Friday, October 26, 2012

अखेरची भेट आमची अखेरचीच ठरली ...!


ती भेटली  मला त्या दिवशी 
अन मी हि  तिला भेटलो 

तिची माझी भेट  तशी पहिलीच होती 
त्या दिवशी तिच्यासाठी मी  मित्र
अन माझ्यासाठी ती प्रेयसी झाली 
मन जडले तिच्यावर  
अन प्रेमात तिच्या मी पडलो 

मग  काही दिवसांत
दोघांत  भांडण होऊ लागली  
काही न काही कारण घेऊन ती चिडायला लागली 

एक दिवस असा आला मला सोडून  ती  गेली 
खूप  खचलो होतो तिच्या जाण्याने 
हृदय हि तुटले माझे  तिच्या गेल्याने 

दिवसाचे काय ते तर  तसेच जायचे 
तिला आठवत अन डोळे पाणावत 

मग काही दिवसाने  आमची 
अशी काही भेट झाली 

ती  एकटी  अन मी  हि एकटाच होतो 
फक्त ती आणि  मी  दुसरे कुणाचाच तिथे भास नव्हता 

रडली  ती खूप  
पण मी  काहीच करू नाही शकलो 
माझ्याशी  तिला काही  बोलायचे होते 
पण बोलू न शकली  ती 

ती  रडत होती मला पाहून 
पण  फरक  एवढा होता 
ती माझ्या देहावर रडत होती 
अन  देहाच्या बाहेरून  .... 

अखेरची भेट  आमची अखेरचीच  ठरली ...!
-
© प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे 
 

 
 


 

नाही कवी मी !


नाही   कवी  मी  तरीही  लिहतो

नाही रवी मी तरीही चमकतो

तुझ्या जवळ  रहावे म्हणून

तुझ्या केसांतलं 
ते फुल  मी बनतो ....
-
© प्रशांत शिंदे

Tuesday, October 23, 2012

तुज्यावीन अधुरा मी !

खूप प्रेम करतो  गं  जाणून का घेत नाहीस

बोलतात हि स्पंदने ऐकून का घेत नाहीस

बघ न  जरा  डोळ्यांत  किती  अश्रू दाटलेत

तुझ्या रुसण्याला पूर्ण विराम का   देत नाहीस ....

जगता येत नाही  तुझ्यावीण

तू तरी समजून घे

हृदयाला  असे  तू  घायाळ  करणे  सोडून दे ...

तुज्यावीन अधुरा मी

मला समजून का घेत नाहीस ....

-
© प्रशांत शिंदे



(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Friday, October 19, 2012

सवयच आहे तिला !

किती रागावते ती
खुप छळते ती

सवयच आहे तिला
माझ्याशी भांडण्याची


अन..

मला सवयच झाली

तिचे अश्रु पुसण्याची

कधी कधी ऐकतच नाही

सवयच आहे तिला हट्ट धरण्याची

गाल फुगवुन माझ्यावर रुसण्याची

प्रेम करते ती म्हणुनच तर
जाणवते मला तिच्या अधिकारांची...

रोजचेच झालंय आता

तिला माझ्याशी अबोला धरण्याची
मग माझा दाटलेला कंठ पाहुन
माफ कर ना जान म्हणण्याची....

प्रेमळ वेदना हया देऊन मजला

सवयच आहे तिला
त्यांना रोज कुरवाळायची...

© प्रशांत शिंदे

१९ / १० / १२

Wednesday, October 17, 2012

पहिले प्रेम कधीच विसरायचे नसतं ...!

असेच करायचे असतं...!

असेच करायचे असतं
आपल्याला  अश्रू मिळाले  तरी चालेल 
पण ...??
तिच्या  मुखावर हसू आणायचे असतं ..
असेच करायचे असतं..
ती आपली झाली नाही तरी
तिला  आपलेच मानायचे असतं
तिच्या आठवणी  पुस्तकात लिहून 
त्याचा  एक  एक पान  चाळायचे असतं ....

असेच करायचे असतं ...!

आहे  जरा  वेडा मी
जे  तुझ्यात गुंतून बसलोय
तुझ्या सहवासातला  प्रत्येक   क्षण तो
मी एकट्यात आठवत बसलोय
पहिले प्रेम आहे हे  जे कधीच  विसरायचे नसतं ...

असेच करायचे असतं ... !
-
© प्रशांत शिंदे

सांग मी का प्रेम करायचे .. ??

सांग  मी  का  प्रेम  करायचे .. ??

रोज  विचारांत  त्याच्या  रात्रभर  जगायचे

त्याची  वाट  पाहत  घामात   का  भिजायचे

त्याला  तर  काळजीच  नसते
तो  हसत  हसत  येतो ....

मग   राग  आला  कि
तो  मिठीत  त्याच्या  घेतो

म्हणतो  हा  रागच  तर
माझे  प्रेम  आहे
जे  वेळ  आल्यावर  तू  माझी  आहेस  सांगतो ...

अश्रू  अन    हसू  देतं  हे  प्रेम ..

मग  ..??


सांग  ना  शोना  का  प्रेम  करायचं ..??


