Tuesday, July 9, 2013

एक  हृदयस्पर्शी कथा बाप-लेकीची ....<3

एक लहान मुलगी  जिची आईचा  तिचा  जन्म होताच मृत्यू होतो   आणि तिचा सांभाळ पूर्णपणे पप्पांनीच   केला
तिचे   तिच्या पप्पा वर  खूप प्रेम होते
एक दिवस  पप्पांना म्हणते :

मुलगी :पप्पा तुम्ही कधी  मला  मारले  का  नाही ??
पप्पा :  बाळ , मी तुझ्यावर  खूप  प्रेम करतो म्हणून ..<3
मुलगी : पण मुलगी तर दुसर्यांची  असते  असे म्हणतात ?

पप्पा : हो  बाळ ..पण  रक्ताचे नाते असतं हे म्हणून जीव लागलेला असतो ,
आणि तू तर  माझी गोजीरी  आहेस माझा  जीव  आहेस , तुला कसे  सोडू मी ..

जेव्हा लग्न करून  जाशील तेव्हा  काय माहित  माझे कसे होईल ....
तुझ्या आईने पण  मग  मला  सतावून  सोडले  असते .. माझी  मुलगी कशी असेल तिकडे, जेवली   असेल  कि  नाही ... बरी तर असेल ना ...
आणि तीच काळजी मलाही  असेल ..

मुलगी  : लव्ह यु  पप्पा <3
आणि  पप्पांना जोरात मिठी  मारत  दोघांचे हि  डोळे पाणावतात ...

एक  दिवस त्या  मुलीचे  लग्न  ठरतं..
आणि  पप्पा लग्नाच्या तयारीला लागतात , पप्पांना  असे काम करताना  पाहून  मुलगी  हि मदत  करू लागते  कारण  घरी काम करणारे दोघेच ..

पप्पा  जवळच्याच एका  दुकानात आपल्या मुलीसाठी  साडी घ्यायला  जातात डझनभर  साड्या पहिल्या नंतर  एक साडी  पप्पा आपल्या  लाडकीसाठी निवडतात ..
मुलगी  साडी घेऊन  दुकानाच्या  बाहेर पडते आणि  पप्पा दुकानदाराचे पैसे द्यायला थांबतात  ..
तेवढ्यात एक  मारुती कार रस्ता ओलांडून   दुकानाकडे येते पापांना  ते  दिसत पण  पप्पा काही हालचाल  करण्याआधीच त्या कारने  गोजोरीला  खाली पाडले होते  ....
पप्पानी घेऊन दिलेल्या साड्यांवर रक्तच रक्त  होते पप्पा धावत जाऊन आपल्या  लाडकीला   जवळ  घेतात  आणि  त्यांच्या  डोळ्यांतून अश्रू  अनावर  होतात .

त्या अवस्थेत हि 
ती पप्पांना बोलते  :  "मला  तुमच्या सोबत राहायचे होते , मला  लग्न  करून  दुसर्या घरी जायचे नव्हते " ...

 आणि पप्पांना खूप दुख होतं आपल्या  लाडकी ला कधी  एक  हात  उचलला  नव्हता  आणि ती आज रक्तात भिजलेली होती ...
 हे  दुख  त्यांना सहन होत नाही आणि  पप्पांचा हि  श्वास  संपून   जातो .....

त्या  कार ने  एक नाही  दोन  जीव  घेतले ....
बापलेकीचे  प्रेम  पाहून  तेथिल लोकांचे हि  डोळे भरले होते ....

-
• ©प्रशांत शिंदे•

No comments:

Post a Comment