणींसोबत 
माझे आयुष्य  ही कमी करतो आहे मी 
आता असेच जगतो आहे मी ....

आयुष्याचा  शेवट कधी  होईल  
ह्या आशेवर वाट पाहत  आता एकटेच  जगतो आहे मी  
दु:ख माझे  चेहऱ्यावर ही  लपवून 
आता असेच जगतो आहे मी ...!

-
(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे


२२/११/२०१२




तुला प्रेमच प्रेम करायचे ....!!

 काल  रात्र जागलो  मी

ती हि  जागली असणार ??

आज  हि काळजाला  दुखतं माझ्या

कदाचित  तिला हि ते  जाणवत असणार ....

असे  रे  कसे प्रेम हे सारखे परीक्षा  घेत असतं

नको असतं तरी हि  डोळ्यांत ते  अश्रू आणत असतं ..

प्रेम करतो  तुझ्यावर  मला  तुला अश्रू नाही द्यायचे

तुझ्या पदरात प्रेम देऊन मला तुझ्याच मिठीत मरायचे 

घेशील  ना मिठीत तेव्हा

जेव्हा  माझे मरण  येईल

इच्छा आहे  माझी एवढीच शोना

मला  तुझ्याच  मिठीत मरायचे आहे  ......

अखेरच्या श्वासापर्यंत  तुला प्रेम करायचे आहे  

तुला प्रेमच प्रेम करायचे आहे ....!!

-
(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे


२२/११/२०१२

Thursday, November 15, 2012

दुख हे माझे !

माझे  तर  आयुष्यच  मोत्यांनी  बांधलेलं  होतं

ज्यात रंगहीन  मोती  माळलेले

गळ्यात  तिच्या तो सुंदर  दिसायचा

म्हणून तर तिने फक्त  शोभेसाठी च  वापरलं  होतं

काय  असेच हे आयुष्य आहे

न  कुणी  न माझे कुणी आहे ..

दुख  हे माझे  फक्त  एवढेच आहे  ..  फक्त  एवढेच आहे .. :(

Friday, November 2, 2012

कधी ह्या हृदयाचे ऐकुन घे ना....!

शब्द  बोलतात  ते कळतं सार्यांना

शब्द  ते बोलतात  हृदयाशी

पण  कधी  पाहिलंस  का

डोळ्यांना ही काही सांगायचे  असतं

मनातले गुपित  तुझ्यापाशी उघडायचं असतं ....

तू मात्र  तशीच रागावतेस अन  रुसतेस

माझ्या रागाला नेहमीच अशांतताच भेटते

तूला  मात्र माझ्याजवळ  मन मोकळे करता येतं

पण माझे  हृदयाचे  कधी ऐकलस का

त्याला हि  तुझ्याजवळ काही ऐकवायचं असतं ...

कधी  ह्या  हृदयाचे ऐकुन घे ना....

-
© प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•. 
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

फक्त मैत्री अन मैत्रीच !

खूप  हसली होतीस अन थोडी  रडली हि होतीस
मनातला राग  तुझा  शान केल्यावर तू  तेव्हा कसे बघत होतीस
म्हणालीस  तू मला कोण  रे  तू कुठचा
न  ओळख  न पाळखीचा
तरीही  मला  तू  कसा  शांत करतो
 

मी मात्र  तसेच  पाहत राहिलो  तिच्याकडे
मी  म्हणालो  वेडे हीच  तर  धागा  तुला बांधतो आहे  मैत्रीचा
अन अशीच आपली  मैत्री जमली होती ...

केवढी  खुश  होतीस  तू  जणू  सारं काही मिळालं
तुझ्या  ह्या   निखळ  सौंदर्याला
ती गालावरची  खळी अगदी शोभत  होती

तू जेव्हा हसायची   ती खळी सुंदर  दिसायची
जणू  त्तुझ्यामुळे  ती  खळीच उठून  दिसायची ...
केवढी  ग  सुंदर तू  अन  डोळे भरून आणतेस
मी तर  जाईल कधीहि  हे फक्त  तूच   मात्र ओळखतेस
ठाऊक  आहे  तुला आपले नात  आहे मैत्रीचं
पण  हे  नातं तू  दिली आहेस  भेट आयुष्यभराचं....

अशीच  हसत  राहावी  मला मनापासून वाटतं
तुझे  आनंद  मी  नेहमीच जपून ठेवायचं
आपल्या  ह्या  पवित्र   नात्याला  कधी  कुणीच नाही  बोलायचं
नाव  त्याला  फक्त  मैत्री अन मैत्रीच  असायचं..... 


