Thursday, January 5, 2012

सारे तुझेच आहे


सारे  तुझेच   आहे ..
माझे  हृदय माझे मन 
हा दिन  हि रात्र 
हि  गुलाबी  थंडी  तुझीच आहे  
त्यात मिळणारी   उब  तुझीच आहे 
पण आज  तू माझी  नाहीस ..


पडणारा पाऊस  त्या  थेंबाने 
भिजलेले  ते ओठ तुझेच आहेत 
पण  आज  तो पाऊस माझ्यावर  नाराज आहे ..


तुझा  तो  नाजूक इशारा आजही  मला आठवत आहे
 ते  तुझे  फिरून पाहणे  आजही  तसेच आहे
पण माहित  नाही  का 
आज  तुला  माझा राग आहे..


हि पुष्प तुझेच आहेत  आणि त्यातला गंध  हि  तुझाच आहेत  
पण ते   तुलाच  नकोसा  आहे 
आज  ते पुष्प हि  उदास आहेत  
त्यांना हि  तुझीच  ओढ आहे ..


खरच  सांगतो  सखी आजही 
सारे  तुझेच   आहे ..







No comments:

Post a Comment