Thursday, March 17, 2016

आई ..

सलाम....

माझ्या डोळ्यांतल्या आसवांना आई तुच तेव्हा पुसलं होतं
नकळत दिलेल्या दुखांनाही तु हसतच स्विकारलं होतं

मी बाळच तुझा जरी कितीही मोठा झालो
मागतच राहीलो सारखे तुला
आई तुझ्यासाठीच करणे मात्र विसरले होतो

घ्यायची आहे भरारी तु उंच उंच आकाशी
तुच शिकवले होतंस हात धरुनी
पण मी तर तुझ्या हातच्या चटक्यांना पाहुनही दुर्लक्षलं होतं

कशी ही माया आहे
तरीही ह्या मुर्ख लेकरीचीच आस आहे

थकलेल्या हातांनीही फिरतो हात तुझा माझ्या चेह~यावरुनी
होतो झालेला जुना घाव तो बरा

आई तुझ्याच समोर जगायचे आहे अगदी मरणही मला स्विकारायचे आहे
आई...... तुझ्यातच खरे दैवत्व आहे....

©प्रशांत डी.शिंदे....

09.02.2016

No comments:

Post a Comment