Tuesday, May 8, 2012

तू गेलीस तेव्हा..!!

तू   गेलीस तेव्हा 
जोरात पाउस पडत होता 
मला माहितच नव्हतं 
तो माझ्याच झोपडीला भिजवत  होता ..!!

तू गेलीस तेव्हा 
वारा  ही  जोरात  होता 
तुझ्या हुंदक्यांना तो मला ऐकवत होता ..!!

तू गेलीस तेव्हा 
काळोख पसरला होता 
चंद्रही जनू  अमावस्या समजून दिवासाच  उगवला होता 
निद्राही उडून गेली माझी 
आठवत तुला बसलो 
कूस बदलून हैराण झालो 
स्वप्नही पडेना ..!!

तू गेलीस  तेव्हा 
फुलही  हिरमुसले 
माझ्या कडे पाहत त्याने पाकळ्यांना अश्रू समजून गाळले 
काटे हि तीक्ष्ण झाले  जे अंगास टोचू लागले 
काळी माती  हि माझ्या अश्रूना  मुलासारखी  जपू लागली 
गाणी बंद झाली 
शब्द मुके झाले..!! 

तू गेलीस तेव्हा 
अश्रूंचा पूर आला 
लाटावर आठवणी तुझ्या आल्या 
अर्धमेला झालो मी 
तू गेलीस तेव्हा ........
-

प्रशांत शिंदे 





No comments:

Post a Comment