-
© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Thursday, November 1, 2012

मला तू हवा होतास रे ..... !

प्रेम न  स्वीकारणाऱ्या प्रियकराला  शेवटचे लिहलेले  पत्र वाचून नक्कीच  तुम्हाला  हि  डोळ्यांत पाणी येईल ...

शोना माझे  हे पत्र आज तुला काही  सांगणार आहे
जे  तू  कधी ऐकले नाहीस 
ते   तुझ्या  डोळ्यां समोर उघडणार आहे

कधी  तरी कळेल  तुला 
तू तेव्हा  तरसशील
खोटे म्हणणाऱ्या  ह्या  प्रेमाला तू  खरच तेव्हा ओळखशील

प्रेम  खरच  असता  रे  तुला  आज नाही  समजलं
गर्दीत  हरवला आहेस  तू
अन  त्यात तू मला हि  गमावलंस  

म्हणायचास न  तूच  मी प्रेम मनात नाही
पण  वेळ येईल  तुला तेव्हा  मीच  कुठे  सापडणार नाही

रडशील  तेव्हा  तू मला आठवण  करून
पण तेव्हा मला हि  तुझ्या डोळ्यांत  प्रेम पाहता  येणार नाही

मला  खरंच   तू  हवा होतास रे
जाणून का  घेतलं  नाहीस
ओल्या माझ्या हृदयाला मिठीत  का  सुखावलं  नाहीस

आता   खूप  वेळ   झाली शोना
मी दूर निघून  आली
माझे अस्तित्वच मी  तुझ्या जवळ  विसरून आली

माझे  हे पत्रर वाचून  शोना  डोळे भरू देऊ नकोस
प्रेम केलंय रे   तुझ्यावर मी
तुझ्याच  सोबत  असणार जेव्हा   मला आठवशील
तुला बंद  डोळ्यांनीहि मी समोर सापडणार ...


मला  खरंच   तू  हवा होतास रे  .....
फक्त तू हवा  होतास .....


-
© प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे
 

Friday, October 26, 2012

अखेरची भेट आमची अखेरचीच ठरली ...!


ती भेटली  मला त्या दिवशी 
अन मी हि  तिला भेटलो 

तिची माझी भेट  तशी पहिलीच होती 
त्या दिवशी तिच्यासाठी मी  मित्र
अन माझ्यासाठी ती प्रेयसी झाली 
मन जडले तिच्यावर  
अन प्रेमात तिच्या मी पडलो 

मग  काही दिवसांत
दोघांत  भांडण होऊ लागली  
काही न काही कारण घेऊन ती चिडायला लागली 

एक दिवस असा आला मला सोडून  ती  गेली 
खूप  खचलो होतो तिच्या जाण्याने 
हृदय हि तुटले माझे  तिच्या गेल्याने 

दिवसाचे काय ते तर  तसेच जायचे 
तिला आठवत अन डोळे पाणावत 

मग काही दिवसाने  आमची 
अशी काही भेट झाली 

ती  एकटी  अन मी  हि एकटाच होतो 
फक्त ती आणि  मी  दुसरे कुणाचाच तिथे भास नव्हता 

रडली  ती खूप  
पण मी  काहीच करू नाही शकलो 
माझ्याशी  तिला काही  बोलायचे होते 
पण बोलू न शकली  ती 

ती  रडत होती मला पाहून 
पण  फरक  एवढा होता 
ती माझ्या देहावर रडत होती 
अन  देहाच्या बाहेरून  .... 

अखेरची भेट  आमची अखेरचीच  ठरली ...!
-
© प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे 
 

 
 


 

नाही कवी मी !


नाही   कवी  मी  तरीही  लिहतो

नाही रवी मी तरीही चमकतो

तुझ्या जवळ  रहावे म्हणून

तुझ्या केसांतलं 
ते फुल  मी बनतो ....
-
© प्रशांत शिंदे

Tuesday, October 23, 2012

तुज्यावीन अधुरा मी !

खूप प्रेम करतो  गं  जाणून का घेत नाहीस

बोलतात हि स्पंदने ऐकून का घेत नाहीस

बघ न  जरा  डोळ्यांत  किती  अश्रू दाटलेत

तुझ्या रुसण्याला पूर्ण विराम का   देत नाहीस ....

जगता येत नाही  तुझ्यावीण

तू तरी समजून घे

हृदयाला  असे  तू  घायाळ  करणे  सोडून दे ...

तुज्यावीन अधुरा मी

मला समजून का घेत नाहीस ....

