Tuesday, August 6, 2013

दगडाचा देव तू .........!!

दगडाचा देव  तू
दगडाचे  काळीज तुझे 
भावनांत गुंतुनी विसरलास तुझे   देवपनही.........

तुझ्या गाभारयात  येताना
आता परिस  बनावं लागतं
मी एक क्षुद्र रे मी कोळश्यासमान
तप्त  ह्या लोभी दुनियेच्या
जळतो आहे  मी  जन्मताच ...........

देव तू  श्रीमंताचा
मी तर साधा भिकारी
श्रीफळ काय वाहू  तुला
खिश्यात राहिली नाही रे कवडी.........

दगडाचा  देव तू 
मानायचे  तरी दान  मी कसे ...?
संकट दारिद्र्याचे हि  तरुण घे एवढेच मागणे आहे  रे माझे.......

देव तुला बघताना  आता डोळेही  थकलेत
तुझ्याकडे मागून देवा  सरले हे आयुष्य माझे ..........
-
लेखन : ණ
• ©प्रशांत .डी. शिंदे•

No comments:

Post a Comment