Monday, December 26, 2011

एक आठवण !!

मी रोज  पाहतो  आपले  सोबती आपले मित्र,  नातलग त्यांना  स्मशान   भूमीत नेताना पाहून आपल्याही मनात  धाकधूक होत असते ." माणसाचे कसे  आहे ना जो पर्यंत जिवंत असतो  तो पर्यंत  त्याला आपल्यासाठी जेवढे करता येत नाही त्याहून  जास्त तो दुसर्यांसाठी करत असतो , ज्या मुळे  दुसरे  त्याच्या  शेजारी  त्याच्या आठवणी घेऊन रडत असतात त्याच्या  आठवणी ताज्या करतात , पण काय फायदा ना तो ह्या जगातून निघून गेलेला असतो ." तो कधीच  ह्यापुढे त्याच्या सोबत न कसली चर्चा ,ना कसले सल्ले ना काही मदत  तो करू शकत आणि ह्याच साठी सगळ्यांचा जीव त्यांना दोष देत असतो  कि हा व्यक्ती  मेल्यावर  माझे काय होईल ? ..  ह्याने आपल्यासाठी  खूप काही दिले आहे  खूप मदत केली . पण  आपण खरेच काही केले का त्याच्या साठी  ह्याचाही  पश्चाताप तिथे तो करत असतो .
मी हि गेलो  काही वेळा त्या स्मशान भूमीत त्यांना जळतांना मी हि पाहिले तो जो जीव नसलेला व्यक्ती म्हणजे  माझा मित्रही होता  आणि माझ्या आजी ला हि  जळताना  पाहिले  पण आजी जेव्हा ह्या जगात मला पोरके करून गेली  त्यावेळीस हा विचार आला कि  माणूस आपल्याला सोडून जाऊच कसा शकतो ?.
    मी पाहिले  लाकडांवर  आपल्या माणसांना झोपलेले  त्यांच्या काहीच  हालचाली  होत नव्हत्या . हालचाली करणे  आणि आपल्याकडे  पाहणे त्यांनी केव्हाच  बंद केलेले  असते .त्यांचे दु:ख  होते आणि दु:ख म्हणजे आठवणी ह्या आठवणी त्याच्या नावाने आणि त्याच्या कार्याने आपल्या सोबत राहतात .
त्यांना त्या लकडासोबत   जळताना  असे  वाटले  हा माणूस  कशासाठी  ह्या जगात आला होता  ,आता हि  ज्वालांमध्ये जळतो आहे  आणि आयुष्यभर सु:खापेक्षा  दु:खाच्या  अग्नीत जळत आला आहे .
प्रत्येकाला सु:ख  शेवट पर्यंत मिळत नसता तो कितीही श्रीमंत असला तरी तो जेव्हा  शेवटचे  दिवस मोजत असतो त्या वेळेस   जे  त्याला  दिसतं  ते दु:खच असतं.  ज्या वेळेस  जवळच्या व्यक्तीला हरवतो  ना त्या वेळेस  ती होणारी  जाणीव म्हणजे  दु:ख . जे प्रत्येकाच्या जीवनात असतात ज्या पासून आपण पळू शकत नाही .             हा .. फरक फक्त एवढा आहे कि गरीब असतो  त्याच्या कडे  ते जरा जास्तच  असतं  आणि त्यातूनही तो सु:ख मिळवत असतो  आणि जो  श्रीमंत  असतो त्याला  केव्हा तरी दुखाची जाणीव  होते .
 ह्या  सारयातून जो  जातो  तीच आपल्या कडे  आठवण  म्हणून  राहते ..

No comments:

Post a Comment