-
© प्रशांत शिंदे



(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Friday, October 19, 2012

सवयच आहे तिला !

किती रागावते ती
खुप छळते ती

सवयच आहे तिला
माझ्याशी भांडण्याची


अन..

मला सवयच झाली

तिचे अश्रु पुसण्याची

कधी कधी ऐकतच नाही

सवयच आहे तिला हट्ट धरण्याची

गाल फुगवुन माझ्यावर रुसण्याची

प्रेम करते ती म्हणुनच तर
जाणवते मला तिच्या अधिकारांची...

रोजचेच झालंय आता

तिला माझ्याशी अबोला धरण्याची
मग माझा दाटलेला कंठ पाहुन
माफ कर ना जान म्हणण्याची....

प्रेमळ वेदना हया देऊन मजला

सवयच आहे तिला
त्यांना रोज कुरवाळायची...

© प्रशांत शिंदे

१९ / १० / १२

Wednesday, October 17, 2012

पहिले प्रेम कधीच विसरायचे नसतं ...!

असेच करायचे असतं...!

असेच करायचे असतं
आपल्याला  अश्रू मिळाले  तरी चालेल 
पण ...??
तिच्या  मुखावर हसू आणायचे असतं ..
असेच करायचे असतं..
ती आपली झाली नाही तरी
तिला  आपलेच मानायचे असतं
तिच्या आठवणी  पुस्तकात लिहून 
त्याचा  एक  एक पान  चाळायचे असतं ....

असेच करायचे असतं ...!

आहे  जरा  वेडा मी
जे  तुझ्यात गुंतून बसलोय
तुझ्या सहवासातला  प्रत्येक   क्षण तो
मी एकट्यात आठवत बसलोय
पहिले प्रेम आहे हे  जे कधीच  विसरायचे नसतं ...

असेच करायचे असतं ... !
-
© प्रशांत शिंदे

सांग मी का प्रेम करायचे .. ??

सांग  मी  का  प्रेम  करायचे .. ??

रोज  विचारांत  त्याच्या  रात्रभर  जगायचे

त्याची  वाट  पाहत  घामात   का  भिजायचे

त्याला  तर  काळजीच  नसते
तो  हसत  हसत  येतो ....

मग   राग  आला  कि
तो  मिठीत  त्याच्या  घेतो

म्हणतो  हा  रागच  तर
माझे  प्रेम  आहे
जे  वेळ  आल्यावर  तू  माझी  आहेस  सांगतो ...

अश्रू  अन    हसू  देतं  हे  प्रेम ..

मग  ..??


सांग  ना  शोना  का  प्रेम  करायचं ..??


-
© प्रशांत शिंदे

Monday, October 15, 2012

खूपच साधा वागलो मी..!!

खूपच साधा वागलो मी
हीच होती चुकी

सावलीत तुझ्या आलो
अन....
सावली माझी हरवलो हि खंत होती मुखी

तुझ्यात मित्र शोधला तीच तर चुकी केली होती  मी

खूपच साधा वागलो मी..

आज लढतो मी एकटेच ह्या दुखांच्या सागरात
नको आहे हात कुणाचा मज जाऊद्या मृत्यू च्या दारात ...........

खूपच साधा वागलो मी..
-


© प्रशांत शिंदे

माझा टेडी !!

तू माझा टेडी
गोल गोल गालांचा टेडी
करते स्वतःच आधी खोड्या
आणि मी केल्या तर म्हणते
बोलू नकोस माझ्याशी वेड्या


पण गोड गोड तू माझी टेडी

गालांत खळी तुझ्या डोळ्यांवर चष्मा
तुला बघून आठवली माझी पहिली गर्लफ्रेंड रेश्मा ...

राग तुला येतो पण कधीच समजत नसतो
हळूच वाकून पहिले तर डोळ्यात पाणी असते ...
अशी माझी टेडी......
-
© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे
 

Wednesday, October 10, 2012

माझाच तू वाटायचा रे !

माझाच तू वाटायचा रे
माझाच तू वाटायचा
तू साथ देशील
नेहमीच मला वाटायचं
असताना सोबत तू
मला एकटे कधीच न वाटायचं....

आता तर मी स्वप्नं पहायचे
तूझ्याच मिठीत जगायचं

वाटलंच नव्हतं
तूला प्रेम करताना माझी
ऐसी दैना होईल

तूझ्याचसाठी आसवे
ती माझ्याच नयनी येईल

माझाच तू वाटायचा रे
माझाच तू वाटायचा

काय ऐसे चूकले माझे
सोडूनी तू गेलास
आठवणींचे गाठोडं तूझ्या तू
अंगणी ठेऊनी गेलास....

