Tuesday, February 7, 2012

खरे तर प्रेम काल झाले होते मला हि !!

खरे तर प्रेम काल झाले होते मला हि 
तिच्यात गुंतले होते मन माझे हि 
तिचाच ध्यास लागला होता माझ्या अंतरी 
नकळत खुलली होती प्रेमाची कळी माज्याही मनी 
खुलण्या आधीच तिला नजर लागली होती 
विश्वासाची दोरी माझी मधूनच तुटली होती 
मी बनविलेले प्रेमाचे घरटे आज पाहिले कुणीतरी 
नजरेच्या तीरांना ते खुपले कुठे तरी
म्हणून ..
कोलमडले ते घरटे माझे त्या तीक्ष्ण तीरांनी 


घरटे ही तसे होते माझे कमजोर 
माझ्याच प्रीतीच्या गोडव्याचा 
त्याला भेटला नाही जोर 
करायचे तरी काय होते  कशाचं ऐसे आले
आठवण म्हणून डोळ्यांत अश्रूच राहून गेले 


तिच्याच नजरेने आज दुसर्यांनाच  हेरले 
बघता बघता माझेही  प्रेम अधुरेच राहिले 
ह्या कणखर वाटेवर तू साथ  का सोडलीस 
प्रेमाची कळी खुलण्या आधीच त्यास तोडलीस 
मला प्रेमवेडा करून तू निघून गेलीस 
वाटेमध्ये ह्या तुझीच तर साथ  मला  हवी  होती 
पण....
तूच धरलेला हाथ माझा सर्वात आधी सोडत होती 


हो मी खरेच प्रेम केले तुझ्यावर 
तुझे  स्वप्न मी उघड्या डोळ्यांनी पहिले 
तूच त्या स्वप्नांत अंधुक करून गेलीस 
काचेचे हे हृदय  माझे क्षणातच तोडलेस 
सावरायचे  आहेत ते पडलेले तुकडे 
कुणास कुणांस दाखवू आज जखमा पडल्यात  उघडे 
तू माझी नाहीस मानून आयुच्या हे  जगणार 
असह्य ह्या वेदना पाहून श्वास ही आज सोडणार ..


हो खरे तर प्रेम झाले होते मला ही ...

खंत आहे मला गुलाब देणारी कुणी नाही ..

खंत आहे मला गुलाब देणारी कुणीच नाही 


खंत आहे  आज  हृदयाला स्पर्श करणारी  कुणीच  नाही 



एकटे  आहे मी  ह्या  जगात  


मला प्रेम करणारी  ती असेल कि   नाही ...........


माझे  हे  गुलाब  दरवळतच  राहील  


आहे कुठे  ती  माझी कल्पना  

माझ्या  फुलांचा  सुगंध  पाहील

खंत आहे मला  गुलाब  देणारी कुणी नाही ......

Thursday, February 2, 2012

किती ग दूर दूर गेलीस तू !!


किती  ग  दूर  दूर  गेलीस तू 
क्षणात सोडून   गेलीस तू 


करायचीच  होती  बदनामी  तर 
मैत्री का करून गेलीस ...


अशी  काय  होती  चुकी झाली 
ज्याने दूर  तू निघून  गेलीस 


आयुष्यातले  तारे  सारे जनू 
 सोबत  घेऊन  गेलीस ...


मनात  काय  तुझ्या  ग  समजू न शकलो मी
सोबत तुझ्या  येताना मागेच  राहून  गेलो मी 


तुझ्या सोबत  चाललेले  ते क्षण  सोबत  ठेवील 
अन ....
त्यांच्याच  संगे अखेरची  वाट  काढून  घेईल ..


असह्य  होत  असते कधी  तू  इतके  वाईट  वागशील 
कोमेजलेल्या  फुलाला ही पाया खाली  टाकशील 


किती  ग  दूर  दूर  गेलीस तू 
हृदयाला  मृत  करून गेलीस  तू ....





Wednesday, February 1, 2012

एकटा पडलो रे !!

मी आज  एकटा पडलो रे 
वाटले  नव्हते ते  घडले  रे 

नाते  जुळले होते  

आज त्यांनीच  एकटे  पाडले  रे 

खरच  आज  एकटा पडलो रे ...

उंच उडणारा  पक्षी होतो 
आज जखमी पडलो रे 

सुकलेल्या  जखमा    आज  
ओल्या झाल्या  रे 

त्या नभात  विश्वासच  नव्हता  
त्या संगे  गेले आणि काट्यांत पडलो  रे  

जखमा झाल्या   बघ त्यातून 
अश्रू पडले  रे 

नकोसे  वाटते  हे जीवन 
 
बघ  आज  एकटा पडलो रे .....;.