Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

Wednesday, March 16, 2016

प्रेम..

प्रेम म्हणजे प्रेम असतं ....

विचार देणारं विचार करणारं

दिवसा जागवणारं रात्री जागवणारं


प्रेमात रडायचं असतं

चिडचिड झाली तरी समजुन घ्यायचं असतं

प्रेमात हे कुणी एक करत नसतो

प्रेम तिच्यात आणि तुझ्यात लपलेला असतो


प्रेमात ठेच लागली तरी

मी बराच आहे म्हणायचं असतं


प्रेम केलं तर प्रेम जपायचंच असतं....


©प्रशांत डी.शिंदे.....

दि.१६.०३.२०१६

Tuesday, February 23, 2016

हल्ली रडणंही जमत नाही..

कुठे हरवतो  मलाही कळत नाही
हसता हसता येतो कंठ दाटुनी
खरंच का कळत नाही
फक्त आठवण  येते 
अन ....
आठवणींना जवळ घेऊन हल्ली रडणंही जमत नाही.....

©प्रशांत डी.शिंदे.....

Wednesday, February 17, 2016

खेळ तिचा..डाव तिचा....

देव आहेच कुठे का त्याला मानायचे
टेकलेही होते हे आशिष माझे समोर ..तिच्या सुखांसाठी
तिला तिचे मिळाले जेव्हा
तिने नेमके माझे होणे नकारले होते 

दुनियेची कोण करतो पर्वा  
कुठे वेळ सावराया मला माझ्याच दुखांतुन
शिल्लक आहेत तिच्या आठवणी सोबत पावलोपावली
आता तिच्या आठवणीही काळजास ब~याच वेदना देते ....

का उगाच देवाला मानायचे
तिचा खेळ होता सारा
तिचाच डाव होता तिने जिंकायचे मी हरायचे.......

©प्रशांत डी.शिंदे....
दि.१७.०२.२०१६.

Wednesday, January 13, 2016

जुनेच घाव ते रोज नवे होते ....


जुनेच घाव ते रोज नवे होते 
विसरावे कसे तेच कळेना मनास ह्या 
वेडे मन सारखे तुझेच नाव घेते 

तू येशील ....आस आजही तशीच मनास ह्या 
मनाचे कोपरे तुझ्याविना रिकामे होते 

डोळ्यांतही जाणवू लागलाय हल्ली दुख तुझे जाण्याचे 
कोरड्या पापण्याही भिजतात गातो गीत तुझे ज्यावेळी 

असेच का असते उदास मन माझे 
असेल का तुझेही सारखेच 
जाहले   होते दोन्ही मने एकरूप तेव्हा 
आपल्याही प्रेमाचे एक घरटे होते 

वेळ गेली बघ कित्ती  मागे आता 
मी आजही मागेच तसाच रिकामे हाती राहिलो 
आज  हि आठवण तुझी माझी भेट घेत असते 
तुझ्या अंगणी येत नेमके दार बंद होते ......

मनास समजवायचे करतो लाख प्रयत्न 
पण पुन्हा मागे जाऊन ते तुझेच चित्र सारखेच शोधते 
अन मग जुनेच घाव ते रोजच  नवे होते ....

©प्रशांत डी.शिंदे....
दि.१३-०१-२०१६ 

Sunday, September 20, 2015

एकटेपण..

कधी  कधी  खुपच  एकटं  वाटु लागतं
अन उन्हातही चक्क पाउस पडु लागतो..

बोलावं वाटतं बोलायला कुणीच नसतं
आठवणींतच हरवलेलं पुन्हा शोधु लागतं

पुन्हा विचारांची नाव बनते मन वाहत नेतं दुरवर
विचारच ते शेवटी किती झेपायचे..
आसवांच्या ओझ्यात बुडताना किनारा शोधु लागतं

एकटंच बरं वाटतं आठवणीही छळतातच
सुगंध दरवळत येतो कधीतरी
पुन्हा तिचाच आभास होऊ लागतो

किती....किती पळायचे अस्तित्वाशी
तुला शेवटी तुझंच होऊन जगावं लागतं....

©प्रशांत डी.शिंदे....
दि.२०.०९.२०१५

Sunday, August 23, 2015

असेच जगायचे असते..

असे  असेच जगायचे असतं
कुणाच्या  डोळ्यात बघायचे असतं
डोळ्यांतल्या पाण्यातही भिजायचे असतं
दु:ख  त्यांचे समजायचे असतं

असे..असेच जगायचे असतं....

बोलत नाही बरेच चेहरे
ठेचाळलेले  जिकडे- तिकडे
जरा  जवळ  जाऊन हात खांद्यावर ठेवुन
घाबरायचे नाही...घाबरायचे नाही
जरासे का होईने आपणच त्यांचे आधारस्तंभ व्हायचे असतं....

असे असेच जगायचे असतं....
काही  नसतं अगदी जिवही नाही आपला
नाती अन माती एवढ्यांतच रहायचे असतं
कुणाच्यामुळे नाही तर आपल्यामुळे कुणाला आयुष्यं द्यायचे असतं.

येतात संकटे पडतो एकटे
होतो घामाघुम संपतात रस्ते सगळे
हरायचे फिरायचे नाही जगतात आपल्यामुळे काहीजन
तु  हे कधी विसरायचे नसते ....
तुला त्यांच्या सुखासाठीच मिळालाय हा जन्म 
अरे  वेड्या त्यांच्याचसाठीच तर जगायचे असते.....

असे ...असेच जगायचे असते....
अगदी ...असेच....

©प्रशांत डी.शिंदे....
दि.२३.०८.२०१५..

Thursday, August 6, 2015

मी आता हसणार नाही..

तुला करावेच  लागेल दुर मला
तुला जगणे हे माझे ...तसे कधी कळणार नाही

दुर  गेल्याशिवाय आठवणे....तुला जमणार नाही
भेटलो जिथे तेथे .... मला तु  पुन्हा शोध घेऊ नको
तुला  प्रिये  हो  पुन्हा कधी  मिळणार  नाही...

येते  तुझी आठवण मलाही, रडतात हे डोळे माझे
माझे  हसु तुला कळणार नाही

मी  आता  पुन्हा हसणार नाही....

समजुन घे ..ऐकुन घे जरासे ...बोलु दे जरासे
भोग नशिबाचे आहेत हे माझ्या....ते तुला कधी
देणार मी नाही.......

जाईल मिटवुन  सारे .....

विझवु नको आसवांनी चितेला तु 
माझ्या चितेतही मी तेव्हा....तुला मिळणार नाही
समजाव आसवांना तुझ्या
मी तुला पुन्हा मिळणार नाही

मी आता पुन्हा  हसणार नाही......

कोण  होतो  मी.... काय होती कहाणी
घे वाचुन तु आता मला जरासे.... साठवुन घे  जरासे 
मी नजरांना  उद्या दिसणार नाही..

रडतेस  का तु असे ... याचेच मला  भय  तेव्हाही होते
मला  तु सोडणार  नाही.....

मी पुन्हा हसणार नाही....

रंग  ते  दिलेले  मी तुला .... ठेवील तसेच  जातानाही
आसवांत तुझ्या त्यांना कधी ....येऊ  देणार नाही.....

मी आता  पुन्हा  हसणार नाही......

©प्रशांत डी.शिंदे....
दि.०६.०८.२०१५..