सांग कैसे जगू मी तूजवीण
क्षूद्र झाले मी प्रेम न मिळाले
प्रेमात तूझ्या दू:खच दू:ख मिळाले

माझाच वाटायचा रे
मला फक्त माझाच वाटायचा..
-
© प्रशांत शिंदे

Tuesday, October 9, 2012

आठवतं का तुला आपली पहिली भेट .... !!

फेसबुक वरील एक सत्य प्रेम कहाणी जी काहींसोबत झालेली असेलच ..  

आठवत का तुला आपली भेट ..!!

तूझी आणि माझी ओळख online झाली होती
तू नसायची जास्त पण मी  वाट पाहायचो
तू यायची अन मी तुला छेडायचो
तू थोडी रागवायचीस पण पुन्हा तू बोलायचीस
रागावलास का रे माझ्यावर  म्हणत  बोलना म्हणायची
थोड्याच दिवसात आपण जवळ आलेलो
कधी कधी येणारी तु आता खूप वेळ थांबायला लागली
सगळ्यांशी बोलणारी तू आता फक्त माझ्याशीच बोलू लागली

आठवतं का तुला  आपली पहिली भेट .... !!

आपण मित्रांसोबत भेटलेलो तू काहीशी लाजलेली
अन मी हि  तसा घाबरलेलो तू रागावशील तर नाहीस 
म्हणून मी गप्प्प राहिलेलो
तसे दोघे हि खूप खुश होतो 
अन तेव्हाच दोघंही प्रेमात आहोत हे कळलेलं ....
मग तू थोडा  वेळ माझ्याशी फोनवरहि  बोलू लागली
घरच्यांसमोर घाबरतेस म्हणून बाल्कनीत येऊन बोलू लागली ....
मग  तुला भेटायला   मी हि  कारण शोधू लागलो
सुरवातीला नाही पण मग मात्र तूच यायला लागलीस ....

तुला अन मला ओढ लागली होती
लग्न करण्याची  स्वप्न  आपण पाहू लागलो
तुझे  घरचे  नाही बोलतील म्हणून तू घाबरली होती
मी किती प्रेम करतो  हे तू हि जाणत होती
म्हणूनच तर घरच्यांना हि हिम्मत करून
तू आपल्याबद्दल बोलत होती .....

पण लग्न होणार नाही हे तुलाच  माहित होतं
कारण माझ्या प्रेमापेक्षा तुला  तुझा  रक्त होतं
मी आज हि  एकटाच आहे  तुझी वाट पाहत

आठवत  का तुला माझा  चेहरा 
तो चेहरा आज उदास असतो
तूला आठवत  नेहमीच  ओला होत असतो ..
कधी  कधी तर नशेत हि बडबडत असतो
खूप प्रेम केले  म्हणूनच तर सारखे  तुलाच आठवत असतो ...

आठवतं का तुला आपली पहिली  भेट  ....??

 -

© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Monday, October 8, 2012

तिला आवडतं माझ्याशी बोलायला !

तिला आवडतं माझ्याशी बोलायला 
कारण मी बोलका आहे 
तिच्या  मनातला समजत  नाही तिला 
मी  बोलून  जातो 
तिच्या एक  एक विचारांची वहीच  मी  उघडतो ..

ती म्हणते बोलत जा ना माझ्याशी  
मी खूप एकटी आहे रे 
आपल्यांमध्ये असूनही मी खूप परकी आहे रे 
तुझे  बोलणं आपलं  वाटतं 
मग तिला माझ्या मिठीत  मी घेतो 
तिचाच मी असण्याचा भास मी तिला  देतो ..

तिला तसे गाणी खूप आवडतात 
प्रेमात पडली आहे सांगून  ओठांवरही तिच्या  येतात 
कधी  तर ती माझ्यासाठी हि गाणी  बोलते 
काही  कविता ती माझ्यावर हि लिहते 
मग वाटतं हेच ते प्रेम जे आयुष्यात एकदाच भेटतं ..

ती सतत  माझ्याच विचारात असते 
रात्री अपरात्री हि  एकदा फोन करत असते 
झोप नाही लागत म्हणते मला कुशीत तुझ्या घे ना 
माझ्या खांद्यावर  डोकं ठेवून सुखाने ती झोपते 
सकाळी म्हणते मला  सोडून तर जाणार नाहीस ना 
नको रे जाऊस सोडून 
तू माझा आहेस ह्या आशेवरच तर मी जगते ...

