Friday, March 30, 2012

तो आला दरवाज्यावर ....घेऊन आदेश मरणाचा माझ्या

तो आला दरवाज्यावर 
घेऊन आदेश मरणाचा माझ्या 
मी म्हणालो कोण  तू 
म्हणतो काळ आहे मी  तुझा ....


घाबरलो मी क्षणभर खरच माझी वेळ आली ....??
नंतर विचार केला असे तरी मी कुठे जगतोय 
मरून  जगायची सवय तर तू केलीच 
आता निरोप घेऊन मृत्यूच कर प्यारी ....


हसत म्हणालो मी घेऊन चल  मला 
मृत्यू हि बीचकळला  मला पाहून तेव्हा 
त्याने विचारलेच मला असा कसा रे तू ..??
माझ्या येण्याने कापतात हि माणसे 
मला विचारात पाडणारा गडी 
पहिलाच तू ....


मी हि सांगितले मग तेव्हा त्याला 
बघ मला मी मेलो आहे केव्हाच 


आठवणी आहेत तिच्या म्हणून मी जगतोय 
आठवणींत तिच्या मी रोज झुरतोय 
तू काय मारशील मला मी तर आधीच मेलोय 
देह आहे इथे पण मन तर केव्हाच पोहचलाय .....


ये जवळ अन असेच  घेऊन चल 
नको इथले काहीच 
तिच्या आठवणींतून सुटका तेवढे कर ....


बघ म्हणतो  तुझी हि शेवटची घटका आहे 
संग आताच मी इच्छा पुरी करतो 
स्बत तुला नेऊन तुझा देह इथेच ठेवतो 


नको मला काही म्हणत हसत जवळ मी गेलो 
हसताना पाहत तो मला म्हणाला 


तुझे हे प्रेम पाहून माला काहीच  सुचेना 
मृत्यू रे मी  तुझी दशा  मलाच बघवेना 
असा कसा रे तू मलाच घाबरवलेस
तुझे भय माझ्यावरच उलटवलेस ....
आधीच मेलास तू  काय रे तुला मारणार 


जग थोडे  तुला हि  सुख थोडे मिळु दे 
आनंदाची हौस तुझ्या चेहर्या वर येऊ दे 


दुखी किती रे तू तुला सुख देऊन मी जाईल 
पुन्हा मी येईल तुला नक्कीच घेऊन जाईल
तुझ्या मागे रडणारे सत्र मी तेव्हा सोडून जाईल ....


-
© प्रशांत शिंदे