Showing posts with label sad marathi kavita. Show all posts
Showing posts with label sad marathi kavita. Show all posts

Tuesday, February 23, 2016

हल्ली रडणंही जमत नाही..

कुठे हरवतो  मलाही कळत नाही
हसता हसता येतो कंठ दाटुनी
खरंच का कळत नाही
फक्त आठवण  येते 
अन ....
आठवणींना जवळ घेऊन हल्ली रडणंही जमत नाही.....

©प्रशांत डी.शिंदे.....

Monday, February 22, 2016

कुणी जगावं.. कुणी मरावं..

एक जिव येतो,एक जिव जातो 
कुणी जन्म म्हणतो कुणी मरण म्हणतो

डोळ्यांसमोर घडतं सारं
कुणी हसतो कुणी रडतो

कुणाच्या येण्याने आयुष्यं बदलतं
कुणाच्या जाण्याने आयुष्यं एकटे एकटे होतं

रहावं कि संपावं हा एक प्रश्न आहे
दु:खच ठरवतं  ईथे कुणी  जगावं कुणी मरावं.....

©प्रशांत डी.शिंदे.....

Wednesday, February 17, 2016

खेळ तिचा..डाव तिचा....

देव आहेच कुठे का त्याला मानायचे
टेकलेही होते हे आशिष माझे समोर ..तिच्या सुखांसाठी
तिला तिचे मिळाले जेव्हा
तिने नेमके माझे होणे नकारले होते 

दुनियेची कोण करतो पर्वा  
कुठे वेळ सावराया मला माझ्याच दुखांतुन
शिल्लक आहेत तिच्या आठवणी सोबत पावलोपावली
आता तिच्या आठवणीही काळजास ब~याच वेदना देते ....

का उगाच देवाला मानायचे
तिचा खेळ होता सारा
तिचाच डाव होता तिने जिंकायचे मी हरायचे.......

©प्रशांत डी.शिंदे....
दि.१७.०२.२०१६.

Wednesday, January 13, 2016

जुनेच घाव ते रोज नवे होते ....


जुनेच घाव ते रोज नवे होते 
विसरावे कसे तेच कळेना मनास ह्या 
वेडे मन सारखे तुझेच नाव घेते 

तू येशील ....आस आजही तशीच मनास ह्या 
मनाचे कोपरे तुझ्याविना रिकामे होते 

डोळ्यांतही जाणवू लागलाय हल्ली दुख तुझे जाण्याचे 
कोरड्या पापण्याही भिजतात गातो गीत तुझे ज्यावेळी 

असेच का असते उदास मन माझे 
असेल का तुझेही सारखेच 
जाहले   होते दोन्ही मने एकरूप तेव्हा 
आपल्याही प्रेमाचे एक घरटे होते 

वेळ गेली बघ कित्ती  मागे आता 
मी आजही मागेच तसाच रिकामे हाती राहिलो 
आज  हि आठवण तुझी माझी भेट घेत असते 
तुझ्या अंगणी येत नेमके दार बंद होते ......

मनास समजवायचे करतो लाख प्रयत्न 
पण पुन्हा मागे जाऊन ते तुझेच चित्र सारखेच शोधते 
अन मग जुनेच घाव ते रोजच  नवे होते ....

©प्रशांत डी.शिंदे....
दि.१३-०१-२०१६