खूप  सुंदर आहे ती 
अन प्रेम हि खूप करते 
माझ्या फिकिरीत येणारे एक एक अश्रू  तिचे  हे सांगते 
म्हणूनच तर ....
माझाही  जीव  तिच्यात  दडलाय ....
-

© प्रशांत शिंदे
(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे







Friday, October 5, 2012

खरं आहे मी आता हसायला लागलोय ..!

खरं आहे मी आता हसायला लागलोय ..! 

पण   मी विचारांत गुंतून बसलोय
ठाऊक नाही  कोणते प्रश्न आहेत
आधार हि वाटतो अन  दुरावा ही
ठाऊक नाही असे का मन झुरायला लागलंय 

खरंच आहे मी हसायला लागलोय ... !

हा तर मुखवटा आहे  हे  मलाच  ठाऊक आहे
असे  तर  हसतानाही मी रडायला लागलोय
खरंच  काय दोष  असावा  माझा
जे नशीब ही साथ माझी सोडायला लागलंय

वाटतं आता  संपवून द्यावं हे सारं
कसली हे  नातं अन कोण नाही आपलं
आपले  सांगून काळ्जास घायाळ करायला लागलंय ..

अंधारा सोबत  आता  मी जगायला लागलोय
पाठीवर नाही हात कुणाचा तरी ही
थोडं स्वप्न   पाहायला लागलोय
खरे  तर जगताना ही  मरायला लागलोय ...

खरंच आहे मी  हसायला लागलोय ...
-
© प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Wednesday, October 3, 2012

एकटा अन एकटाच मी !

एकटा अन  एकटाच  मी !

वाळूमातीचा बनलेला मी
सागरात सामावून  जाईल
माझे दुखाच एवढे  वाटेल त्याला
मला  तो कुठे  एकटे तरी सोडून येईल

कधी काही  करू न शकलो मी 
हरतच आलो आयुष्यात 
अन आज हि हरलो आहे मी

एकटा अन  एकटाच  मी !

आलो  रडत , रडवून जाईल मी
पायाची  धूळ मी हवेत हरवून जाईल मी

जाईल जेव्हा  हि  दुनिया सोडून
बघ  तेव्हा खूप  आठवण  येईल मी
पाणी  नक्कीच येईल डोळ्यांत तुझ्या
पण....?? 
पुन्हा कधीच दिसणार नाही मी ....

एकटा अन  एकटाच  मी !
-
© प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

तुझ्या सारखे कुणीच नाही ....!!

तुझ्या  सारखे कुणीच नाही...!!

गर्दीत सोडणारे आहेत  इथे
पण ....??
त्यात हात पकडणारा  कुणीच नाही
हरवशील सांगत सोबत चल म्हणणारे  कुणीच नाही

हो खरच तू म्हणत  होती मी खूप साधा आहे
मला ओळखणारे कुणीच नाही
तू होतीस आहेस म्हणून मी जगतो आहे
आपले म्हणणारे इथे माझे कुणीच नव्हते

तुझ्या सारखे कुणीच नव्हते ..!!

रोज  दिवस येतो पण रात्र होताना
तुझी आठवण  जातच नाही
एवढे प्रेम  दिलास  मला
तुझ्यावीण सखे राहवतच  नाही

खरंच  शोना तुझ्या सारखे कुणीच नाही ... !!

तूच  म्हणत होतीस मी दुखी कविता का करतो
वाटत होतं माझ्या जगण्याला काही कारणच  नाही
तू भेटलीस अन कळले
तुझ्याविना  हे जगणे जगणेच नाही ...

शोना तुझ्यासारखे कुणीच नाही
असेच जवळ  घे
मला दूर  कधीच  जायचे  नाही ....

शोना तुझ्या सारखे कुणीच नाही ....!!
-
© प्रशांत शिंदे

Friday, September 21, 2012

अंतर खुप वाढलंय.. !

अंतर वाढलंय तुझ्यात अन माझ्यात

तु आता दुर राहतेस
तरी तुझी आठवण येते

चाफा फुललाय मला भेटलाही
पण सुगंध देणं मात्र विसरलाय
कारण ते तर तुझ्यासाठी होतं

खरंच शोना..

तुझी आठवण सारखी येते
पण तुला सांगता येत नाही
कारण ..??
ही रात्र पहील्यासारखी थांबत नाही
तुझी वाट पाहण्याची सवय
हया चंद्राने मात्र सोडलीय
हो माझे आजही तसेच आहे
जागतोय रात्री तरी
डोळे मात्र उघडेच आहेत..

