Thursday, May 17, 2012

तूझी आठवण येते.. !!


ढग दाटून येईल
पुन्हा  हवेत गारवा येईल


वाट पाहत उष्णावलेली ती धरत्री ही
हळूच सुगंधून मनात ओढ प्रितीची दाटेल


मग आठवण तूझी येते..!!


अशीच पहील्या पावसा सारखी आलीस
आणि जाताना डोळे ओले करन गेलीस


तो पाऊस तरी उदया पुन्हा येईल
पुन्हा त्याची अन माझी भेट होईल


पण..??


तू मात्र येणार नाहीस


तू तूझी  आठवण येते...!!


तू त्या दवांसारखी होतीस
थोडंसं प्रेम देऊन त्या पानांस बोलके करून गेलीस 


तू त्या वारयासारखी  आलीस
जाताना आठवणींचे वादळ देउन गेलीस


ते वादळ आता कधीही उठतं
तूला आठवताच भर ऊन्हातही डोळयांत पाणी आनतं..


खूप आठवण येते गं
आठवण तूझी   
मनात आठवणींच्या लाटाने  खचून गेलो....


तूझी  आठवण   येते.. !! 
(¯`v´¯)
.`·.¸.·´ ?
¸.·´¸.·´¨) ¸.·*¨)
(¸.·´ (¸.·´© प्रशांत शिंदे

माझे पहिले प्रेम..!!

कळतं मला तू  टाळत  होती
कळतं  मला तू एकट्यात रडत होती
हुंदके  तुझे  तुझे  मला रात्रभर जागवत आहेत 
प्रेम करते  तू ओठांवर  तुझ्या ते कधीच  येणार  नाही
त्यासाठीच  तू आजही स्वताला घायाळते
पण माझी  हि  तीच दैना झाली
तुझी  वाट पाहत आज हि मी त्याच  वाटेवर थांबलो
जिथून आपल्या प्रेमाची  सुरुवात झाली
जिथे  तूझी  माझी भेट झाली
तूझे  ते  वळून  पाहणे  आज हि  आठवतं
तुझे  ते हसणे  आज हि  डोळ्यांतच   आहे
तुझ्या होकाराची  वाट  होती
पण ..??
नशिबाची  साथ नाही
आज तू  सासरच्या वाटेवर
आणि  मी थीरडीवर  जात  आहे
तुझे  नाव घेऊनच  हा श्वास  मी  सोडत आहे ....

माझे  पहिले प्रेम होते  तू  आणि  पहिलेच  राहिले 
दुसर्याची  झालीस  तू
अन माझे  तर आयुष्याच  मी संपविले ...
-
(¯`v´¯)
.`·.¸.·´
¸.·´¸.·´¨) ¸.·*¨)
(¸.·´ (¸.·´© प्रशांत शिंदे

आई तुझे लेकरू ..!!

आई तुझे लेकरू आज खूप एकटे पडले
तुझ्या स्पर्शासाठी ते खूप आज रडले !!

तुझ्या मायेच्या सागराने मला

कधी वादळ तर कधी किनारे दाखवले !!

तुझ्याच छायेत माझे घर असू दे
असे नेहमीच वाटायचे
तू जवळ नसताना मनात काहूर माजायचे !!

आज तुला सोडून मी जगायला शिकतोय
एकटे पडलो इथे सगळेच मला डिवचतात !!

सांगायची तू कथा मी अर्थ आज जाणतोय
नसतो कुणी आपले हे मी खरचं पहातोय !!

जवळ करतात इथे आणि दरीमध्ये सोडतात
जीव कधी जाईल ह्याची ते वाटच पाहतात !!

आई मला घे जवळ मला सोबतच राहू दे
तुझ्याच डोळ्यांनी हे जग मज पाहू दे !!

धन्य झालो मी जी तू मला भेटलीस
असे वाटतं देवांशीच मैत्री मी गाठली .... !!

आई !! तू आहेस माझी आई !!
-
© प्रशांत शिंदे

Tuesday, May 15, 2012

शब्द ..!!

बांधलेले शब्द त्या माळेतच
आज ही त्यांना शोधत होतो
ठाऊकच नव्हते ते कधी माळेतून पडले
नजरेची एक चूक अन शब्दच सारे सांडले ..

माळेत त्या मळायला वेळ खूप होता लागला
पण तो धागाच मिळाला ऐसा
जो आमुच्या विश्वासाला न जागला ..

