मी नाही भीत अश्या वागण्याला
चिंता वाटते अश्या जगण्याला ..
खेळ कुणी मांडला असा
ज्यात मी हरलो
तुमच्याच खेळामध्ये
मी मागे सरलो
नको मला हि असली यारी
दोस्ती पेक्षा ज्याला दुनिया आहे प्यारी
दुनियेची मला कधीच नव्हती साथ
आज मित्र बनून केला अपघात
चिंता वाटते अश्या जगण्याला ..
तुझ्या संगे वाटले मला दुनिया हि उद्या बदलेल
ठाऊक नव्हते तिथे माझी अर्थीच सजवेल
मृत्यू चे कधी भय नव्हते मला
तुमच्या ह्या वागण्याने हादरलो आज मी
जीवच माझा हवा होता तर सांगून
बघायचे होते एकदा
मैत्री केली आहे प्राण ओतला असता कित्येकदा
जाता जाता मी आज सांगत नाही काही
पाहतो तो हि तोच देईल उद्या ग्वाही
मी नाही भीत अश्या वागण्याला
चिंता वाटते अश्या जगण्याला ..
No comments:
Post a Comment