हि कथा आहे एका २१ वर्षीय सोनालीची ..
मुंबईतील ठाणे येते राहणारी हि सोनाली ,
तिच्या घरची परिस्थिती तसे बिकटच होती आई दुसर्यांच्या घरी धुनी भांडी ,घरकाम आणि बाबा ठाणे येथे रिक्षा चालवून आपले पोट कसेबसे भारत होते त्यात महागाईमुळे मुलीचे शिक्षण कसेबसे दहावी पर्यंत ठाणे येथे पूर्ण करू शकले पण त्यानंतरचे शिक्षण हे परवडत नव्हते म्हणून त्यांनी सोनालीचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला ..
पण सोनाळीमध्ये शिक्षांची जिद्द होती तिने आईबाबांना सांगितले कि मी काम करून शिक्षण पूर्ण करेल माझे ,पण हे बाबांना पटले नाही कि आपल्या ह्या गरिबीचा त्रास आपल्या मुलीला का व्हावा ?..
त्यांनी कसेतरी व्यवस्था करून सोनालीला औरंगाबाद येथे त्यांच्या मित्राकडे शिक्षणास पाठवले ,
बाबांचे मित्र हे सरकारी कार्यालयात कामाला होते त्यांना मुल बाल नव्हते आणि त्यांचा हि जीव सोनालीवर होता तर त्यांनी सोनालीला शिक्षणाची व्यवस्था करून दिली ..
सोनालीनेही तेवढ्याच मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण केले , तिने software क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला आणि तेथेही ती राज्यात दुसर्या क्रमांकाने आली होती .
आता तिने ठरवले आपल्या आईबाबांना आता घरीच बसवून आपल्यासाठी केलेली मेहनत आता कार्यी लावायची ...
तिचा महाराष्ट्र सरकारतर्फे सत्कार करण्यात आला होता आणि तिला मुंबईतील नामांकित शासकीय दूरध्वनी कंपनी MTNL मध्ये नोकरी लागली ..
आता तिचे एकाच स्वप्न होते ते म्हणजे आई करत असलेले मोलकरणीचे काम बंद करून बाबांनाही मदत करावी . त्यासाठी तिने मुंबई गाठली आणि मुंबईत येताच आइआनि बाबा खूप आनंदी झाले ..
आपल्या मुलीने आपले नावच उंचावले होते ह्याचा त्यांना अभिमान होता ..
पण काहीतरी अघटीत घडणार हे कुणास ठाऊक होते .
हा आनंद जास्त दिवस राहिला नाही .
सोनालीचा आज कामावर जाण्याच पहिला दिवस होता , तिला मुंबईच्या ट्रेनच्या प्रवासाची आता पर्यंत सवयच झाली नव्हती आज तिचा पहिलाच दिवस होता आईला तिने पहिल्याच दिवशी सांगितले होते " आई तू आजपासून कामाला जायचे नाही आता जे काही करेल ते मीच करेल .. "आणि दोघी मायलेकी गळ्यात गळा टाकून एकमेकींचे डोळ्यांत अश्रू पुसत होते..
सोनाली ठाणे स्टेशनवर जाऊन बाबांनी दिलेल्या २०० रुपयांचा ट्रेनचा पास अगोदर काढून घेतला तिथेही तिला मुंबईची दगदग जाणवली लाईन मध्ये राहून तिला काही लोकांचे बोलणे ऐकावी लागली काही लोक मध्ये घुसून आपला पास काढत होती आणि त्यांच्यासोबत थोडा वादही झाला ..
पहिलाच दिवस आणि उशीर होणार ह्या चिंतेने सोनालीला रडू आले होते पण हिम्मत केली कि काही हि त्रास झाला तरी आपण आपल्या आई बाबांना आता काम करू द्यायचे नाही ...
तिने ठाणे ते मुंबई ट्रेनचा पास काढला आणि फस्त लोकल पकडण्यासाठी प्लाटफॉर्म वर गेली आणि पूर्णपणे भरून येत असलेल्या ट्रेन पाहून तिथेही तिला २० मीन उशीर झाला शेवटी तिने कसेतरी एक ट्रेन पकडली पण तिला आत जायला जागा नव्हती म्हणून ती ट्रेनच्या दरवाज्यातच उभी राहिली आणि ट्रेन सुरु झाली तशी तिची भीती वाढत गेली . कारण तिचा ट्रेनच्या प्रवासाचा पहिलाच दिवस होता घाटकोपर जाताच अजून गर्दी झाली आणि विद्या विहार जाताच तेथील झोपडपट्टी च्या दिशेने एक दगड आला आणि तिच्या डोक्यावर तो जोरात लागला
ती रक्त- बंबाळ होऊन ट्रेनखाली पडली तिच्या डोळ्यांसमोर आता अंधार आणि आई बाबाच दिसत होते आणि डोळ्यांत अश्रू येत होते ..
खूप वेळपर्यंत तिला पाहण्यास कुणीच आले नव्हते आणि जेव्हा आले तोपर्यंत सोनालीने श्वास सोडला होता .
तिला मृत अवस्थेतच कुर्ल्याच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये हि ट्रेन मधील लोकच घेऊन गेले होते . तिच्या जवळील कागदपत्रात कामाला रुजू होण्याचे लेटर आणि आई बाबांचा फोटो आणि सोबत एक डायरी त्या मध्ये तिच्या बाबांचा नंबर पोलिसांना सापडला .
पोलिसांनी हि लगेच त्यांना बोलावून घेतले आणि समोर आपल्या मुलीला मृत अवस्थेत पाहून दोघांवरही दुखाचे डोंगरच कोसळले . त्यांना काय ठाऊक होते एक दिवस आपली तरुण मुलगी तिच्या लग्नात आपल्या खांद्यावर रडणे सोडून आपल्यालाच तिला मेलेल्या अवस्थेत घरी घेऊन जावे लागणार ..
आईला तर रडता रडता दातखळी बसली होती बाबांना समजत नव्हते रडावे कि आईला आवरावे