आजही त्या शब्दांचा अर्थ मला कळतो
एक एक मिळूनच तर वाक्य पूर्ण करतं..

पडले कुठे ते शब्द आज
नजरेलाही ना येत
सतत वाट पाहत असतो मी
पुन्हा तो शब्द मला मिळेल ..

शब्द शब्द जुळले होते
त्याने समूह आमचा बनला

एका क्रूरकर्मी ने तो अस्तव्यस्त हो केला
आज दैना झाली ऐसी
धागे कुठे नि शब्द कुठे झाले
घायाळ झाले आहेत सारे
आज ही आठवतात ते शब्द सारे ....

शब्द आमचे शब्द आमचे भेटतील का रे ...
-
© प्रशांत शिंदे

आता होऊच शकत नाही !!

आता होऊच  शकत नाही
काल ची रात्र  पुन्हा  येऊ शकत  नाही

गेलेली  वेळ  पुन्हा येऊ शकत नाही

लुकलुकणारे  तारे वाट पाहत थांबू शकत नाही

जेवढा विश्वास  मी केला  तिच्यावर

तो पुन्हा आता करु शकत नाही

वादळाचा  सामना  केला  हि असता  तुझ्यासोबत

पण  मी  वादळात  एकटाच  उभा राहू शकत नाही

कोरीच राहिली  रोजनिशी  त्यात शब्दच उतरले नाही

लेखणीच  रुसून  बसली  जी आता कधीच  लिहू शकत नाही

प्रेम खूप  केले  तिच्यावर

आता  कुणावर करूच  शकत नाही

खूप  काही मनात आता  ते  पुन्हा होऊच शकत नाही ..!!

- *´¨)
¸.•´¸.•*´¨) ¸.•*¨)
(¸.•´ (¸.•` ¤- © प्रशांत शिंदे

Monday, May 14, 2012

उखळलेला सागर उसळलेल्या लाटा

उखळलेला  सागर   उसळलेल्या लाटा
पडकी भिंत जिलाच खचवत   होत्या त्या लाटा
वाटच होती  पाहत ती भिंत  
कधी एकदाच संपवतात  जगण्याच्या वाटा ....

दुख होते काळजात  कुणाच्या तरी जाण्याचे
चार भिंत होते  दुख होते  एकटेच राहण्याचे
घर जे कधी सुख उधळत होते
तेथेच  आज आहे  फक्त दुष्काळाचेच  राज


भिंत ती जिला प्रेमाची झाली होती सवय
जिला  आज संपण्यासाठी हि सागराशी  भांडत आहे

नाही आज कुणी जे पुन्हा  भिंत बांधेल
छप्परसोबत आयुष्याभर हसत खेळत नांदेल

उसळलेल्या सागर खवळलेल्या लाटा
खचलेल्या भिंतीच्या पुसट झाल्या वाटा ...
-
© प्रशांत शिंदे

Saturday, May 12, 2012

काल तू म्हणालीस तू खूप आवडतोस

काल तू म्हणालीस तू खूप आवडतोस 
जेव्हा तू माझीच गाणी बडबडतोस 
सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला  
मलाही खरेच आवडतेस तू 
कसे सांगू आज तुला शब्दच मला मिळत नाहीत 
प्रेमात आपल्या मी तुला देईल एक आशा 
करत राहील मी प्रेम न देणार खोटी अमिषा 
भरवसा तुझा हीच माझी दौलत आहे 
फक्त तू साथ दे मला आयुष्यभर 
आठवण राहील एवढे प्रेम देईल मी तुला.. 
 काल तू म्हणालीस तू खूप आवडतोस 
सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला 
आज असे काय झाले तुला 
तू निघून जा म्हणते आहेस मला 
एवढा विश्वास खरेच नाही तुला 
कदाचित माझेच प्रेम अधुरे वाटले तुला .. 
आपले प्रेम होईल पूर्ण होईल नक्की तू साथ दे 
मला माहित आहे तू आजही 
त्या झाडावरच प्रेम अधिक करतेस 
ज्या सावली मध्ये तू राहिलीस
पण..
एकदा ये जवळ मी ही प्रेमाची बाहुली बनून ठेवेल तुला 
फुलांच्या छायेत ठेवेल तुला .. 
काल तू म्हणालीस तू खूप आवडतोस 
सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला .. 
- © प्रशांत शिंदे

Friday, May 11, 2012

एक मैत्रीण पाहिजे !!

