Tuesday, October 22, 2013

काय किंमत आहे माझी, मला कधीच कळली नाही ....

काय  किंमत  आहे माझी
मला कधीच  कळली नाही
जे माझ्या ह्या गुलाबाला स्वीकारणारी आयुष्यभर लाभली नाही

त्या  अश्रूंची धार ही
जिने कधीच  एकटे मला सोडले नाही

भिजत राहिलो आयुष्यभर
जसे त्यांचेच ऋणी होतो मी

भोगत राहिलो मग  दुख
सोसायाचेच होते जे अबोलपणी  
खरेच नव्हते सोबती माझ्या तेव्हा  कुणी

वाटत होते  असेच जायचे मोकळ्या हाती
पण .....
कुठून तरी  आले ते फुल अखेरीस माझ्या ही  देहावरी ..............

माझ्या ही जाण्याचे शोक का  करावे कुणी
निजू द्या  आता मला
डोळे लागलेत थोडे तरी ..................

काय किंमत आहे  माझी 
मला कधीच कळली नाही
अन आज ह्या देहावर  आलेल्या  फुलांनी ही 


-
©प्रशांत डी शिंदे

No comments:

Post a Comment