Friday, February 22, 2013

एक हृदयस्पर्शी प्रेम कथा ...

सुरज आणि अश्विनीचे एकमेकांवर खुप प्रेम होतं...

तिचं रागावणं ह्याचे मनवनं ,
दोघांत भांडण अन काही वेळातच जवळ येणं हे आता रोजचेच झालं होतं..
त्याची सकाळ तिच्या फोन ने व्हायची गुड माँर्निग शोना म्हणत एक गोड पप्पी ती फोनवरच दयायची...
मग हा ही उठायचा अन खुप वेळ फोनवर बोलायचा...
बोलता बोलता त्याच्या कामावरही पोहचायचा...
एवढं प्रेम होतं दोघांचे की त्यानी लग्न करायचे ठरवले..
त्याच्या प्रेमाला चार महीने झाले होते आधी मैत्री अन मग प्रेमात ते अडकले होते...
ठरवलं होतं दोघांना संसार आपला थाटायचा, रोज त्यांच्या बोलण्यात लग्नानंतर काय हाच विषय असायचा..

एक दिवस सुरजला ताप आलेला असतो रोजचेच सारखेच तो दुर्लष्य त्याला करतो..
अश्विनी त्याला फोन करते पण आज त्याचा आवाज रोजच्या सारखा नसतो हे ती ओळखते... त्याला विचारते काय झाले तो सुरुवातीला लपवतो अन मग सांगतो '' काही नाही गं शोना , थोडा ताप आहे ''
अश्विनी त्याला डाँक्टरकडे जायला सांगते पण सुरज दुर्लक्ष करतो.. मग अश्विनीचा हट्ट पाहुन तो एका दवाखान्यात जातो..
आणि काही दिवसांतच तो बरा होऊन पुन्हा त्यांच्या भेटी होऊ लागतात..
काही दिवस जातात सुरज आता पहील्यासारखा राहीला नव्हता तो आता रोजच आजारी राहु लागला अश्विनीची काळजी अजुन वाढु लागली होती कारण सुरज शरीराने दुबळा होत चाललेला होता..
त्यासाठी त्याने ठरवले दवाखान्यात जायचे... तो जातो आणि घरी येऊन खुप रडतो... कारण त्याला डाँक्टरने एड्स झाल्याचे सांगितले त्याने तो खुप खचतो कुणास सांगू ही शकत नव्हता कारण त्याने कधीच कुणासोबत शारिरिक संबंध झालेले नव्हते आणि तरीही त्याला हा आजार व्हावा हे विचारांतही नव्हते...


पण तो हा त्याचा आजार अश्विनीपासुन लपवतो..

तिला जर हे कळले तर तिचे कशात मन लागणार नाही ती काळजी करेल, म्हणुन तो तिला सांगत नाही आणि नेहमी समजुन घेणारा सुरज पण तो हा त्याचा आजार अश्विनीपासुन लपवतो..

तिला जर हे कळले तर तिचे आज अश्विनी भांडत होता, भांडण एवढे केले की तु माझ्या आयुष्यातुन निघुन जा म्हणाला आणि अश्विनी मनात राग धरुन निघुन जाते ती एवढा राग धरते की ती एका मुलासोबत लग्न करते , तिच्या मनात सुरजला तिच्या प्रेमाची जाणीव करुन देने हेच सुरु असतं, सुरजला त्या दिवशी खुप रडतो पण तिला ते जाणवु देत नाही....

दिवस दोघांचे कसे तरी जात होते अश्विनी तिच्या संसारात व्यस्थ असते आणि सुरज त्याचे अखेरचे दिवस मोजत होता....

पण अश्विनीचे दुर्भाग्य असे की ती ज्याच्यासोबत लग्न करते त्याचा कामावर जाताना एका ईमारतीचे स्लँब कोसळुन मृत्यृ होतो आणि त्याच्या जीवाची नुकसान भरपाईसाठी चक्कर मारुन मारुन अश्विनी हतबल झालेली होती कारण तिच्याकडे आता काहीच पैसे राहीलेले नव्हते...


अन अशातच सुरजही त्याच्या आजाराने मरतो एक दिवस येतो सुरजचा अखेर होतो तो मरण पावतो..

अश्विनीला कळतं सुरजने भांडण का केले होते.. पण सुरजने मरण्या अगोदर जमा केलेले पैसे अश्विनीच्या नावे केले होते..

आणि अश्विनीने सुरजच्या देहावर वाहीलेले अश्रुंची किंमतच जणु सुरजने दिली असावी....
-
© प्रशांत शिंदे

No comments:

Post a Comment