एक  मैत्रीण पाहिजे माझी प्रेयसी बनणारी
माझ्या मनाला तिच्या हसण्याने भुरळ पाडणारी

एक मैत्रीण पाहिजे
मला समजून घेणारी
एक प्रेयसी पाहिजे
सोबत चालणारी हात हातात घेऊन नशीब लिहणारी

एक जखम पाहिजे आयुष्यभर चिघळनारी  
एक सुगंध पाहिजे मनात  प्रेम दरवळणारी
रात्र पाहिजे माझ्या सोबत जागणारी
चांदणी पाहिजे  निस्वार्थी असणारी
एक लाट पाहिजे  किनार्याशी मिळणारी

एक प्रेयसी पाहिजे
फक्त माझ्या मिठीत राहणारी ..!!
-
©प्रशांत शिंदे

(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º ☆

Thursday, May 10, 2012

ती खूपच बदलली आहे रे ...!

ती खूप बदलली आहे रे   ..!!

रोज हसत बोलनारी मलाही हसायला लावनारी
आज स्वतच गप्प आहे

तो खूप बदलली आहे रे ..!!

जी माझ्यासाठी वाट पहायची आता ती निघून गेली आहे
एकटे चालताना आता खूपच मी धडपडलो आहे

तिला माझ्या डोळ्यांत कधी  पाणी आवडायचे नाही
आज  तिनेच डोळे भरून आणले आहेत

मला सोडून तर जाशील नाही ना म्हणणारी
आज तिनेच एकटे पडले आहे
प्रत्येक  शब्द माझ्यात लिहणारी  ती
आता तेच पान फाडत आहे

तिचा प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्ट मला सांगणारी ती 
आज ती मला विसरली आहे  रे 

ती खूपच बदलली आहे रे  ...!!
नको ग  ऐसे दूर करूस
दुराव्याने जीव माझा बघ गुदमरतो आहे ....
-
© प्रशांत शिंदे

Wednesday, May 9, 2012

माझी आई ..!!

माझी आई ..!!

 



माझी आई ..!!

जगात येताना त्रास देऊन येतो आपण

झालेल्या वेदना ती लेकरासाठी सोसते ती आई

फुलपाखराला  उडायला शिकवते ती आई

उपाशी राहून प्रेमाचा घास भरवते   ती आई

बाळ झोपत   नाही म्हणून

अंगाई गात जागते ती आई

आपल्या जखमा  पाहून

डोळ्यांत पाणी आणते ती आई

माझी आई खूप चांगली आहे खरच

भाग्यवान आहे मी मला दिलीस आई

पण...

दूर आहे  मी मला खूप ती आठवते

तिचे नाव घेताच डोळ्यांत पाणी खूप साठवते

वेळ ही कशी असते  जिला मान्य नसते  नाते

दुख खूप आहेत  नेहमी ते मलाच  एकट्यात पाडते

आई तुझी आठवण मला जागवत असते

माहित नाही ग  तुला मी भेटेल पुन्हा कि नाही

पण....

अखेरचा श्वासात ही  फक्त तुझेच नाम राहील ....
-
© प्रशांत शिंदे
 

तिची माझी भेट फेसबुकवर झाली...!!


तिची  माझी भेट फेसबुकवर झाली...!!

तिच्यासाठीच मी  online   यायला लागलो
 कधी कधी नव्हे तो आता दिवसभर  बसायला लागलो 
माझ्या post  ला ती  खूप कमेंट्स करायची 
likes  करून  मला  जवळचे ती मानायची ....

१ वर्षाने  कुठे फोन वर बोलू  लागलो 
कुणाशी नव्हे ते  आता तिच्याशीच बोलू लागलो
ती आता मला जवळची वाटू लागली 
तिचेच गाणे आता माझ्या मनात हि येऊ लागले 
मी कामात असायचो 
पण तिला कारमायचे नाही....


थोड्या  थोड्या वेळात मला फोन सारखी करायची 
कसा आहेस म्हणून मला ती बोलत बस म्हणायची
माझे प्रत्येक  शब्दावर ती मनापासून हसायची
कधी मनास   लागले  तर ती  हुंदक्यात रडायची
मग  तिला  लांबूनच  जवळ घ्यायचो
उगी उगी म्हणत  तिला  तू माझी  बेस्ट फ्रेंड   म्हणायचो ....

