Wednesday, December 28, 2011

जीव ..

" जीव म्हणजे माझ्या मते एक वारा एक वादळ , आपल्या सोबत आपल्या मध्ये  फिरत असतो जो पर्यंत आपला जीव आहे  . ज्या दिवशी ते वादळ थांबेल  त्यादिवशी आपण  ह्या जगाशी नाते सोडलेले असेल .."
                 


 एक अखेरचा श्वास जो आपल्याला जाणवतो आपल्यातून  निघून जात  आहे  पण ज्याचा  तो  श्वास  जात असतो  त्याचे काय होत असणार  तो श्वास सोडून जायला नक्की तयार असतो  कि त्याला हि  भावना असतील ?, एका क्षणात  तो अखेरचा श्वास  जातो आणि  सगळे शांत होऊन जातं . हि  शांतता नकोशी वाटत असते  कारण तो व्यक्ती आपण हरवतो  त्याला आपण गमावतो ..
               


   जिवंत असताना कितीही  लागले तरी  त्याच्या वेदना लागणारयाला तर होतंच असतात  पण      त्या त्याच्यापेक्षा  दुसर्यांना म्हणजे  आपल्या जवळच्या  व्यक्तीला अधिक होतो . पण त्या वेळेस जीव असतो म्हणून ते सहन करून घेतो पण ज्या वेळीस त्याला जाळतात  त्यावेळीस  त्याला काहीच  वेदना  होत नाहीत पण तो जाळ  आपल्या मनात  एक विचार देऊन  जाते  ती म्हणजे  आज हा आपल्याला  सोडून  गेला ,  उद्या ह्याच  जागी मीही असणार  त्यामळे मी असा विचार  करतो जे काही करतो आहे  त्यातून आपली  एक चांगली  आठवण  म्हणून   तरी कुणासोबत  , कुणाच्या  मनात घर करून  राहील  असे करायचा  प्रयत्न मी करतो ....  
               

No comments:

Post a Comment