Tuesday, August 20, 2013

रक्षाबंधन आली कि तुझी आठवण येते .............

रक्षाबंधन आली कि तुझी  आठवण  येते
तू  येणार म्हणून  मनात आनंदवन  फुलते
तुझ्या भेटीसाठी माझा जीव अधीर होतो
तुला पाहताना मग  हि डोळे भावूक होतात ............

रक्षाबंधन आली की गोड धोड घेऊन येतेस
तुझ्याच हातांनी  त्यातून थोडेच  ग का  भरवतेस
तरीही  पोट भारता माझे ताई तू मायेने  जे मला भरवतेस.............

ताई  तुझे लग्न आठवले की मला  आज हि रडू येतं
तू कशी असशील तेथे मन  सारखेच  विचार करत असतं............

अशीच  राहू दे  सोबत  माया तुझी
असेच माझ्यावर तुझी सावली
तुझ्याच सुखांसाठी  मी
नेहमीच  असेल  गं तुझ्या पाठीशी ...............

रक्षाबंधन आली की ताई  तुझी आठवण  येते
थोडे  हसू  आणि  थोडे  पापण्यांशी  पाणी  येते

मग आठवतात ते  दिवस  आपले बालपणीचे
बाबांनी मारले की तुझे मला  जवळ धरने
मी  उपाशी  राहिलो की  बघ मी  हि नाही  जेवेल म्हणणे
दोघांना पाहून  मग  बाबा हि आपणांस हसायचे ...........

म्हणूनच तर  जग आपल्याला भाऊ बहिण म्हणायचे .......

आठवतात ते दिवस किती ग मी  तुला मारायचो
तुझे केस ओढायचो  अन तुझे चिमटे मी सोसायचो
तरी  शाळेत जाताना नेहमी ताई तुझाच हात  मी धरायचो ...........

रक्षाबंधन आली  ताई  आज तुझी आठवण आली .............
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे

No comments:

Post a Comment