रडताना खरच ती मला हि रडवायची  
रडायची ती अन  श्वास   माझा फुलवायची

तिच्या फोन ची  मलाही  सवयच  होती झाली 
फोनशिवाय तिच्या  आता झोपच लागत  नव्हती
तिची  मला जणू आता  सवयच लागली होती 
भेट तिची माझी होईल अशी  मला वाटलेही नव्हते
 ती   माझी होईल हे स्वप्नातही  नव्हते 

दोन वर्षे  झाली  तेव्हा भेट आमची झाली 
तिला मला पाहून  सारे प्रेमीच समजू लागले 
माझी मैत्रीण मानून कधी  कमी केली नाही

मग  काही  दिवसात ती वेगळी  वागू लागली
तिची एक एक सवय मी जाणू लागलो  होतो
तिचे असे वागणे मला जखमी करत  होते 
मग वाटले तिला काय म्हणू मी 
तिनेच  मला आता  दूर  केले  होते 

मी हि  गेलो  दूर  तिला 
हसत  ठेवायला कुणासोबत हि रहा
पण  डोळ्यात  अश्रू नकोत म्हणायला 

तिची  माझी मैत्री  आता संपून गेली होती 
माझ्याही मनात आता अमावस्या झाली होती
काळोखच काळोख माझ्या मनातही झाला 

 काही कशाची मैत्री होती 
पण जवळचीच वाटली 
थोड्याच वेळात कधी  नव्हे ते  सुख  मी बघितले ..

तू  माझी मैत्रीण होती 
मी आज हि  तेच मानतो 
तुझे  प्रेत्यक शब्द माझ्या  हृदयात आजही  साठवतो ..

तुझ्या  येण्याच्या आशा आता नाहीशा झाल्यात
तुझ्यचं  साठी  मी कित्येक रात्री जागल्यात...

जमलेच तर  ये  मी आजही  वाट बघतोय 
फुल समजून मी दगडालाच  बोलावतोय ....
-
© प्रशांत शिंदे

Tuesday, May 8, 2012

तू गेलीस तेव्हा..!!

तू   गेलीस तेव्हा 
जोरात पाउस पडत होता 
मला माहितच नव्हतं 
तो माझ्याच झोपडीला भिजवत  होता ..!!

तू गेलीस तेव्हा 
वारा  ही  जोरात  होता 
तुझ्या हुंदक्यांना तो मला ऐकवत होता ..!!

तू गेलीस तेव्हा 
काळोख पसरला होता 
चंद्रही जनू  अमावस्या समजून दिवासाच  उगवला होता 
निद्राही उडून गेली माझी 
आठवत तुला बसलो 
कूस बदलून हैराण झालो 
स्वप्नही पडेना ..!!

तू गेलीस  तेव्हा 
फुलही  हिरमुसले 
माझ्या कडे पाहत त्याने पाकळ्यांना अश्रू समजून गाळले 
काटे हि तीक्ष्ण झाले  जे अंगास टोचू लागले 
काळी माती  हि माझ्या अश्रूना  मुलासारखी  जपू लागली 
गाणी बंद झाली 
शब्द मुके झाले..!! 

तू गेलीस तेव्हा 
अश्रूंचा पूर आला 
लाटावर आठवणी तुझ्या आल्या 
अर्धमेला झालो मी 
तू गेलीस तेव्हा ........
-

प्रशांत शिंदे 





दिवस येतात दिवस जातात !!

दिवस  येतात  दिवस  जातात 
सोबत असणारे सोबत  राहतात तर 
कधी  ते  साथ  सोडून  जातात 

ऋतू येतात  ऋतू जातात 
आपल्या माणसांसारखे  ते  ऋतू हि बदलून जातात 



अपेक्षा  ठेवतो  त्या  मातीमोल होतात 
पावसाचा थेंबहि तो  डावात  दिसताना 
त्यास हि  कुणी  तुद्वुनी जातात 
दिवस येतात  दिवस जातात ...

वाटता आपली हि कुणी असावी 
सुंदर नसो  पण मनाने हळवी ती असावी 
कधी  बोलावे  कधी रागवावे 
कधी  रुसावे  मग तिलाच  न करमावे
आठवणीत  माझ्या तिने  हि  जागावे
रात्रीच्या चांदण्यात एक  तिचाच चेहरा दिसावा 

माझी  ती  प्रेयसी मला स्वप्नातून अवतरावी 
राजकन्या  नको ती  माझीच  प्रेयसी असावी
रुसवे  फुगवे  मी झेलून  घेईल 
मग तिने  हि फक्त  आणि  फक्त माझीच  आहे  म्हणावे 

दिवस येतात  दिवस जातात 
एकट्याचे  जीवन  हे आता  नकोसेच वाटतात .... 
-
©प्रशांत शिंदे


Monday, May 7, 2012

का रे निघून गेलास तू ..??