अंतर खरच वाढलंय ..!

कारण तु आज सासरच्या दारात आहेस
अन मी मरणाच्या

तुला कधीच जाणवणार नाही
मी कधी गेलोय

हो पण नक्कीच वेळ येईल अशी
कळेल तुलाही मी मेलोय..

अंतर खुप वाढलंय..

मी फक्त आठवण बनुन राहीलोय
तु नाही पण मित्रांनी अश्रु वाहीलेत
मी तर हतबल झालो मी येउ शकत नाही

पुन्हा जगावं वाटतं
पण..
तो देह आता माझा वाटत नाही

अंतर खुप वाढलंय.. !
-
© प्रशांत शिंदे

जमलंच नाही ....!!

जमलंच नाही ....!!
तूला  सांगायला
तू  जवळ असताना  जमलंच    नाही
नजरांनि  नजरांशी  बोलायला ...
प्रेमाच्या  सरीत  थोडावेळ भिजायला

जमलंच नाही  तुझ्या  डोळ्यांमध्ये पाहायला 
पाहायचो  चोरून  कधी तू  तर कधी मी
खरच  हिम्मत  झालीच  नाही हात धरण्याचा
प्रेम खूप  आहे  तुझ्यावर
मला मिठीत घे ना बोलायला

जमलंच नाही  ....!!

आजवर एकांतात जगलो
वाटलं  तुझी  साथ  मिळावी
पण  नेमके तुझे  लग्न ठरले
जमलंच नाही रे शेवट पर्यंत
माझे  हे प्रेम सांगायला...

माझ्या प्रेम कहाणीचा सुखद अंत करायला
जमलेच नाही .....!!  

-
© प्रशांत शिंदे

Friday, September 7, 2012

माझ्या हसण्यावर जाऊ नको !

माझ्या  हसण्यावर  जाऊ  नको

मी नेहमीच  हसतो

कितीही  दुखावलो  तरी

अश्रू   माझे मी  हसण्यानेच    पुसतो ...

मी  असा का  माझे मलाच कळत नाही

दोष  एवढाच आहे माझा
दुसर्यांचे  दुख  मला पाहवत नाही ....

हसत राहतो मी
माझ्या जखमांनाही  मी कधी  पाहत नाही ....
-
© प्रशांत शिंदे



(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

गावाकडे येणारे रस्ते ते ..!


गावाकडे येणारे रस्ते ते

शांत होऊन पडलेत

तुझ्याकडे जायचं म्हणून


ते वळणा वळणात गुंतलेत ...
-
©प्रशांत शिंदे

Thursday, September 6, 2012

Break - Up ..!

माझे मरण जवळ आले

मला  आता कळलंय

तू रडू नये म्हणून 

तुला Break - Up  सांगून सोडलंय ....

-
© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Tuesday, September 4, 2012

आठवण येते तुझी !

आठवण येते तुझी

कुणाला सांगता ही  येत नाही

वादळ उठलंय  उरात

शांत व्हायला  आता

आधार  ही  सापडत नाही ....

-
© प्रशांत शिंदे



(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

तू माझीच .....!

मला  विसरून जा 
सांगून ती निघून गेली
मी  पुन्हा भेटणार  नाही
मलाही  तू भेटायचे नाही
 

मी मात्र  रडलो  पण तिने
वळून मागे  पाहिलेही  नाही
मी हि  एकटे पडलो होतो
विचारात  तिच्या  माझे जगणे हि  विसरलो होतो
 

तिचेही  प्रेम होते  खूप
तरी  निघून ती  गेली
काही  दिवसाने  हातात पत्रिका   देत
तिने जखम माझी  

अजून होती  कुरवाळली
 

गेलो मी कसाबसा लग्नात तिच्या 
सोबत  अश्रू घेऊन
तिने मात्र  पहिले दुरून ह्या   

डोळ्यातले  घाव तिच्या  डोळ्यांना भिजवून

ती झाली  दुसर्याची  मी  तरी  एकटाच
दिवस   जात होते पण  विसरलो नव्हतो   तिला

निरोप  आला  एक   ज्याने बोलावले  होते मला
वाट  पाहत होती  ती ही येण्याची माझ्या

हातात हात घेऊन म्हणते शोना
आजवर  तुला काही  दिले  नाही मी
पण   एक मागणे मागते  मी तुला
मिठीत तुझ्या  घेऊन  थोडे जगू  दे ना मला

तिचे प्रेम तसेच होते  जसे माझे हे हाल  होते
तिला  वेळ  दिसली होती  

तिचे  मरण अगोदर  पहिले
मला सुखी  ठेवण्यासाठी 

तिने  मरणास ही त्या  कवटाळले ..

