आज मी ही होणार
दूर तुज पासून
आज मी ही वाहणार आहे
अश्रूंचा पूर
घात केला तू मोठा
वर केलास तू काळजाला ह्या माझ्या
वचन आज देतो मी येणार ना मी
वाटेत तुझ्या
नजरेतून तुझ्या मला ही उतरायाचे आहे
सोडून जायचे आहे मला सारे
विसरायचे ते जुने क्षण
आठवण ही बनू नको तू
मला त्यात ही सोसतो आहे तुझेच पण
आज राहायचे आहे एकटे मला
नको तुझा आधार
होईल खूप दु:ख उद्या
पण ते ही आज सोसेल मी
नको असे जगणे मला
ज्यात आहे एकटे पण ......
No comments:
Post a Comment