का रे निघून गेलास तू ..??


काय असतं हे प्रेम समजायच्या आधीच तू गेलास रे

काय असतं मधुमिलन रात्र पहायच्या आधीच तू गेलास रे


जागते स्वप्न पूर्ण होण्याआधीच तू 

गेलास रे ....!!

काय नशीब होते जे ऐसे जगणे 

आले

पतीविनाचे जगणे हे माझ्याच 



भोगी आले


तुझे प्रेम मिळण्य आधीच निघून 

गेलास तू ..!!

आकाशात उंच उडण्या आधीच पंख तोडून गेलास तू




सागरात ह्या कागदी नावेत बसुनी एकटे


वादळात सोडून गेलास तू ....!!

कसे जगू रे मी तुजवीण


डोळ्यांत अश्रू अन विरह देऊन गेलास तू


काय असता प्रेम कळण्याआधीच गेलास तू ,,,!!


येना रे मला नको ऐसे सोडू


मला काय हे लोक म्हणतात बघ ना रे


विधवेचा तिला लाऊन कुंकू बघ रे पुसतात ....!!

बांगड्या वाजायच्या आधीच गेलास तू


नथनी हि उतरण्य आधीच गेलास तू


नटणे-सजणे काय असतं


तुझ्यासाठी सजन्या आधीच निघून गेलास तू ....!!

आयुष्यभर एकटे राहू मी


का रे एवढे दुख देऊन गेलास तू ....!!


-
•*´¨`*•.¸¸.•*´¨`*•
°*”˜˜”© प्रशांत शिंदे..•°*”˜˜”

•*´¨`*•.¸¸.•*´¨`*•


Friday, May 4, 2012

बघू दे मरण मला बघू दे..!!


बघू दे मरण मला  बघू दे..!!


डोळ्यात त्याच्या माझी जागा
आज  मला ही बघू दे 
मुश्कील   हे जगणे इथे मला मरण लवकर दे 
कोण नाही कुणाचे येथे 
पैस्यांनीच बांधले सारे इथे 
पैसेच त्याचे जीवन झाले पैसेच  नाती गोती 
पैस्यांसाठी रे खातात माती ..!!


प्रेमही  इथे खेळ जाहला 
प्रेमासाठी आपल्यांशीच  भांडला 
त्याच  प्रेमाने त्याचा जीव रे घेतला ..!!


खोटे आहेत इथले नाते सारे 
मतलबी  आहेत  हे वादळ वारे 
झोपड्याही   मोडून जातो 
फाटक्यात   हो सोडून जातो 
जीवच का सोडून जातो 
डोळ्यांना ह्या हो बघवत नाही ..!!


मरणास हि मिठीत घेऊनि 
मरणाला हि पाहू दे ............!!
-
•*´¨`*•.¸¸.•*´¨`*•
© प्रशांत शिंदे..•°*”˜˜”
•*´¨`*•.¸¸.•*´¨`*•

Thursday, May 3, 2012

तू दिलेल्या जखमा ..

तू दिलेल्या जखमा देखील...
हव्याहव्याश्या वाटतात...
कदाचित त्या जखमान मुळेच...
तुझ्या आठवणी ताज्या राहतात....
हल्ली स्वप्नांचं आणि माझं... 
तसं नातच तुटलंय...
कारण मन माझं हल्ली....
तुझ्या आठवणीत बुडलय ...
तुला जपतांना हल्ली दुखं.. 
माझ्या जवळपासच येत नाही...
कदाचित माझ्या कडे त्यांना देण्या इतका..
वेळच उरत नाही...
किती दा तरी तुला सांगितलं... 
सांग तुझ्या मनातलं...
तुझ्या नाही जमलं तर निदान...
ओळख कधी माझ्या तरी मनातलं...
तुझे डोळे रोज सांगतात... 
मला तुझ्या मनातला होकार...
पण मग मला काहीच बोलू देत नाही...
तुझ्या ओठांवरचा नकार....
-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º




 

खूप बरं वाटतं..