शेवट  झाला तरी  ती माझीच 
अन माझीच होती  राहिली .... 

तू माझीच ....

-
© प्रशांत शिंदे



(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Wednesday, August 29, 2012

माझे प्रेम कधी कळेल तुला ?

माझे प्रेम कधी कळेल तुला ?

मी तुझ्यावर प्रेम करतो शोना

बघ माझ्या  डोळ्यात

तुला माझी प्रेयसी  दिसेल

कधी मिठीत घेऊन बघ

नाव  तुझे घेणारी 

हि स्पंदने माझे  दिसेल

कधी  चांद राती बाहेर  निघून बघ

तुझ्यासाठी थांबवलेल्या

त्या  चांदण्यांना  तुला  दिसेल

कधी तू  त्या मोगरयाकडे बघ 

त्याचा  सुगंध हि

माझ्या प्रेमाचेच नाव घेत असेल ....
-
©प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

आयुष्य हे माझे एक खेळणंच आहे..!!

म्हणतात कुणी हा  कोण आहे

काय होता ह्याच्या नसण्याने

पण त्यांना कळत नाही

किती जण हसतात

माझ्या अश्या  वागण्याने....

आयुष्य हे माझे

एक खेळणंच   आहे

लचके  ज्याचे सगळ्यांनी तोडणे आहे    ....

-
©प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

तू फक्त माझीच हो ..!!

बघ कधी हात  पकडून  हा हात
कधीच  सैल पडणार नाही


ये कधी झोपडीत माझ्या  तुला 
राजवाड्याची ही आवड राहणार नाही


तू फक्त  माझीच  हो 
दुसर्याची झालीस
तर मी  जगणार नाही   
-
© प्रशांत शिंदे

तुला कधी कळेल प्रेम माझे ....??

जमलेत आज लोक घेरून मला

तुला वाटेल ते वेड्यासाठी का जमलेत

गळतील त्यांचेही  अश्रू म्हणशील

हे का खुळ्यासाठी रडलेत

पण तुला समजणार नाही हे

माझे हे प्रेम त्यांना तुझ्या  अगोदर कळलेत ....
तुला कधी कळेल प्रेम माझे ....??
-
©प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Tuesday, August 28, 2012

तुझी आठवण येते रे....!!

येईल अशी एक  वेळ 
माझ्या प्रेमाची जाणीव  तुला होईल
मला  भेटण्यासाठी मग
तूझ्या नजराही आतुर होईल
म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे  ....!!

आज  वेळ आहे बघ
वाटेवर  तुझ्या मी उभा आहे
अश्याच  एक  दिवशी   तू  उभी  राहशील
पण  उशीर झाला  असेल तेव्हा
मला तू थीरडी वर पाहशील
म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे....!!

तेव्हा  तुला जाणीव  होईल
माझ्या खरया प्रेमाची
जाणीव  होईल माझ्या एकटे राहण्याची....

मग  तू  माझ्या मागे  येशील ही
मला हाक  देत तू तेव्हा रडशील ही
पण  मी गेलो असेल
माझीही इच्छा  होईल तेव्हा तुला भेटण्याची
पण ...??
जीव माझा  कुणाच्या तरी हातात असेल

म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे ....!!

काही  दिवस  जातील मग तुझे लग्न होईल
खुश  अशील तेव्हा  त्या  तुझ्या संसारात
पण माझ्या नसण्याची  जाणीव 
सतत  तुला जाणवेल

म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे....!!

दुसर्याच्या मिठीत असताना
जेव्हा  तुझ्या  डोळ्यांतले पाणी
माझ्यासाठी  वाहेल
तेव्हा  तुला जाणीव  होईल
माझ्या खरया प्रेमाची

म्हणशील तेव्हा  तुझी आठवण येते रे....!!
 -
(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

एकांत..!

कधी  एकांत  खूप वाईट वाटतो

जेव्हा एकांतात विचारांचे   
वादळ आपणास गाठतो

तेव्हा काय करावे  सुचत  नसतं

तेव्हा  हात  असावा  पाठीशी  असे वाट
तं 

पण  जवळ कुणीच  आपले नसतं

तसे  तर  एकांतच  बरे असतं


हे तर म्हणायलाच  बरे वाटतं

पण....???? 

वेळ आली कि एकांत काय  ते जाणवतं ...

-

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Friday, August 24, 2012

मी माझे मरण बघतोय ....!