-
© प्रशांत शिंदे

Monday, October 15, 2012

खूपच साधा वागलो मी..!!

खूपच साधा वागलो मी
हीच होती चुकी

सावलीत तुझ्या आलो
अन....
सावली माझी हरवलो हि खंत होती मुखी

तुझ्यात मित्र शोधला तीच तर चुकी केली होती  मी

खूपच साधा वागलो मी..

आज लढतो मी एकटेच ह्या दुखांच्या सागरात
नको आहे हात कुणाचा मज जाऊद्या मृत्यू च्या दारात ...........

खूपच साधा वागलो मी..
-


© प्रशांत शिंदे

माझा टेडी !!

तू माझा टेडी
गोल गोल गालांचा टेडी
करते स्वतःच आधी खोड्या
आणि मी केल्या तर म्हणते
बोलू नकोस माझ्याशी वेड्या


पण गोड गोड तू माझी टेडी

गालांत खळी तुझ्या डोळ्यांवर चष्मा
तुला बघून आठवली माझी पहिली गर्लफ्रेंड रेश्मा ...

राग तुला येतो पण कधीच समजत नसतो
हळूच वाकून पहिले तर डोळ्यात पाणी असते ...
अशी माझी टेडी......
-
© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे
 

Wednesday, October 10, 2012

माझाच तू वाटायचा रे !

माझाच तू वाटायचा रे
माझाच तू वाटायचा
तू साथ देशील
नेहमीच मला वाटायचं
असताना सोबत तू
मला एकटे कधीच न वाटायचं....

आता तर मी स्वप्नं पहायचे
तूझ्याच मिठीत जगायचं

वाटलंच नव्हतं
तूला प्रेम करताना माझी
ऐसी दैना होईल

तूझ्याचसाठी आसवे
ती माझ्याच नयनी येईल

माझाच तू वाटायचा रे
माझाच तू वाटायचा

काय ऐसे चूकले माझे
सोडूनी तू गेलास
आठवणींचे गाठोडं तूझ्या तू
अंगणी ठेऊनी गेलास....

सांग कैसे जगू मी तूजवीण
क्षूद्र झाले मी प्रेम न मिळाले
प्रेमात तूझ्या दू:खच दू:ख मिळाले

माझाच वाटायचा रे
मला फक्त माझाच वाटायचा..
-
© प्रशांत शिंदे

Tuesday, October 9, 2012

आठवतं का तुला आपली पहिली भेट .... !!

फेसबुक वरील एक सत्य प्रेम कहाणी जी काहींसोबत झालेली असेलच ..  

आठवत का तुला आपली भेट ..!!

तूझी आणि माझी ओळख online झाली होती
तू नसायची जास्त पण मी  वाट पाहायचो
तू यायची अन मी तुला छेडायचो
तू थोडी रागवायचीस पण पुन्हा तू बोलायचीस
रागावलास का रे माझ्यावर  म्हणत  बोलना म्हणायची
थोड्याच दिवसात आपण जवळ आलेलो
कधी कधी येणारी तु आता खूप वेळ थांबायला लागली
सगळ्यांशी बोलणारी तू आता फक्त माझ्याशीच बोलू लागली

आठवतं का तुला  आपली पहिली भेट .... !!

आपण मित्रांसोबत भेटलेलो तू काहीशी लाजलेली
अन मी हि  तसा घाबरलेलो तू रागावशील तर नाहीस 
म्हणून मी गप्प्प राहिलेलो
तसे दोघे हि खूप खुश होतो 
अन तेव्हाच दोघंही प्रेमात आहोत हे कळलेलं ....
मग तू थोडा  वेळ माझ्याशी फोनवरहि  बोलू लागली
घरच्यांसमोर घाबरतेस म्हणून बाल्कनीत येऊन बोलू लागली ....
मग  तुला भेटायला   मी हि  कारण शोधू लागलो
सुरवातीला नाही पण मग मात्र तूच यायला लागलीस ....

तुला अन मला ओढ लागली होती
लग्न करण्याची  स्वप्न  आपण पाहू लागलो
तुझे  घरचे  नाही बोलतील म्हणून तू घाबरली होती
मी किती प्रेम करतो  हे तू हि जाणत होती
म्हणूनच तर घरच्यांना हि हिम्मत करून
तू आपल्याबद्दल बोलत होती .....

पण लग्न होणार नाही हे तुलाच  माहित होतं
कारण माझ्या प्रेमापेक्षा तुला  तुझा  रक्त होतं
मी आज हि  एकटाच आहे  तुझी वाट पाहत

आठवत  का तुला माझा  चेहरा 
तो चेहरा आज उदास असतो
तूला आठवत  नेहमीच  ओला होत असतो ..
कधी  कधी तर नशेत हि बडबडत असतो
खूप प्रेम केले  म्हणूनच तर सारखे  तुलाच आठवत असतो ...

आठवतं का तुला आपली पहिली  भेट  ....??

 -

© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Monday, October 8, 2012

तिला आवडतं माझ्याशी बोलायला !

