कधी तरी दुखी वाटले कि धुरात हरवून जातो
त्या धुरात काही क्षण माझे दुख मी विसरून जातो
म्हणून सिगरेट आणि मी नेहमीच सोबत दिसतो
कारण मला तो धूर खूप आवडतो ....!!
जेव्हा आनंदात असतो तेव्हा हि घेतो ती सिगरेट
तिच्या मुळे जवळ आली आहे सिगरेट
ओठांना लावतो आनंद द्विगुणी करण्यासाठी
अन सोबत ती आहे हे अशा खोटी ठेवण्यासाठी
म्हणून सिगरेट आणि मी नेहमीच सोबत दिसतो
कारण मला तो धूर खूप आवडतो ....!!
एकटाच असतो मी तेव्हा जवळ असते माझ्या
हीच ती सिगरेट
डोळे बंद करता हि सोडत नाही आठवण तिची
म्हणून जवळ करतो हि सिगरेट तिला विसरण्यासाठी
म्हणून सिगरेट आणि मी नेहमीच सोबत दिसतो
कारण मला तो धूर खूप आवडतो ....!!
मित्रांत असतो जेव्हा नाक्याच्या कट्ट्यावर बसलेलो
ते म्हणतात सोडत का नाही हि सिगरेट
मी त्यांना म्हणतो अरे हीच तर खरी साथ देते माझी
ह्या दुनियेतून दूर निघून जाण्यासाठी ....
म्हणून सिगरेट आणि मी नेहमीच सोबत दिसतो
कारण मला तो धूर खूप आवडतो ....!!
असतो कधी मी उपाशी पोटाला खायला हि काही नसतं
अन विचारणारं ही कुणीच नसतं
तेव्हा हाच धूर असतो जो भूक ही विसरायला लावतं
वचने दिले आम्ही सोबत राहण्याची
मरताना ही तो धूर दिसेल त्या पेटत्या लाकडांवर माझ्या
मग मी अन हा धूर कधीच कुणास दिसणार ही नाही
हो जळजळत राहतील आठवणी डोळ्यांना काहींच्या
पण हा धूर अन मी
कधीच देहरूपी सामोरी सापडणार ही नाही .......
म्हणून सिगरेट आणि मी नेहमीच सोबत दिसतो
कारण मला तो धूर खूप आवडतो ....!!
-
© प्रशांत शिंदे