Friday, May 3, 2013

माझी इच्छा !!

माझी  इच्छा !!

माझ्या  देहाची  राख तू
तेव्हा  हातात घेऊन  रडणार
जेव्हा  मला आठवत तुझी ओंजळ सुखाने भरलेली असणार
मी मात्र निघून गेलो दूर कुठेतरी
अन ...
माझेही आयुष्यही  मी  तुझ्या नावी केलेलं   असणार

वेळ  येत राहील ,प्रसंग हि येतील
काही  चांगले  तर  काही  वाईट करून जातील
तू  मात्र  घाबरायचे नाहीस
मी नेहमीच  तुझ्याच आजूबाजूस  असणार
माझा  देह  नाही  दिसेल  तुला
पण   माझा आत्मा नक्कीच  दिसणार
जेव्हा  बिघडलेल्या  गोष्टींत तुला माझी ओळख दिसणार ....

तू   मात्र रडायचे नाहीस
न  मला आठवायचेस
कारण 
तुझे  डोळे  पुसणे माझ्या हातात  तेव्हा नसणार .... !!

माझी  हि  इच्छा   तुला नक्कीच  पूर्ण झालेली  दिसणार .....
नक्कीच  पूर्ण झालेली  दिसणार ....

-
© प्रशांत शिंदे
०३ -०५-२०१३
दु . १:३७ मि.

No comments:

Post a Comment