तिला आवडतं माझ्याशी बोलायला 
कारण मी बोलका आहे 
तिच्या  मनातला समजत  नाही तिला 
मी  बोलून  जातो 
तिच्या एक  एक विचारांची वहीच  मी  उघडतो ..

ती म्हणते बोलत जा ना माझ्याशी  
मी खूप एकटी आहे रे 
आपल्यांमध्ये असूनही मी खूप परकी आहे रे 
तुझे  बोलणं आपलं  वाटतं 
मग तिला माझ्या मिठीत  मी घेतो 
तिचाच मी असण्याचा भास मी तिला  देतो ..

तिला तसे गाणी खूप आवडतात 
प्रेमात पडली आहे सांगून  ओठांवरही तिच्या  येतात 
कधी  तर ती माझ्यासाठी हि गाणी  बोलते 
काही  कविता ती माझ्यावर हि लिहते 
मग वाटतं हेच ते प्रेम जे आयुष्यात एकदाच भेटतं ..

ती सतत  माझ्याच विचारात असते 
रात्री अपरात्री हि  एकदा फोन करत असते 
झोप नाही लागत म्हणते मला कुशीत तुझ्या घे ना 
माझ्या खांद्यावर  डोकं ठेवून सुखाने ती झोपते 
सकाळी म्हणते मला  सोडून तर जाणार नाहीस ना 
नको रे जाऊस सोडून 
तू माझा आहेस ह्या आशेवरच तर मी जगते ...

खूप  सुंदर आहे ती 
अन प्रेम हि खूप करते 
माझ्या फिकिरीत येणारे एक एक अश्रू  तिचे  हे सांगते 
म्हणूनच तर ....
माझाही  जीव  तिच्यात  दडलाय ....
-

© प्रशांत शिंदे
(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे







Friday, October 5, 2012

खरं आहे मी आता हसायला लागलोय ..!

खरं आहे मी आता हसायला लागलोय ..! 

पण   मी विचारांत गुंतून बसलोय
ठाऊक नाही  कोणते प्रश्न आहेत
आधार हि वाटतो अन  दुरावा ही
ठाऊक नाही असे का मन झुरायला लागलंय 

खरंच आहे मी हसायला लागलोय ... !

हा तर मुखवटा आहे  हे  मलाच  ठाऊक आहे
असे  तर  हसतानाही मी रडायला लागलोय
खरंच  काय दोष  असावा  माझा
जे नशीब ही साथ माझी सोडायला लागलंय

वाटतं आता  संपवून द्यावं हे सारं
कसली हे  नातं अन कोण नाही आपलं
आपले  सांगून काळ्जास घायाळ करायला लागलंय ..

अंधारा सोबत  आता  मी जगायला लागलोय
पाठीवर नाही हात कुणाचा तरी ही
थोडं स्वप्न   पाहायला लागलोय
खरे  तर जगताना ही  मरायला लागलोय ...

खरंच आहे मी  हसायला लागलोय ...
-
© प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Wednesday, October 3, 2012

एकटा अन एकटाच मी !

एकटा अन  एकटाच  मी !

वाळूमातीचा बनलेला मी
सागरात सामावून  जाईल
माझे दुखाच एवढे  वाटेल त्याला
मला  तो कुठे  एकटे तरी सोडून येईल

कधी काही  करू न शकलो मी 
हरतच आलो आयुष्यात 
अन आज हि हरलो आहे मी

एकटा अन  एकटाच  मी !

आलो  रडत , रडवून जाईल मी
पायाची  धूळ मी हवेत हरवून जाईल मी

जाईल जेव्हा  हि  दुनिया सोडून
बघ  तेव्हा खूप  आठवण  येईल मी
पाणी  नक्कीच येईल डोळ्यांत तुझ्या
पण....?? 
पुन्हा कधीच दिसणार नाही मी ....

एकटा अन  एकटाच  मी !
-
© प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

तुझ्या सारखे कुणीच नाही ....!!

तुझ्या  सारखे कुणीच नाही...!!

गर्दीत सोडणारे आहेत  इथे
पण ....??
त्यात हात पकडणारा  कुणीच नाही
हरवशील सांगत सोबत चल म्हणणारे  कुणीच नाही

हो खरच तू म्हणत  होती मी खूप साधा आहे
मला ओळखणारे कुणीच नाही
तू होतीस आहेस म्हणून मी जगतो आहे
आपले म्हणणारे इथे माझे कुणीच नव्हते

तुझ्या सारखे कुणीच नव्हते ..!!

रोज  दिवस येतो पण रात्र होताना
तुझी आठवण  जातच नाही
एवढे प्रेम  दिलास  मला
तुझ्यावीण सखे राहवतच  नाही

खरंच  शोना तुझ्या सारखे कुणीच नाही ... !!

तूच  म्हणत होतीस मी दुखी कविता का करतो
वाटत होतं माझ्या जगण्याला काही कारणच  नाही
तू भेटलीस अन कळले
तुझ्याविना  हे जगणे जगणेच नाही ...

शोना तुझ्यासारखे कुणीच नाही
असेच जवळ  घे
मला दूर  कधीच  जायचे  नाही ....

शोना तुझ्या सारखे कुणीच नाही ....!!
-
© प्रशांत शिंदे