मी  माझे मरण
उघड्या डोळ्यांनी  बघतोय ....

माझे  डोळे  बंद  व्हायचेत

त्यात दुष्काळ   दिसतोय

सुकलेल्या जमिनीवर  ही

ते  दोन  थेंब माझेच बघतोय

त्यात हे  जीवन ही  नाही संपत

सोसून दुख आजवर   जगलोय

आज उघड्या डोळ्यांनी

माझे मरण मीच  बघतोय

मोहाची  दुनियेतून सुटका करायला बघतोय ...

मी माझे मरण
उघड्या डोळ्यांनी  बघतोय ....
-
© प्रशांत शिंदे

ते फुल ..!

तुझ्या साठीचे ते फुल
हातातच राहिलं

बोलेल म्हटलं तुला

पण....????

ओठांतच राहिलं


फुल जपून ठेवलंय ते

तुझ्यासाठीच होतं

सोडून गेलीस तू

कारण
माझं आयुष्यच काटयांनी भरलेलं होतं....
-
© प्रशांत शिंदे

Tuesday, August 21, 2012

पेटली ती चिता !

पेटली   ती  चिता  त्याची

अंत  त्याचा झाला

दुख सोसून  सोसून अनंतात  तो गेला

न  कुणी   सोबती त्याचे 

न कुणी आपले

थिरडी वर त्या त्याचे 

होते हात हि  रिकामटेकडे ..

अश्रू   होते  डोळ्यात त्याच्या

काल हि   ओले  आज हि न  सुकलेले ..

मी हि  मग  विचारले  मानस  माझ्या

जायचे  त्याला हि  एकटे 

अन  तुला हि  एकटे

प्रेमाचे   दोन  गड्या  लाऊन जा तू  रोपटे ...

-
© प्रशांत शिंदे


Friday, August 17, 2012

आता तुझा एक हि शब्द कानी पडत नाही..!

आता तुझा  एक हि शब्द  कानी पडत नाही

जो आवाज  तेव्हा  सतत सोबत असायचा

आता तोच आवाज  जराही  जाणवत नाही

जे   ओठ कधी माझे नाव घ्यायचे 

माझ्या समोर  येताच  गालातल्या गालात हसायचे

ते हास्य आता कुठेच  दिसत नाही

वाट पाहत  मी  चंद्र सोबत रात्रभर  जागतो

पहाट होताच  तो  चंद्रही  निघून जातो

पण मन माझे  तसेच वाटेवरच थांबते

जिथे  तुझे  येणे आता शक्य  नसते
-
© प्रशांत शिंदे

माहित आहे मला प्रेमात काही स्वार्थ नसतो ..!

माहित  आहे मला  प्रेमात काही  स्वार्थ नसतो

प्रेमात कसला मतलब  नसतो

प्रेम म्हणजे सुख दु:खांचे घेणे देणे

आयुष्यभर  जपण्याचे  नाते असतं प्रेम

पण ....

प्रेम म्हणजे  धोका ही नसतो

मग  का  प्रेम म्हणजे  नेहमी  असेच घड
तं

बोलक्या ओठांना ही  ते मुके  करून जातं

उरातल्या श्वासांना  थकवून   जाते

मी तर  प्रेम  निस्वार्थ केले

मग का त्याला  तू आरश्या समान तोडून

तिने हसत हसत जावे ....
-
© प्रशांत शिंदे

ओठ आपले तर नेहमीच बोलत असतात..

ओठ   आपले  तर  नेहमीच  बोलत असतात

एकांतात  ते  तुलाच  शोधत असतात

तू जवळ  असलीस  कि 
कसलीच  जाणीव नसते

तुझे  ओठ  ओठांशी  भिडले कि

माझी  दुनियाच  वेगळी असते ...
-
© प्रशांत शिंदे

Thursday, August 16, 2012

रात्र चांदण्यांनी सजलेली ..!!

रात्र  चांदण्यांनी सजलेली

त्यात  तुझे   रूप  मी पहिले

क्षणभर  विश्वास  नव्हता  नजरांना

माझी प्रेयसी  आज  माझीच  जाहली

मग तुझे मिठीत  घेणे  मला

आपलेस करून घेणं

सुरुवात होती  नवीन आयुष्याची

तुझ्याच  सोबत  जगणं 
अन  तुझ्याच  समोर 
मरणं...

रात्र  ती चांदण्यांची  अशी काही  सजलेली

तू अन  मीच  जागी होतो

हे  जग  होते   निजलेली..

-
© प्रशांत शिंदे