Wednesday, August 21, 2013

आयुष्यच संपवून गेलो मी....

तिचे  बोलणं
तिचे हसणं
सारे काही  रोजसारखेच
मी मात्र आज पाहतो तिला
आज बंद  डोळ्यानेच ..........

तिचे  खेळणे
तिचे नाक मुरडणे
आज मात्र  दुसर्यासाठी
माझे प्रेम व्यर्थ गेलं
चौकटीत ह्या भिंतीच्या आठवत राहतो मी आनंदाने .......

आज तिला मात्र रडू आले
जेव्हा  माझ्या वाढदिवसाला
घरी जेवायला  सगळेच आले
तिला मात्र मी  दिसेना
देह नसला माझा  तरी
असल्याचा  भास  देतो होतो मी माझ्या स्पर्शाने ..........

तिचे ते आठवणे तिचे निघून जाणे
माझे मात्र  तिला हसत दाराशी  सोडणे
तिला तेव्हा आठवलं
तोच  अखेर होता आयुष्याचा माझ्या
आयुष्यातून निघून गेलो मी  मुकेपणाने .............

आयुष्यच   संपवून गेलो मी आनंदाने ..... आनंदाने ....
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे

No comments:

Post a Comment