Tuesday, January 17, 2012

एकांतात आज ..!!


एकांतात  आज  कळी ने  ही  का  भेटावे  


गहिवरलेले  शब्द  हळूच मुखावरी  का आणावे


घाव  माझे हे फुलांनी  आज  मला
 विचारू नये 
 पाहुनी तेव्हा    मग शहारू  नये ...


वाट  पाहत होतो   आज  ही 
  तिच्या  होकाराची 


ह्या  कळीला ही  काय  माहित  ह्या 
जीव घेण्या प्रकाराची


येता  जवळ त्याचा   एकच  सवाल 
होता 
प्रेम तर तू ही  करत होता 


मग गंध   तुझा दरवळला का  नाही 


प्रेम  तर  काल  दोघांनी  केले  होते


पण तुझ्याच  प्रेमाची 
कळी का फुलली   नाही ...


त्याच्या  ह्या  बोलण्याला  मी
  आज उत्तर काय  देऊ 


मोकाट लेले तारे  आज  सोबत  कसे घेऊ 


नशिबातल्या  ताऱ्यांनीच बघ  
साथ माझी  सोडली 


जिवलग  करून  मला  आज 
सारी   नाती  तोडली 


आज   बघ  कसा  मी  एकटे पडलो
 कुणी  नव्हते   सोबत  म्हणून  फुलांपाशीच  रडलो ..


तू  नसताना  आज हे काय  घडले 


   सांगू कसे आज   तुला  मी  
डोळ्यातून  पाणी किती पडले 


 ती दूर जाताच   बघ  मी ही   डोळे  मिटले
तिच्या  मागे मागे  माझ  घर ही  जसे तुटले   ...







No comments:

Post a Comment