Thursday, December 29, 2011

भावनांची वादळे  उठली अचानक 
छेडताना तार हि  तुटली अचानक 


दृष्ट कोणी लाविली  स्वप्नास माझ्या 
उमलण्या आधी कळी  सुकली अचानक 

वादळे बैचेन आणि अस्वस्थ लाटा
कोणती  नौका अशी  बुडाली अचानक 


भावनांची वादळे  उठली अचानक ..


पाहून आलो होतो   चीतेवरती  तिलाही
बहरलेल्या ज्वालात  ती  दिसली अचानक .


भावनांची वादळे  उठली अचानक 
छेडताना तार हि  तुटली अचानक ..


3 comments:

Unknown said...

गझल एडिट करून पोस्ट करू नका...तिसरा शेर वेगळा आहे..

पहुडलो होतो चिते वरती 'इलाही'
बहरल्या ज्वाळात ती दिसली अचानक

Unknown said...

अबे कविता चोर,
ही कविता माझी आहे, 12 ते 14 वर्षांपूर्वी लिहिलेली, कॉलेजच्या मॅगझीन ला पण असेन ही,
माझे नाव निनाद गायकवाड आहे, 9221550083 हा माझा नंबर आहे.
तुझी असेल तर सिद्ध करून दाखव.

तुझ्या कॉल ची वाट पाहतोय.

व्यंकटेश कुलकर्णी said...

इलाही जमादार यांची ही गझल आपल्या नावाने पोस्ट करण्यात काय मिळते

Post a Comment